👉घशातील खवखव हमखास दूर करेल ज्येष्ठमधाचा तुकडा*
वातावरणातील बदलांमुळे अनेकांना घशात खवखव जाणवते. घशातील या खवखवीचा त्रास औषधगोळ्यांपेक्षा काही नैसर्गिक उपायांनी आटोक्यात आणणं शक्य आहे. याकरिता ज्येष्ठमध फायदेशीर ठरते.
*याकरिता नियमित लहानसा ज्येष्ठमधाचा तुकडा चघळत रहा.*
👉ज्येष्ठमधाचे फायदे -
1️⃣मेंदूला चालना -
ज्येष्ठमधामुळे मेंदूच्या कार्याला चालना मिळते.यामधील अॅन्टिऑक्सिडंट गुणधर्म मेंदूंच्या पेशींना बळकटी देतात.
2️⃣हृदयाचे आरोग्य -
कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.
3️⃣रोगप्रतिकारशक्ती -
शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवश्यक घटक लिम्फोसाइट्स आणि मैक्रोफेज ज्येष्ठमधामध्ये असतात.
4️⃣हार्मोनल संतुलन -
ज्येष्ठमधातील फाइटोस्ट्रोजेनिक घटक महिलांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन नियमित ठेवण्यासाठी मदत करते.
मेनोपॉजचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.
5️⃣अॅन्टी बॅक्टेरियल -
शरीरात घातक मायक्रोबायल्सची वाढ रोखण्याची क्षमता ज्येष्ठमधामध्ये आहे.
यामुळे शरीरात व्हायरसचा धोका कमी होतो.
6️⃣अॅन्टी अल्सर -
ज्येष्ठमधामध्ये अॅन्टिऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म असल्याने पोटातील, आतड्यामधील, तोंडातील अल्सरचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
👉Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा