👉'या' घरगुती उपचारांनी मिळवा ॲसिडीटीपासून सुटका*
● बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आहारात बदल आणि जेवणाच्या वेळा अनियमित झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांना अपचन आणि ॲसिडीटीची समस्या जाणवते.
● यासाठी काही घरगुती उपचारांनी यापासून सुटका मिळवता येते. यासाठी घरातील आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तू देखील महत्वाच्या ठरतात.
1️⃣ओवा : ओव्यामध्ये थाइमोल असतं ओवा चिमुटभर मीठासोबत खाल्ल्याने किंवा रात्री झोपताना पाण्यात एक चमचा ओवा घालून सकाळी त्या पाण्याचं सेवन केल्याने पोटाची समस्या दूर होऊन अपचन होत नाही.
2️⃣बडीशेप : रात्रभर पाण्यात भिजवून बडीशेपचे सेवन, चहामध्ये बडीशेपचा वापर शिवाय गरम पाण्यासोबतही बडीशेपचं सेवन करू शकतो. स्वादासाठी यामध्ये साखरेचाही वापर करू शकतो. शरीराचं पचनकार्य निरोगी राहते.
3️⃣मध : एक चमचा मध गरम पाण्यात घालून त्याचं सेवन केल्यास ॲसिडीटीपासून आराम मिळतो. यात थोडं लिंबू पिळल्यास ते एक अल्कालिसिंग घटक तयार होतं जे ॲसिडीटीला मारक ठरतं.
4️⃣दूध आणि दही : दूध एक नैसर्गिक अँटासिड असून ते ॲसिडिटीला नैसर्गिकरित्या कमी करतं. दही देखील ॲसिडीटीला नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त ठरतं. दही प्रोबायोटीक असल्याने पचनासाठी देखील फायदेशीर ठरतं.
5️⃣कोथिंबीर : कोंथिबिरीच्या पानांचा रस पाणी किंवा ताकासोबत सेवन केला जातो. कोथिंबिरीच्या सुकलेल्या बियांच्या पावडरचा जेवणात वापर किंवा चहाही बनवला जातो. ॲसिडीटीमुळे होणारा ब्लोटींगचा त्रास कमी होण्यास मदत होते.
*Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा