👉पोटात जळजळ आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय...
🔰काहीही खाल्ल्यानंतर बऱ्याच लोकांना पोटात जळजळ होण्यास सुरूवात होते. खासकरून जास्त मिरची मसाला खाल्यानंतर अशी समस्या सहज उद्भवते. ज्यांना ॲसिडीटी किंवा गॅसची समस्या होते. त्यांच्या पोटात नेहमी उष्णता असते. पोटातली उष्णतेची समस्या इतकी वाढते की रूटीन लाईफ देखी डिस्टर्ब होते.
छातीत आणि पोटात जळजळ होण्याचं मुख्य कारण म्हणजे अन्न पचनक्रियेसाठी तयार होणाऱ्या रसाची अनियमितता आहे. मात्र आपल्या किचनमध्ये असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यास केवळ आपल्या पोटातली जळजळच नाही तर पोटांशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.
🔰जेवण झाल्यानंतर जरूर गुळ खा*
जर का तुमच्या पोटात जळजळ होत असेल तर दररोज जेवण झाल्यानंतर गुळ खावा. गुळ खायचा नाही तर तो काही वेळासाठी तोंडात ठेवायचा. मग त्यानंतर जेणेकरून तो तोंडात विरघळेल. या प्रक्रिया जेवढी हळू होईल तेवढा त्याचा फायदा जास्त होईल. यामुळे पोटाची पचनक्रियेची क्षमता वाढते आणि जळजळ होण्याची समस्या दूर होते.
टोमॅटो आणि संत्राचं सेवन पोटातली उष्णता दूर करण्यासाठी टोमॅटो खूप फायदेशीर आहे. कच्च टोमॅटो आपल्या डाएटमध्ये दररोज घ्या. यामुळे ॲसिडीटी आणि पोटाची जळजळ या समस्या उद्भवत नाहीत. टोमॅटो शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवतात. अशाच प्रकारे संत्र देखील काम करतं.
🔰आल्याचा रस*
आल्याचा रस देखील पोटातली उष्णता आणि जळजळ ठिक करण्यासाठी उपयुक्त ठरतं. लिंबू आणि मधात आल्याचा रस मिसळून पाणी प्यायल्यानं पोटातली जळजळ थांबते. याव्यतिरिक्त आल्याच्या रसात एंटीबॅक्टीरिअल गुण देखील असतात. त्यासाठी हे पोटातील असलेल्या हानिकारक बॅक्टेरिया मारतो.
🔰बडीशेपचं पाणी*
१ कप उकळलेल्या पाण्यात १ चमचा बडीशेप मिसळून रातभर ठेवून द्या. सकाळी ते गाळून आणि त्यात एक चमचा मध मिसळून ते पाणी प्यावं. हे पाणी दिवसभरात ३ वेळा प्यायल्यानं पोटातली उष्णात आणि ॲसिडीटीची समस्या दूर होते. यामुळे पोट फुगणं आणि गॅसची समस्या दूर होते.
🔰ओवा*
एका पॅनमध्ये ओवा गरम करून त्याची पावडर तयार करा. यात काळं मीठ मिसळा. हे खाल्ल्यानंतर गरम पाण्यातून घेतल्यानं पोटातली उष्णता आणि ॲसिडीटी दूर होते.
🔰 कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा