👉अशी घ्या लहान मुलांची काळजी!
लहान मुलांच्या आरोग्याविषयी व आजचा आजार आपण कशा पद्धतीने त्यांची काळजी घेऊ शकतो. याविषयी आज माहिती पाहुयात...
यांचे तीन टप्पे पडतात पूर्णपणे दूध घेणारे (क्षीराद), दुध व अन्न घेणारे (क्षीरान्नाद),अंदाजे 2वर्ष व पुढील वयाची अवस्था (अन्नाद). या तीनही अवस्थांमध्ये विचार करावा लागतो त्यापैकी आज पाहूयात क्षीराद केवळ दुधावरची बाळ.
सहा महिन्यापर्यंत बाळ आईच्या दुधावर असल्याने आईचा आहार, विहार यांचा विचार परिणाम दुधावर होताना दिसतो. म्हणून येथे जास्त लक्ष आईकडेच असणे गरजेचे आहे. बाळाला आपोआप उत्तम, बल वाढवणारे निरोगी दूध उपलब्ध होते.
पण पाचव्या-सहाव्या महिन्यात सुद्धा जर आई खूप दुपारी झोपणारी, भरपूर खाणारी, दही, केळी, आईस्क्रीम, पेस्ट्रीज, बेकरी पदार्थ असा सतत गुरु आहार घेणारी, आळशी, हालचाल कमी करणारी अशी असेल तर दूध जड होते.
अशी कफयुक्त दूध घेतल्याने बाळाचे दुध पचनाला एकतर उशीर लागतो. त्यामुळे ते कमी खेळते व सतत झोपून राहते शिवाय श्वास घेताना कफाची लक्षणे जाणवू लागतात.
बाळामध्ये नाकातून पाणी येणे, खोकला, सतत ताप, तोंडाला चव नसल्यामुळे दूध पिण्याची इच्छा नसणे, निपचित पडून राहणे ही लक्षणे आईच्या दुधाने जाणवू लागतात.
अशा काळात बाहेरील आजच्या विषाणूंचा संपर्क झाल्यास व्याधी आणखी तीव्र स्वरूप धारण करू शकतो, म्हणून जोपर्यंत आईचे दूध बाळाला चालू आहे तोपर्यंत आईने आहार-विहार याची जास्त काळजी घेणे गरजेचे.
रुची नसल्यामुळे असे बालक एक तर काही खात नाही, त्यामुळे वजन कमी होते चेहरा सुकलेला दिन, डोळे निस्तेज होतात, बारीक ताप सतत राहतो, बळेबळे पाजले तर अशी मुलं उलटी करतात.
जन्माला आल्यानंतर निसर्गता गुटगुटीत असणारी मुलं सहा महिन्यानंतर शोष झाल्यासारखी बारीक दिसू लागतात, किरकिर करतात वजन न वाढता हळूहळू कमी होत जाते.
अशा अवस्थेत आजच्या व्याधीने यासह पिडले तर वैद्य सल्ला घेऊन सितोपलादीसारखी औषधे मधासह, गुटीतील पिंपळी,वेखंड,अनंता, जेष्ठमध यांचाही वापर करावा.
सुंठ,जायफळ,वेखंड यांचा लेप वैद्य सल्ल्याने नाक,कपाळ,माथा,गळा,छाती या ठिकाणी उगळून गरम करून लावावा.हा कफ वितळण्यास मदत करून श्वास मार्ग मोकळा करण्यास मदत करतो.
कफ असताना पाण्याची वाफ देण्यापेक्षा ओवा गरम करुन त्याने कोरडे शेकणे, वावडिंग, बाळंत शेपा, ओवा यांची धुरी देणे श्वास मार्ग मोकळा करण्यास मदत करते. आईचे दूध कफयुक्त आहे का याची तपासणी काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात थेंब टाकून करावी.
कफदोष याने युक्त दूध असेल तर बंद करून शेळीचे दूध वैद्य सल्ल्याने सुंठ सिद्ध करून वापरावे त्याचे पचन सहज होते व त्यातून व्याधी बळावत नाही.
जे औषध बाळाला द्यावयाचे आहे त्याचा आईच्या स्तनाला औषधी स्वरुपात लेप लावावा व व बाळाला खायला द्यावे तेवढेच प्रमाण बाळाला पुरेसे ठरते.
👍माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
✔️Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा