👉ध्येय साध्य करण्यासाठी कनिष्ठांवर जबाबदाऱ्या सोपावणे गरजेचे*
एखादा उद्योजक किंवा कंपनीचा प्रमुख सगळीच्या सगळी कामं स्वतः करू शकत नाही. तसं करायला गेला तर त्याची दमछाक तर होईलच, पण कंपनीची उद्दिष्ट्ये आणि ध्येय कदाचित गाठताही येणार नाहीत. म्हणूनच लक्ष्य पूर्ण करण्यासाठी, उद्योजकाने किंवा व्यवस्थापकाने त्याच्या कनिष्ठांना त्याचे अधिकार सोपवावेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
😊स्वदेशी खा, ताकद वाढवा आणि आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवा!
महागडे व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि हाडांची झिज करणाऱ्या गोळ्या खाऊन हाड ठिसूळ करण्यापेक्षा पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी खाल्ल्या तर किती फायदा होईल याचा विचार जरूर करा आणि आजपासून पौष्टिक खाद्य सुरू करा.
उन्हाळ्यात नाचणीची अंबिल, ताक, मठ्ठा, लिंबु सरबत, आंबाडीचे व कोकम सरबत, सोलकडी इतर सरबते - शरीरात थंडावा निर्माण करुन दाह कमी करण्यासाठी असे अनेक पदार्थ मिश्रणाचे केमिकल कंपोजिशन पाहिल्यास त्या शरीरासाठी फायदेशीर दिसतील.
आपल्याला फक्त सण साजरे करायला शिकवले जाते. त्यामागचे सायन्स, त्याच वातावरणात तेच पदार्थ का खावेत? हे नाही शिकवले जात.
कारण पूर्वीची मुले आई वडिलांनी सांगितले म्हणून ऐकत. फार चिकित्सा करण्याच्या भानगडीत पडत नसत. आज तसे नाही. असंख्य प्रश्न विचारून भंडावून सोडतात.
आणखी एक कारण म्हणजे हे जर शिकवले तर बोर्नविटा कोण पिणार? आपले पूर्वज, लढाऊ योद्धे तर बोरनविटा, कॉम्प्लान पीत नव्हते ना? मग त्यांच्यात कमजोरी, ताकद कमी होती का? अहो एक आपला मावळा ५० शत्रूंशी एकटा लढायचा. कुठले प्रोटीन, क्रिएटिन होते का तेव्हा?
शिवाय आपले पूर्वज एवढे हुशार होते, ज्यांनी अफाट शोध लावले, ते कुठले व्हिटॅमिन, टॉनिक पीत होते? आपले पूर्वज हे सर्व देशी पदार्थ, नियमित नक्कीच खात असतील, म्हणूनच आत्ताच्या आपल्या पिढी पेक्षा त्यांच्यात ताकद जास्त होती. जास्त निरोगी होते आणि जास्त बुद्धिमान पण होते.
अहो, वयाच्या १८ - १९ वर्षी वागभट्टांचे संपूर्ण आयुर्वेद, आर्यभट्ट यांचे संपूर्ण भूमिती बीजगणिताचे ज्ञान होते. कुठले टॉनिक पीत होते ते? स्वतःला प्रश्न विचारा, आणि शिवाय तेव्हा कुठलेही हानिकारक केमिकल मारलेले पण अन्न नसायचे, गाईचे दूध पण शुद्ध.
आपली संस्कृती हजारो वर्षांपासूनचं सायन्स मध्ये अॅडव्हान्स आहे. म्हणून स्वदेशी खा, ताकद वाढवा, आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवा.
👍माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
✔️Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा