👉लहान मुलांची दिनचर्या कशी असावी व काय खाऊ नये?
कोरोना तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याची बातमी ऐकून अनेकजण अधिकच घाबरून गेले आहेत. पण हा आजार घाबरण्याचा किंवा काळजी करण्याचा नसून काळजी घेण्याचा आहे. हे आपण विसरत चाललो आहोत. दरम्यान लहान मुलांची दिनचर्या सांभाळी आणि काही पथ्ये सांभाळी तर धोका कमी होतो. त्यासाठी खालील गोष्टी मदत करतील.
👉लहान मुलांची दिनचर्या कशी असावी :
● सकाळी लवकर उठावे.
● उठल्यावर आयुर्वेदिक दंतमंजनाने दात घासावे.
● निर्विकार कवल चूर्ण टाकून पाण्याने गुळण्या करा.
● जिव्हा निर्लेखनने जीभ स्वच्छ घासा.
● लाकडी घाणा तीळ तेलाने मालिश करा.
● घाम निघेल असा व्यायाम करा. सूर्यनमस्कार, सांध्यांच्या हालचाली, कवायती योगासने करा.
● कोमट पाण्याने अंघोळ करा.
● अंघोळ करताना मसूर डाळ हळद यांचा वापर करावा.
● दिवा तीळ तेल वापरून दिवा लावावा.
● ओवा, वेखंड, बाळंतशेपा, वावडिंग, देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, भीमसेनी कापूर (निर्विकार धुरीचे साहित्य) वापरून धुरी कराव्या.
● ओंकार, मेडिटेशन, विश्वप्रार्थना म्हणावी.
● सकाळी नाष्ट्या ऐवजी जेवण भाजी पोळी तूप सॅलड ( गाजर, मुळा , बीट).
● दुपारी भूक लागल्यास डाळ भात तूप लिंबू आमसूल ओली हळद असू द्या.
● संध्याकाळी भूक लागल्यास फळे व ड्राय फ्रुटस खा.
● रात्री ७ वा भाजी भाकरी १ घास ३२ वेळा चावून खावा.
● रात्री ८ नंतर टिव्ही मोबाईल व डोळ्यावर प्रखर प्रकाश पडेल अश्या गोष्टी बंद कराव्या.
● जेवणानंतर दंतमंजन व गुळण्या करणे.
● शरीराचा विचार करून सकाळी उपाशीपोटी दूध तूप घ्यावे. (कफाचा त्रास, अपचन असणाऱ्यानी घेऊ नये).
● रात्री झोपताना कानात तीळ तेल, नाकात साजूक तूप, डोळ्यात तूप, तळहात तळपाय टाळूला तूप लावावे.
● १० वाजता झोपताना देवाचे नामस्मरण करून झोपा.
👉लहान मुलांना काय देऊ नये :
● प्रोटिन पावडर, चोको, कुरकुरे, केक, बिस्किट.
● चॉकलेट सॅण्डविच, पिझ्झा, बर्गर चायनीज.
● उसाचा रस, बर्फ, आईस्क्रिम.
● आंबवलेले, बाहेरचे, शिळे, उघडयावरचे पदार्थ.
● शेव, फरसाण.
● नाष्ट्याला ओटस, कॉनफ्लेक्स, उपीट, पोहे, चहाचपाती, दुधचपाती, दुधभात ,चहाबिस्किट,चहा व खारी व बेकरी.
● दुध व बोर्नविटा, बूस्ट, हॉर्लिकस, मिल्क शेक, शिकरण, मॅगी, इडली, डोसा, ढोकळा (इन्स्टन्ट बनवलेले सुध्दा), समोसा, वडा, भजी, भेळ मिसळ घेवु नये.
● सॉस, जॅम देऊ नये.
👍माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
✔️Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा