👉रेमेडिसिव्हिर म्हणजे नक्की काय? जाणून घ्या सविस्तर*
एकीकडे देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे रेमेडिसिव्हिर या औषधाविषयी चर्चा वाढली आहे. लोक या औषधासाठी वाट्टेल ते करायला तयार आहेत. परंतु, तरीही लोकांना हे औषध मिळत नाही. चला तर, या औषधाविषयी सविस्तर माहिती पाहुयात...
● हे एक अँटीव्हायरल औषध आहे.
● हे औषध अमेरिकन औषधनिर्माण संस्था गिलियड सायन्सेस यांनी उत्पादित केले आहे.
● हे औषध हेपेटायटीस सी आणि श्वसन विषाणू (आरएसव्ही) च्या उपचारांसाठी सुमारे दशकांपूर्वी तयार केले गेले होते.
● सध्याच्या या औषधाकडे आयुष्य वाचवणारे औषध म्हणून पाहिले जात आहे.
● सध्या गंभीर कोरोना रूग्णांच्या उपचारांमध्ये या इंजेक्शनचा सर्रास वापर केला जातो आहे.
● असे असले तरी डब्ल्यूएचओने हे औषध कोरोनावरील अचूक उपचार नाही, असे वारंवार सांगितलं आहे.
● हे औषध भारतात सिप्ला, झाइडस कॅडिला, हेटरो, मायलन, ज्युबिलंट लाइफ सायन्सेस, डॉ. रेड्डीज, सन फार्मा अशा अनेक कंपन्यांनी उत्पादित केले आहे.
गेल्या 6 महिन्यांत भारताने 10 लाखांहून अधिक रॅमिडिसीव्हिर इंजेक्शन इतर देशांमध्ये निर्यात केले होते. देशात याच्या कमतरतेचे आणखी एक कारण म्हणजे इंजेक्शनची ब्लॅक मार्केटिंगची समस्या होय.
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे रुग्णांच्या उपचारासाठी केंद्र सरकारने या औषधाच्या किंमतीत मोठी सूट दिली आहे. सरकारने किंमतीत सुमारे पन्नास टक्क्यांची कपात केली आहे.
👍माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा