😨आता मेकअप करून नाही तर ; हसण्याने वाढेल तारुण्य...
आजकाल तरुण दिसणे कोणाला नाही आवडणार.तारुण्य टिकवण्यासाठी लोक खूपसा प्रयोग करीत असतात.कोणी नवनवीन महागडे प्रोडक्ट वापरत असतात तर ,आपल्या आवडीच्या माणसांसोबत मिळून मिसळून राहून लोक आनंदी राहतात.
🤣हसण्याचे फायदे*
📍लोकं आकर्षित होतात :
हसमुख राहणार्यांकडे लोक आपोआप आकर्षित होतात. हसल्यामुळे ताण कमी होतो, उत्साह निर्मित होतो. कामाची गुणवत्ता वाढते.
हसल्यामुळे शरीरात एंडोर्फिस हा फीलगुड घटक क्रियाशील होते ज्याने नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. हे पेनकिलर प्रमाणे कार्य करतं. हसल्यामुळे रक्तसंचार सुरळीत राहतं.
👦चेहरा टवटवीत राहतो.*
आनंदी राहिल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते आणि संसर्गासोबत लढण्याची क्षमता वाढते. त्याच बरोबर चेहरा टवटवीत राहतो व आकर्षित दिसतो.
🎭कॉमेडी शो पाहा*
आपल्याला सहसा हसू येत नसेल तर कॉमेडी शो बघा. याने ताण विसरुन आपण आनंदी व्हाल आणि मूड फ्रेश होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा