XEROX MEANING IN MARATHI : कॉलेज–ऑफिसमध्ये रोज ‘झेरॉक्स’शिवाय पान हलत नाही; पण ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात? जाणून घ्या उत्तर...
“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या...
आपण सर्वांनी कधी ना कधी ऐकलेलं वाक्य, “भय्या, एक झेरॉक्स देना” इतकं सर्वसामान्य झालंय की, त्यामागे खरी कहाणी आहे, हे आपण विसरतो.
कॉलेज असो, सरकारी ऑफिस असो किंवा अगदी कोपऱ्यावरचं स्टेशनरीचं दुकान, झेरॉक्स हा शब्द इतका अंगवळणी पडलाय की, ‘फोटो कॉपी’ हा मूळ शब्द कुणाला आठवतच नाही.
पण गंमत अशी की, झेरॉक्स हा प्रत्यक्षात अर्थाच्या अनुषंगाने वापरला जाणारा शब्द नाही, तर ते एका अमेरिकन कंपनीचं नाव आहे, ज्यानं जगभरात कॉपी मशीनचं साम्राज्य निर्माण केलं.
१९३८ मध्ये चेस्टर कार्लसन नावाच्या संशोधकानं ‘झेरोग्राफी’ नावाची प्रक्रिया शोधली आणि शाई किंवा कार्बन पेपरशिवाय कॉपी काढणं शक्य झालं.
याच तंत्रज्ञानावर आधारित ‘XEROX 914’ नावाचं पहिलं प्लेन पेपर कॉपियर मशीन १९५९ मध्ये आलं आणि ते इतकं गाजलं की, कंपनीचं नावच XEROX CORPORATION पडलं.
या मशीनच्या अफाट यशामुळे ‘झेरॉक्स’ हा शब्द हळूहळू ‘फोटो कॉपी’साठी पर्याय बनला आणि लोकांच्या जिभेवर तो कायमचा बसला.
भारतही त्याला अपवाद ठरला नाही. येथेही “झेरॉक्स काढा,” “झेरॉक्स कर,” किंवा “एक झेरॉक्स दे ना” हे वाक्यांश सवयीचे झाले.
पण प्रश्न असा की, हा शब्द इतका वापरला जातो आणि तरीही कधी आपण विचार केला आहे का की, मराठीत झेरॉक्सला नेमकं काय म्हणतात?
हा इंग्रजीतून आलेला शब्द इतका लोकप्रिय झाला की, मूळ शुद्ध शब्द शब्दकोशात बंदिस्त राहिला आणि व्यवहारात तो कुणाच्या तोंडावर आलाच नाही.
म्हणूनच तुम्ही जर एखाद्या झेरॉक्स सेंटरमध्ये जाऊन शुद्ध मराठी शब्द वापरला, तर दुकानदार गोंधळून जाईल; पण ‘झेरॉक्स’ म्हटल्याबरोबर लगेच ’कॉपी’ मिळेल.
हा प्रकार फक्त झेरॉक्सपुरता मर्यादित नाही; ‘गूगल’, ‘बिसलेरी’, ‘थर्मॉस’सारख्या अनेक ब्रँड नावांनी मूळ शब्दावर अधिराज्य गाजवलंय.
👉आणि आता खरा उलगडा -
झेरॉक्सला मराठीत 'छाया प्रत', 'प्रतिमुद्रा' असे प्रतिशब्द आहेत. पण, ते शब्द आता लोकांना ऐकायला इतके वेगळे वाटतात की, व्यवहारात आपण सगळे फक्त ‘झेरॉक्स’ शब्दच वापरतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा