👉कोरोना काळात अशी घ्या मनाची काळजी!
कोरोना व्याधी शरीराला बाधा करतो हे आपल्याला सर्वांच्या लक्षात आले आहेच. मात्र शरीर आणि मन हे वेगळे नाहीत अस आपला आयुर्वेद मानतो. व्याधी शरीराला झाला म्हणजे तो मनाला बाधा ही करतोच आणि मनाला व्याधी झाला तरी शरीराला बाधा पोचते.
कोरोनाच्या काळातील सर्वांना होणारा पहिला आजार म्हणजे भीती ज्याला आयुर्वेदात 'भ'य म्हणतात आणि भय वाढल्याने शरीरात वात हा दोष वाढतो आणि हाच वात दोष खरतर मनाला नियंत्रण करतो. जेव्हा भीतीमुळे हा वात वाढून मनाचा सत्व गुण कमी करतो तेव्हा खरंतर व्याधी वाढू लागतो याला विषाद म्हणजे दुःख म्हणतात आणि विषाद हे रोग वाढवणाऱ्या हेतूंमध्ये श्रेष्ठ सांगितले आहे.
भीती या एका गोष्टीने कोरोना हा कमी होण्याऐवजी जास्त प्रमाणात वाढतो आहे. मन हे चंचल असते आणि त्यात असंख्य विचार हे चालूच असतात पण हे विचार थांबवणे पूर्णपणे शक्य नसले तरी पण आपण ह्याच मनाला काही निवडक गोष्टींकडे वळवू शकतो ज्या मनावर जास्त लवकर कार्य करून मनातील भीती कमी करून चांगले सकारात्मक विचार करायला मदत करतात. ज्याने कोरोना हा व्याधी बरा होण्यास नक्कीच लवकर मदत होईल.
● सकाळी सूर्योदयाच्या आधी उठणे. याने निसर्गाकडून मिळणारी सकाळच्या वातावरणातील सकारात्मक ऊर्जा मिळून दिवस आनंदी जातो.
● सकाळी उठून प्राणायाम, कपालभाती,अनुलोम विलोम करणे. प्रत्येकी 10 मिनिटे सकाळ - संध्याकाळ करणे.
●चेहऱ्याला तेल लावून नंतर वाफ घेऊन मग दररोज नाकात 2-2 थेंब सकाळी -संध्याकाळी तेल सोडणे तीळ तेल किंवा औषधी सिद्ध तेल सोडणे.
● आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलणे. यामुळे मनावर आलेला अतिरिक्त ताण आपोआप कमी होऊन मन हलके होते आणि उत्साह वाढतो.
● सौम्य स्वरूपातील संगीत ऐकणे हे मनावर फार उत्तम प्रकारे काम करते यामुळे मनातील दोष आपोआप कमी होऊ लागतात.
● सौम्य गंधाच्या अगरबत्ती, अत्तरे,भीमसेनी कापूर यांसारख्या आवडीचा गोष्टी वापरणे. सुगंधी गोष्टी मनावर लवकर पोहोचतात आणि मन प्रसन्न होते.
● पथ्यकर पण मनाला आवडेल अशा प्रकारचा आहार घेणे. मनाच्या माध्यमातून शरीराला मिळणारी आहाररुपी ऊर्जा हि आरोग्य सुधारण्यास कामी पडते.
● मनाला आवडत असेल असे छंद जोपासणे जसे लिखाण करणे, चित्रे रेखाटणे, गाणी म्हणणे, विनोदी चित्रपट पाहणे. अशाने व्याधीबद्दल फारसे विचार येत नाही.
● दासबोध ग्रंथातील श्लोक ऐकणे. मनाची वाईट अवस्था कशा प्रकारे दूर करावी? याची माहिती यात अगदी सोप्या भाषेत मांडली आहे.
● भगवद्गीता, रामायण, महाभारत यासारख्या ग्रंथांचे वाचन करणे तसेच देवाचे नामस्मरण करत राहणे.याने मनाचे सत्व वाढून भीती आपोआपच कमी होते.
👍माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
✔️Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा