👉कांदा, कलिंगड पिकातून बसवले आर्थिक गणित*
करडे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भाऊसाहेब बाळकू पळसकर यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून कांदा, ज्वारी, कलिंगड आणि मिरची पिकाचे योग्य नियोजन केले आहे. याचबरोबरीने कांदा बीजोत्पादन, रोप विक्रीतूनही नफा वाढविण्याचा पळसकर बंधूंचा चांगला प्रयत्न आहे.करडे हे शिरूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील साधारणपणे चार हजार लोकसंख्येचे गाव. या शिवारातील बहुतांश शेती जिरायती. दरवर्षी पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर बहुतांशी शेतकरी कमी कालावधीची पिके घेतात. या गावातील भाऊसाहेब आणि अशोक पळसकर हे प्रयोगशील शेतकरी. या दोघा भावांचे एकत्रित कुटुंब असून, वडिलोपार्जित २१ एकर शेती आहे.दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात कांदा, रब्बी हंगामात ठिबक सिंचनावर गावरान ज्वारी आणि उन्हाळी हंगामात कलिंगड आणि मिरची लागवड असते. ‘आत्मा’अंतर्गत ते कृषी मित्र म्हणून गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.
👉*कांदा शेतीचे नियोजन*
दरवर्षी खरीप, रब्बी हंगामात लागवड.
खरीप हंगामासाठी जून महिन्यात आणि रब्बी हंगामासाठी सप्टेंबर महिन्यात रोपवाटिका.खरिपात अर्धा एकर आणि रब्बी हंगामात एक एकरावर रोपवाटिका.रोपवाटिकेसाठी घरच्याच फुले समर्थ आणि गावरान गरवी जातीच्या बियाण्याचा वापर.
👉बीजोत्पादन*
गेल्या सहा वर्षांपासून अर्धा एकरावर फुले समर्थ आणि गावरान जातीचे बीजोत्पादन.
ऑक्टोबर महिन्यात लागवड, पाच महिन्यात बीजोत्पादन.काढणीला आलेल्या बियाण्यांची काढणी करून हाताने मळणी.
शेतकऱ्यांना पंधराशे रुपये प्रति किलो दराने बियाणे विक्री.
👉रोप विक्री*
दरवर्षी किती एकरावर कांदा लागवड करायची, याचा निर्णय घेऊन रोपवाटिका निर्मिती.शेतामध्ये गादी वाफे, साऱ्यांमध्ये बियाणे टाकून रोपवाटिका.स्वतःच्या शेतातील लागवडीनंतर उर्वरित शिल्लक रोपांची आठशे ते एक हजार रूपये साऱ्याप्रमाणे विक्री. यातून उत्पन्नाला हातभार.
👉लागवडीचे नियोजन*
कांदा लागवडीपुर्वी जमिनीत कोंबडीखत मिसळून पूर्वमशागत.शेतामध्ये वाफे पद्धत आणि गादीवाफ्यावर मजुरांच्या सह्याने योग्य अंतरावर रोप लागवड.लागवडीच्या वेळेस माती परीक्षणानुसार सिंगल सुपर फॉस्फेट, लागवडीनंतर आठ दिवसाने १९:१९:१९ आणि पहिल्या खुरपणीनंतर १०:२६:२६ ही रासायनिक खतांची मात्रा.कीड, रोग नियंत्रणासाठी नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार शिफारशीत फवारण्या.
👉ठिबक, तुषार सिंचनाचा वापर*
शाश्वित पाणी उपलब्धतेसाठी कूपनलिकांचे पाणी शेतातील विहिरीत सोडले.
कांदा पिकाला तुषार आणि ठिबक सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन.
काटेकोर खत, पाणी व्यवस्थापनातून कांद्याचे दर्जेदार उत्पादन.
👉काढणी*
मोठा, मध्यम आणि लहान अशा तीन गटात कांदा प्रतवारी. लहान आणि मध्यम कांद्याची जागेवर व्यापाऱ्यांना विक्री.मोठ्या कांद्याची साठवणूक.यासाठी शेतात पंचवीस टन क्षमतेची कांदा चाळ. कृषी विभागाकडून ८७,५०० रुपयांचे अनुदान.
कांदा चाळीमध्ये तीन ते चार महिने साठवणूक. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दर वाढल्यानंतर विक्री. त्यामुळे चांगले दर मिळण्यास मदत.
👉पीक आणि पूरक उद्योगातून उत्पन्न*
कांद्याचे एकरी सरासरी १५ टन उत्पादन. एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च.
गेल्या वर्षी चांगल्या दरामुळे प्रति किलोस सरासरी २५ ते २७ रुपये दर. यामुळे एकरी खर्च वजा जाता अडीच लाखांचे उत्पन्न. मात्र काही वेळेस कमी दर मिळाल्यानंतर उत्पन्नात घट.दोन एकर कलिंगड पिकातून दीड लाख रुपये, मिरचीतून एक लाख निव्वळ उत्पन्न.कांदा बीजोत्पादनातून एक लाख रुपये, कुक्कुटपालनातून दरवर्षी दीड लाखाचे उत्पन्न.जमीन सुपीकता आणि पीक फेरपालटावर भर.बाजारपेठेतील दरामुळे उत्पन्नात चढ-उताराचा अनुभव.
👉कुक्कुटपालनाची जोड*
पळसकर हे १९९८ पासून कुक्कुटपालन व्यवसायामध्ये आहेत. दोन शेडमध्ये वर्षभर टप्प्याटप्प्याने सातशे ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन केले जाते. कोंबड्यांची स्वतःच्या चिकन सेंटरवर विक्री केली जाते. त्यामुळे यातून चांगला नफा त्यांना मिळतो. तसेच शेतीसाठी कोंबडी खताची उपलब्धता होते. कोंबडी खतामुळे जमिनीची सुपीकता जपली जाते. तसेच पिकांचेही चांगले उत्पादन मिळते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा