स्त्री / पुरुषांच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी घरगुती उपाय पाहुयात...
मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही अनेक दिवसांपासून पुरेशी झोप घेत नसाल तर त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात हे टाळण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप (किमान ६ ते ७ तास सलग) घ्या. विश्रांती ही महत्त्वाची आहे, त्यामुळे डोळ्याखालील ताण कमी होऊन ते काळे पडणार नाहीत.
👉सकाळी चहा केल्यानंतर चहाचे (चोथा) छोटे कण फ्रीजमध्ये ठेवा, त्यानंतर थंड झाल्यावर पुरुषांनी डोळ्याखाली हलक्या हाताने चोळा त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
👉टोमॅटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात, एक चमचा टोमॅटोची पेस्ट आणि लिंबाचा रस (१०थेंब) एकत्र करून मिश्रण तयार करावे, हे मिश्रण आपल्या डोळ्याखाली लावावे, दोन मिनिटे तसेच ठेवावे त्यानंतर थंड पाण्याने धुऊन काढावे.
👉बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत डोळ्या जवळील त्वचेला याचा लाभ मिळतो, बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते, रात्री डोळ्याखाली बदाम तेल लावावे हलक्या हाताने मसाज करावा सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवावा.
👉स्त्री पुरुषांच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी काकडीचे गोल काप महत्त्वाची भूमिका बजावतात तसेच डोळ्यांना आरामही मिळतो, काकडीचे काप चांगले क्लिनझर आहे, डोळ्याखालील काळी वर्तुळे जाण्यास मदत करते. काकडीची गोल काप दिवसातून दोन ते तीन वेळा दहा मिनिटे डोळ्यावर ठेवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
* COSSAC SQUATS फायदे...
मित्रांनो, हा व्यायाम मुख्यत्वे हिप्स (कूल्हे), हॅमस्ट्रिंग्ज, क्वाड्रिसेप्स (मांडीचे स्नायू), आणि इनर थाइज (आतील मांडी) या स्नायूंवर कार्य करतो आणि शरीराची लवचिकता सुधारण्यास मदत करतो.
👉कॉसॅक स्क्वॅटचे फायदे :
हा व्यायाम कूल्हे, गुडघे आणि घोट्यांची लवचिकता आणि हालचाल वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
👉स्नायू मजबूत होतात :
कॉसॅक स्क्वॅटमुळे क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग्ज, ग्लुट्स, आणि इनर थाइज यांसारख्या पायांच्या स्नायूंना बळकटी मिळते.
👉शरीराचे संतुलन सुधारते :
या व्यायामामुळे शरीराचा तोल सुधारतो, ज्यामुळे संतुलन साधण्यास मदत होते.
👉कॅलरीज बर्न होतात :
स्क्वॅट केल्याने जास्त कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
👉दुखापतीचा धोका कमी होतो :
नियमित सरावाने गुडघे आणि सांधे मजबूत होतात, ज्यामुळे दुखापतीचा धोका कमी होतो.
👉आसनात सुधारणा होते :
हा व्यायाम केल्याने शरीराची मुद्रा (POSTURE) सुधारते.
👉मानसिक समन्वय आणि स्थिरता :
कॉसॅक स्क्वॅटमुळे मज्जासंस्था (NERVOUS SYSTEM) सुधारते आणि कठीण परिस्थितीतही शरीराचे समन्वय राखण्यास मदत होते, ज्यामुळे दीर्घकाळ निरोगी राहते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा