👴उन्हाळ्यात डायबिटीज रूग्णांना 'या' गोष्टी महत्वाच्या!
उन्हाळ्यात डायबिटीजच्या रूग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान अशावेळी आपण काही खास पदार्थांचा आपल्या डाएटमध्ये समावेश करू शकता, ज्यामुळे ब्लड शुगर सुद्धा नियंत्रित होऊ शकते. सोबतच शरीर हायड्रेट राहण्यासह अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. त्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील.
● काकडी : उन्हाळ्यात सर्वात हेल्दी फूड म्हणजे काकडी. कारण यामध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरी खुप कमी असते. तर व्हिटॅमिन आणि पोषकतत्व भरपूर असतात. यामुळे ब्लड शुगर कमी होण्यास मदत होते.
● टोमॅटो : यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, फोलेट, फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी6, ई, सह अनेक असे गुण असतात जे डायबिटीजसाठी लाभदायक आहेत. तसेच ग्लायसेमिक इंडेक्स खुप कमी असल्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहते.
● बेरी : हे डायबिटीजच्या रूग्णांसाठी चांगले मानले जाते. संशोधनानुसार ब्लूबेरीची स्मूदी प्यायल्याने शरीरात इन्सुलिन वेगाने वाढते.
● वांगी : याचा ग्लायसेमिक इंडेक्स 15 असतो. यात भरपूर फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, तांबे, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि नियासिन आढळते. सोबतच इम्फ्लामेट्री गुण आढळतात जे ब्लड शुगरसह अनेक रोगांशी लढतात.
● शिमला मिरची : यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, थायमीन, फोलिक अॅसिड सारखे गुण आढळतात. यामुळे ब्लड शुगर कंट्रोल होते आणि वजन कमी होऊ शकते.
👍माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
✔️Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा