👉रुग्णाच्या मुळावर उठणारा रोग म्हणजे मूळव्याध...
⚜️मुळव्याधी आजार : कारणे व पथ्य -
मूळव्याध असो किंवा फिशर, भगंदर असो,
एक तर या सर्व रोगांचा त्रास फार भयानक असतो.शिवाय संकोचापायी यांचे वेळेवर योग्य निदान केले जात नाही, परिणामतः उपचारही मिळत नाहीत. त्रास फारच असह्य झाला तर पटकन गुण यावा म्हणून शस्त्रकर्माकडे झुकण्याचा कल वाढतो. क्वचित एखाद्या व्यक्तीमध्ये शस्त्रकर्म, क्षारसूत्र वगैरे उपचारांची आवश्यकता असली तरी केवळ बाह्योपचार रोगाला बरे करण्यास असमर्थ असतात याचेही भान ठेवायला हवे. मंद अग्नी, अपचनाची प्रवृत्ती आणि आतड्यांमधला कोरडेपणा, उष्णता हे सर्व बरे केल्याशिवाय या त्रासापासून कायमची सुटका होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे आहे.त्यामुळे या प्रकारचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून पहिल्यापासूनच आहार-आचरणात काळजी घ्यायला हवी. तरीही त्रास झालाच तर वेळेवर योग्य उपचार घेऊन तो मुळापासून बरा करण्यावर भर द्यायला हवा.
🔰मनुष्याच्या प्राणाला जाचत राहणारा हा रोग आहे.मूळव्याध गुदभागी होत असली तरी तिचे मूळ अपचनात असते.
🔰विशेषतः अग्नी मंद झाला, नियम न सांभाळता कधीही कसाही आहार घेतला, की मूळव्याधीची सुरवात होते. म्हणजेच मूळव्याधीला दूर ठेवायचे असेल, तर आधी आपल्या आहाराकडे व नियमितपणाकडे लक्ष पुरवायला हवे.
🔰शरीराच्या गुदभागी आग होत असली, दुखत असले, मोड जाणवत असला, शौचावाटे रक्त पडत असले, कंड सुटत असली की आपल्याला मूळव्याध झाली आहे असे रुग्णाला वाटत राहते; *पण प्रत्यक्षात मात्र ही लक्षणे परिकर्तिका (गुदभागी भेगा पडणे), मूळव्याध, भगंदर, रेक्टल प्रोलॅप्स (गुदाचा भाग बाहेर येणे) यांपैकी कोणत्या रोगाची आहेत हे निश्चित करणे आवश्यक असते.*
🔰आयुर्वेदात मूळव्याधीला अर्श म्हटले जाते. म्हणजे शत्रूप्रमाणे जो रोग प्राणाला जाचत राहतो, त्रास देतो तो अर्श होय. आयुर्वेदाने ज्या आठ मुख्य महाव्याधी सांगितल्या, त्यांत मूळव्याधीचा अंतर्भाव केला आहे, यावरूनच त्याचे गांभीर्य लक्षात येऊ शकते. प्रत्येक मूळव्याधीमध्ये गुदावाटे रक्त पडतेच असे नाही. वाताचा मुख्य सहभाग असणाऱ्या मूळव्याधीमध्ये वेदना खूप असतात. कफामुळे होणाऱ्या मूळव्याधीमध्ये कंड अधिक असते, तर पित्त आणि रक्तदोषामुळे झालेल्या मूळव्याधीमध्ये आग होते, तसेच रक्तही पडते. यासाठी तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष तपासणी करून घेणेही आवश्यक ठरू शकते.
⚜️सुश्रुतसंहितेत यासंबंधात म्हटले आहे, असंयमी व्यक्ती जेव्हा वात-पित्त-कफदोषांना प्रकुपित करणारे अन्न सेवन करते किंवा तशा प्रकारचे आचरण करते, तेव्हा हे बिघडलेले त्रिदोष एकेकटे, दोघे मिळून किंवा तिघे मिळून रक्तासह गुदप्रदेशात मोड तयार करतात. यालाच मूळव्याध असे म्हणतात.
👉व्याधीची कारणे :
🔰पचायला जड, जळजळ करणाऱ्या पदार्थांचे सेवन.
🔰अर्धवट शिजलेल्या अन्नाचे सेवन.
🔰डुक्कर, बकरी वगैरे प्राण्यांचे मांस अतिसेवन.
🔰मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे अति सेवन.
🔰अति मद्यपान, जड पाण्याचे सेवन.
🔰वेळच्या वेळी शरीरशुद्धी न करणे.
🔰अनुचित व्यायाम व मैथुनकर्म.
🔰दिवसा झोपणे.
🔰कडक वा विषम आसनावर अधिक काळ बसणे.
🔰अति वेगवान गाडीत बसून वारंवार प्रवास करणे.
🔰प्रवर्तन होताना कुंथावे लागणे.
🔰बाळंतपणाच्या वेळेस फार जोर लावावा लागणे.
🔰गर्भारपणाच्या शेवटी शेवटी गुदप्रदेशावर दाब पडणे.
🔰याखेरीज अगोदर खाल्लेले अन्न पचण्यापूर्वीच पुन्हा अन्न खाणे.
🔰परस्परविरोधी गुणाचे पदार्थ एकत्र मिसळून खाणे.
🔰मल-मूत्र-वायू वगैरे नैसर्गिक आवेगांना बळेच धरून ठेवणे.
🔰अधिक प्रमाणात मैथुन करणे वगैरे कारणांनीही मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो.
⚜️भगंदराची जखम चिघळते.
⚜️परिकर्तिका म्हणजे फिशर. यात गुदभागी भेगा, चिरा पडलेल्या असतात व त्यामुळे कात्रीने कापल्याप्रमाणे तीव्र वेदना होत असतात.
🔰यामध्ये वेदना तर असतातच, पण आगही खूप होते आणि मलाबरोबर रक्तही पडते.
⚜️भगंदरामध्ये गुदाच्या जवळ जखम, गळू झाल्याचा इतिहास असतो. ही जखम सहसा लगेच बरी होत नाही आणि बाहेरून बरी झाली तरी ती आतमध्ये गुदाच्या आतल्या बाजूपर्यंत वाढत जाते. जखमेतून पुन्हा पुन्हा रक्त येणे, पू येणे वगैरे तक्रारी दिसतात. काही व्यक्तींमध्ये एकाच वेळी तीन-चार जखमा असल्याचेही आढळते.
👉पथ्याच्या गोष्टी -
तांदूळ, गहू, यव, ज्वारी, दुधी, पडवळ, तोंडली, सुरण, परवर, आंबट चुका, घोसाळी, मूग, तूर, लोणी, तूप, ताक, आले, सुंठ, मनुका, आवळा.
👉अपथ्याच्या गोष्टी -
नाचणी, मका, उडीद, वाल, पावटा, चवळी, शेंगदाणे, रताळे, तळलेले तिखट पदार्थ, शेंगदाणे, लोणची, पापड वगैरेंचा अतिरिक्त वापर.
आपलं शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा