* उन्हाळ्यात सन टॅनिंगची समस्या आहे.?
तरं खालील घरगुती उपाय करुन पहा *
मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा काळवंडणे ही मोठी समस्या असते. कडक उन्हामध्ये फिरल्यास चेहऱ्यावर आणि शरीरावर तांबूस काळसर रंगाचे डाग उमटतात, त्यांना सनटॅन म्हटले जाते. उन्हाळ्यात त्वचा कोमल आणि स्वस्थ ठेवणे तसेच सनटॅनपासून बचाव करणे कठिण जाते. या समस्येवर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.
जाणून घ्या उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगच्या समस्येसाठी काही सोपे उपाय...
🔰 एका वाटीत थंड दही घ्या आणि त्यात थोडी हळद मिसळा. हे मिश्रण आंघोळीच्या वीस मिनिटं आधी सन टॅन झालेल्या जागेवर लावून ठेवा. चेहऱ्यावर, गळ्यावरही लावू शकता. यामुळे टॅनिंग कमी करण्यास चांगली मदत होते.
🔰 काकडीच्या काही चकत्या बारिक करुन त्यात दोन चमचे दूध पावडर आणि काही थेंब लिंबू रस मिसळा. हे मिश्रण टॅनिंग झालेल्या भागावर लावा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून एक वेळा हा प्रयोग केल्याने टॅनिंग कमी तर होतेच शिवाय त्वचा चमकदार होते.
🔰 टॉमेटो दोन भागात कापून त्याच्या एका भागाने त्वचेवर चांगला मसाज करा. किंवा टॉमेटोचा रस काढून तोही लावू शकता. यामुळे टॅनिंग कमी होण्यासोबत त्वचेचा रंग उजळण्यास सुद्धा मदत होते.
🔰 पपई केवळ खाण्यासाठईच नाही तर त्वचेसाठीही गुणकारी आहे. पपईमुळे त्वचा स्वच्छ होण्यास आणि रंग उजळण्यास मदत होते. पपईचा गर काढून तो हाता-पायांवर, चेहऱ्यावर लावल्याने चांगला फायदा होतो. पपईमुळे त्वचेला पोषणही मिळते.
🔰 त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी हळद फायदेशीर ठरते. टॅनिंग दूर करण्यासाठी हळद, लिंबू रस आणि कच्चं दूध हे मिश्रण टॅन झालेल्या भागावर लावल्याने फायदा होतो. या उपायाने अगदी पहिल्या काही दिवसातच फरक दिसू लागेल.
🔰 टॅनिंग घालवण्यासाठी लिंबूचा रस सर्वात सोप्पा आणि अतिशय गुणकारी उपाय आहे. लिंबू रस टॅन झालेल्या जागेवर लावा आणि 15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. यामुळे लवकर फायदा मिळतो. परंतु लिंबू रसाचे अधिक प्रमाणही ठेऊ नये, यामुळे त्वचेला नुकसान पोहचू शकते.
🔰 कच्चा बटाटा सोलून, किसून, पिळून त्याचा रस एका वाटीमध्ये घ्या. त्यात चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा मध घालून हे मिश्रण टॅनिंग झालेल्या भागावर १५ मिनिटे लावून ठेवा. नंतर चोळून चोळून धुवून घ्यावे. हा उपाय १० दिवसातून एकदा करावा.
संकलित...
*डॉ रासकर हेल्थ केअर, छ. शिवाजी पेठ, कोल्हापूर.*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा