👉व्हॉट्सअॅपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी मागे घ्या : केंद्र सरकारचा आदेश*
व्हॉट्सअॅपला त्यांची नवीन प्रायव्हसी पॉलिसी मागे घेण्याचा आदेश केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान विभागाने दिला आहे.
👉माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचं मत काय?*
व्हॉट्सअॅपने प्रायव्हसी पॉलिसीत केलेले बदल माहिती व्यक्तिगततेतील सकारात्मक मूल्यांना धक्का देणारे आहे. त्यातून नागरिकांचे हक्क व हित दोन्हीही हिरावले जाणार आहे.
सरकारने व्हॉट्सअॅपला त्यांचे धोरण मागे घेण्यासाठी नोटिस पाठवली असून त्यांनी सात दिवसात त्यावर उत्तर देणे अपेक्षित आहे. त्यास समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यास योग्य ती पावले उचलणार असल्याचे म्हटले आहे.
👉नेमका काय इशारा देण्यात आलाय?*
◾२०२१ मधील प्रायव्हसी पॉलिसीतील बदल मागे घ्यावेत. हे धोरण सध्याचे भारतीय कायदे व नियम यांचे भंग करणारे आहे.
◾नागरिकांचे हक्क व हिताचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी असल्याने आम्ही भारतीय कायद्यानुसार वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करीत आहोत. मंत्रालयाने या धोरणाचा मुद्दा व्हॉट्सअॅपच्या प्रतिनिधींकडे उपस्थित केला होता.
◾भारतीय युजर्सला युरोपच्या तुलनेत या धोरणामुळे सापत्नभावाची वागणूक मिळणार आहे. मात्र व्हॉट्सअॅपचे धोरण हे समस्या निर्माण करणारे व बेजबाबदार स्वरूपाचे आहे.
◾व्हॉट्सअॅप त्यांच्याकडे जमा होणारी माहिती फेसबुकला देणार असल्याने या धोरणात व्यक्तिगततेचा भंग होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌐इंटरनेट एक्सप्लोरर 2022 मध्ये बंद होणार; 'या' सेवांवर होणार परिणाम...
🖥️ 'इंटरनेट एक्सप्लोरर' मागील 25 वर्षे सेवा देऊन आता बंद करण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. 15 जून 2022 या दिवशी इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार असून त्याची जागा मायक्रोसॉफ्ट एज् घेणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.
📣घोषणेत काय, पाहा...
✔️विंडोज् 10 वरील इंटरनेट एक्सप्लोररची जागा आता मायक्रोसॉफ्ट एज् घेणार आहे.
✔️इंटरनेट एक्सप्लोरर 11 डेस्कटॉप ॲप्लिकेशन हे 15 जून 2022 रोजी आता निवृत्त होणार असल्याची घोषणा मायक्रोसॉफ्ट एजचे प्रोग्रॅम मॅनेजर सीन लिंडरसे यांनी केली आहे.
✔️तसेच जुन्या वेबसाईटची जागा हे क्रोमिअम आधारित ब्राऊजर घेणार असून त्यासंबंधी अनेक व्यवहारही त्याने ॲडॉप्ट केले आहेत. इंटरनेट एक्सप्लोररचा उपयोग अजूनही आपल्याला अनेक कामांसाठी होतो.
गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्टने आपल्या मायक्रोसॉफ्ट टीमच्या वेब ॲपचा जसा इंटरनेट एक्सप्लोरर सपोर्ट काढून घेतला होता, तसंच या वर्षाखेर होणार आहे. त्यामुळे आता मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस 365, वनड्राईव्ह, आऊटलूक आणि इतर सेवांचा सपोर्ट 17 ऑगस्टनंतर बंद करण्यात येणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा