* कलिंगड *
१) कलिंगड मुळे थकवा जातो.
२) भरपुर प्रमाणात मिनरल असल्यामुळे शरीराची झीज भरून निघते.
३) डोळ्याभोवती काळी वर्तुळे असतील तर निघून जातील.
४) चेहऱ्यावर, त्वचेवर ग्लो येण्यास मदत होते.
५) वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त. वजन कमी करत असताना उत्तम डायट.
६) कलिंगड खाण्यापेक्षा कलिंगडाचा ज्यूस प्यावा. त्यामध्ये काळी मिरीची थोडी पुड आणि थोडासा गूळ घालून ज्यूस प्यावा, थकवा जातो.
७) कलिंगडाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत. बिया थुंकण्यापेक्षा चाऊन खाव्यात.
८) कलिंगडाची साल चेहऱ्यावरून फिरवल्यास चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या नाहीश्या होण्यास मदत होते.
* कलिंगड खाण्याची योग्य वेळ कोणती?(Best time to eat Watermelon) *
कलिंगड कमी प्रमाणात खा, ते जास्त प्रमाणात कधीही खाऊ नका.अन्यथा तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटू शकते, गॅस होऊ शकतो आणि कदाचित पोटदुखीदेखील होऊ शकते. याशिवाय हे फळ जेवणाबरोबर खाऊ नये.
आयुर्वेदानुसार, कलिंगड खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तुम्ही नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणाच्या अगोदर खाऊ शकता.
याशिवाय कलिंगड तुम्ही जेवणानंतर तीन तासाने संध्याकाळी पाच-साडेपाच वाजण्यापूर्वी खाऊ शकता.
फक्त कलिंगड रात्री किंवा रात्रीच्या जेवणाबरोबर खाऊ नका. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी आणि पचनाच्या समस्या असलेल्या प्रत्येकाने हे फळ खाणे टाळावे किंवा कमी प्रमाणात खावे.
संकलित...
*डॉ रासकर हेल्थ केअर, छ. शिवाजी पेठ, कोल्हापूर.*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा