💰मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘सुकन्या समृद्धी योजना*
👨👩👧 तुम्ही एका मुलीचे पालक असाल तर नक्कीच तिच्या भविष्यासाठी दररोज फक्त 131 रुपये वाचवून तुम्ही 11 वर्षात मोठी रक्कम मिळवू शकता.
👉सुकन्या समृद्धी योजना*
10 वर्षांपर्यंतच्या मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी योजना सुरू करता येऊ शकते. मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत तिच्या नावे खात्यात ठराविक रक्कम भरावी लागते.
मुलीच्या 21 व्या वर्षी योजना मॅच्युअर होते. पण या योजनेत पैसे गुंतवणं म्हणजे मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत त्यामध्ये पैसे लॉक होतात.
18 वर्षानंतरही केवळ 50 टक्के रक्कम काढली जाऊ शकते. मुली 21 वर्षांची झाल्यावरच सगळी रक्कम काढता येऊ शकते.
👉असा मिळेल परतावा*
(उदा.तुम्ही 2021ला गुंतवणूक करण्यास प्रारंभ केला आहे. त्या वेळी तुमच्या मुलीचं वय 1 वर्ष आहे.)
● योजनेत तुम्ही दररोज 131 रुपये वाचवले तर महिन्याकाठी एकूण 3,930 रुपये होतील.
● जर दरमहा 3,930 रुपये जमा केले तर वर्षभरात ते 47,160 रुपये बनतील.
● जर ही गुंतवणूक फक्त 15 वर्षांसाठी केली तर एकूण गुंतवणूक 7,07,400 रुपये होते.
● यावर 7.6 टक्के वार्षिक व्याजानुसार तुम्हाला एकूण 12,93,805 रुपये व्याज मिळेल.
● 2021 ला सुरू केलेली योजना 2042 पर्यंत म्हणजे तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर परिपक्व होईल, त्यावेळी एकूण मॅच्युरिटी रक्कम 20,01,205 रुपये असेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा