👉वातावरणात बदल जाणवतो आहे,तेव्हा तुमची इम्युनिटी (रोग प्रतिकार शक्ती) वाढवा.या खालील पदार्थांचं सेवन करून...
वातावरण बदललं की सगळ्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास उद्धवतो. हिवाळा आणि पावसाळ्यात 80% लोकांना सर्दी-खोकला हा ठरलेला असतो.
या ऋतूत सगळे या सर्दी-खोकल्यावर वेगवेगळे उपाय शोधत असतात.सर्दी -खोकला झाला की, आपण खूपच अस्वस्थ होतो.हा काही गंभीर आजार नाही.यावर औषधांचाही कमी परिणाम होतो.तेव्हा जाणून घेऊया यावरील *घरगुती उपाय…*
🔰गरम दूध आणि हळदचं सेवन -
गरम पाणी किंवा गरम दूधात अर्धा चमचा हळद घालून प्यावी.सर्दी-खोकल्यात आराम मिळतो.हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो.हळद अँटीवायरल आणि अँटीबॅक्टेरिअल असते,
जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते.
🔰तुळशीची पाने खा -
बाळंतिणीने रोज 4 / 5 तुळशीची पान खाल्ल्यास जन्म झालेल्या बाळाला सर्दी खोकला होत नाही.त्याचबरोबर लहान मुलांना अर्धा चमचा तुळशीच्या पानांचा रस अर्धा चमचा मधासोबत रोज २ वर्षापर्यंत दिल्यास छातीच्या रोगापासून संरक्षण होते.
🔰तुळशीच्या पानांचा काढा -
4 तुळशीची पाने, 2 लवंगा, 1 वेलदोडा, दालचिनीचा छोटा तुकडा, थोडासा गवती चहा, 4 कप पाण्यात उकळा.पाण्याचा रंग बदलला की त्यात साखर घाला आणि हा काढा प्यायला द्या.
🔰लिंबू आणि मध -
लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्याला उपयुक्त ठरतो.दोन चमचे मधात अर्धा चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्यावं, खूप चांगला फायदा होतो.
🔰आल्याचा चहा -
आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत.मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो.सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं.काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं.
🔰फुटाणे खा -
खोकला येत असेल आणि छातीत कफ साठला असेल तर मुठभर फुटाणे खायला द्यावेत.हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये.हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात.ह्याने खोकला कमी होतो.
🔰कांद्याचं पाणी -
लहान बाळांना सर्दी व खोकला झाला असेल तर 1 छोटा कांदा बारीक चिरून घ्यावा.तोच कांदा ३ कप पाण्यात उकळत ठेवा.तो काढा उकळून अर्धा झाल्यावर त्याला पिवळा रंग येईल.त्यात थोडी चवीपुरती साखर घालून तो काढा दिवसातून 3-4 वेळा गरम किंवा कोमट करून बाळाला पाजावा.ह्या काढ्यामुळे छातीत साठलेला कफ उलटी होऊन किंवा शी मधून बाहेर पडतो.छातीतून येणारा आवाज बंद होतो.
🔰कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा