👉Pulse Oximeter म्हणजे काय ? व याचा वापर कशा पद्धतीने केला जातो ?
पल्स ऑक्सिमीटरचा वापर कोरोना काळात जास्तीत जास्त केला जात आहे.
👉पल्स ऑक्सीमीटर काय आहे?
पल्स ऑक्सिमीटर हे एक असं डिव्हाईस आहे जे शरीरातील ऑक्सिजनची सॅचुरेशन लेव्हल मोजण्यात आपल्याचा मदत करते. आरोग्य विभाग होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना वेळोवेळी त्यांची ऑक्सिजन लेव्हल विचारतो.
जर एखाद्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली असेल तर त्यांना वेळेवर रुग्णालयात पोहचवता येते.
👉हे डिव्हाईस कसं काम करतं?*
● पल्स ऑक्सिमीटर ऑन केल्यावर त्यात एक लाईट दिसतो.
● ऑक्सिमीटर तो लाईट आपल्या त्वचेवर सोडतो आणि ब्लड सेल्सचे रंग आणि त्यांची हालचाल डिटेक्ट करतो.
● आपल्या ज्या ब्लड सेल्समध्ये ऑक्सिजनची पातळी बरोबर असते त्या चमकणाऱ्या लाल रंगात दिसतात.
● तर,उर्वरित भाग हा गडद लाल रंगाचा दिसतो.
● योग्य ऑक्सिजन पातळी असलेले ब्लड आणि गडद रंगाचे ब्लड सेल्स यांच्यातील फरकाच्या आधारेच ऑक्सिमीटर डिव्हाईस ऑक्सिजन सॅचुरेशनला टक्केवारीत मोजतो आणि डिस्प्लेवर रीडिंग दाखवतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा