🤔गावांच्या नावासमोर लावण्यात येणाऱ्या बुद्रुक व खुर्द या शब्दांचा अर्थ माहितीय का?
महाराष्ट्र भर फिरत असताना तुम्ही अनेक नगरे-महानगरे तसेच खेडी-पाडी पाहिली असतील.
परंतु त्याचबरोबर तुम्हाला अशी देखील गावे दिसली असतील ज्यांच्या नावापुढे बुद्रुक व खुर्द हे शब्द लावलेले असतात. उदाहरणार्थ - पिंपळगाव बुद्रुक-पिंपळगाव खुर्द.
याबरोबरच कसबा आणि मौजे अशीही नावे गावांच्या नावांमध्ये आलेली आढळून येतात.
गावांच्या नावासमोर लावण्यात येणाऱ्या या बुद्रुक आणि खुर्द, कसबा आणि मौजे या शब्दांचा अर्थ नव्या पिढीला माहीत नसतात.
👉चला तर जाणून घेऊया असे का…
शिवकाळापूर्वी महाराष्ट्रात आदिलशाही, मुगलशाही, कुतुबशाही यांचा मोठा अंमल होता.
त्यामुळे मराठी भाषेवरही इस्लामी भाषेचा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्यामुळे महाराष्ट्रात त्या काळी उर्दूमिश्रित भाषा बोलली जात होती.
त्यामुळे मराठी भाषेमध्ये अनेक फारशी, अरबी, इंग्रजी शब्द आले आहेत. या शासन काळात गावांना बुद्रुक आणि खुर्द अशी नावे देण्यात आली.
एखाद्या रस्त्यामुळे, नदी किंवा ओढ्यामुळे गावाचे दोन भाग पडत. ते दोन्ही भाग समान नसल्यामुळे गावाच्या मोठ्या भागाला बुजुर्ग (फारशी अर्थ मोठा) आणि छोट्या भागाला खुर्द (फारशी अर्ख छोटा किंवा खुद्द) म्हटले जाऊ लागले.
पुढे बुजुर्ग या शब्दाचा अपभ्रंश होऊन तो बुद्रुक असा प्रचलित झाला. त्यामुळे आज आपल्याला अनेक गावांच्या नंतर बुद्रुक किंवा खुर्द असे नाव लागलेले दिसून येते.
👉मौजे आणि कसबा*
काही गावांच्या आधी मौजे आणि कसबा अशी नावे लावलेलीही दिसून येतात. मौजे हा अरबी शब्द असून मौजअ अथवा मौझा या अरबी शब्दावरून हा शब्द आला. याचा अर्थ गाव असाच होतो.
तर कसबा हा शब्द उत्तर अमेरिकेतील Quasah या शब्दावरून आला आहे. मुघल आक्रमणाच्या काळात हे शब्द भारतात आले. कसबा याचा अर्थ बाजारपेठेचे ठिकाण असा होतो. हा शब्द महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य राज्यांतही वापरलेला दिसून येतो.
👉चिल्लर ते खुर्द*
बुजुर्ग या पासून बुद्रुक हा शब्द आला असला तरी खुर्द हा शब्द खुरदा या पासून म्हणजे चिल्लर या अर्थाने आला.
मोघलांच्या काळात बादशहाचा कुटुंब कबिला, त्यांच्या अगदी जवळचे लोक यांना बुजुर्ग म्हटले जायचे तर बाकीचे इतर लोक म्हणजे खुरदा चिल्लर. त्यावरूनच पुढे गावाची मुख्य वस्ती झाली बुद्रुक आणि गावाबाहेरील विरळ वस्ती म्हटली जाऊ लागली खुर्द.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा