जीवनसत्वे
*रोजच्या आहारातील जीवनसत्वे*
मित्रांनो,
मानवी शरीर उत्तम रीतीने निरोगी राहण्यासाठी, आहारामध्ये जीवनसत्वे अतिशय महत्त्वाची आहेत.
या जीवनसत्वांविषयी सविस्तर माहिती आपण आज घेऊया...
ही जीवनसत्वे पुढीलप्रमाणे:-
अ, ब, क, ड, ई (Vitamins - A,B,C,D,E)
आणि ही सर्व जीवनसत्वे रोजच्या आहारातून आपण प्राप्त करू शकतो...
उदा. हिरव्या भाज्या, फळे मोसमी फळे, अन्न धान्य, डाळी, अंकुरीत धान्ये, कडधान्ये, मांसाहार, अंडी, , मटण, मासे व डेअरी उत्पादने दूध, दही, लोणी, ताक, बटर, चीझ, इत्यादी.
🌱 *विटामिन A चे स्रोतः* विटामिन अ हे डोळे, त्वचा व उत्तम प्रतिकारशक्ति करता आवश्यक आहे, हे प्रामुख्याने, लोणी, दूध, अंडी, लाल मिरची, पालक, गाजर, केळी, टमाटे व सर्व लालसर फळे व भाज्यामधून मिळते. बीट, चिकू, रताळी, कोथिंबिर, मेथी....
🌱 *विटामिन. - B :-*
हे विटामिन बी12 हे बी काँम्प्लेक्सच्या आठ विटामिन पैकी आहे, याच्या अभावी, थकवा, सुन्न शरीर, बधिरता, कमी रक्तदाब, त्वचेवर घाव, डिप्रेशन, अँनिमिया, मेंदूच्या स्मृति कमी होणे, हायपो थायरॉईड, लकवा, हाय स्ट्रोक, चर्मरोग ई. आजार होतात.
*याचे स्रोतः-* सर्व ऋतूतील फळे, आवळा, टोमँटो, बीट, कलिंगड, सोयाबीन, डाळिंब, दुग्धजन्य पदार्थ, दही, लस्सी, टोंड दूध, चीज, बटर, सफरचंद, पनीर, आईस्क्रिम,
रात्री भात दह्यात कालवून सकाळी खाल्यास बी१२ भरपुर वाढते, अंकुरीत कडधान्ये खावीत. मेंढ्याचे मटण, अंडी ई. स्रोत आहेत...
🌱 *विटामिन C -* त्वचा, व रोग प्रतिकारशक्ति करता या विटामिनची गरज असते, यात सर्व आंबट फळे संत्री, मोसंबी, आंगूर, लिंबू, आंबा, चेरी, आवळा, पपई, लिची, किवी, केळी, पेरु, हिरवी मिरची, स्ट्रॉबेरी, ब्रोकोली व भाज्यामध्ये, आंबटचुका, काकडी, पालक, शेवगा शेंगा, फणस, वालपापडी, यात असते...
🌱 *विटामिन. D -* हाडे मजबूत राहतात, दात व केस देखिल यामुळे निरोगी राहतात. विटामिन डी चा प्रमुख स्रोत कोवळा सूर्यप्रकाश आहे, रोज सकाळी अर्धा एक तास उन्हात बसल्याने अथवा फिरल्याने हे विटामिन प्राप्त होते तसेच अंडी, शार्क लिव्हर आँईल, मासे, मटण, दूध, टूना फिश, पनीर, लोणी, ताक, गाजर, सोयाबीन, मशरूम, टोफू, ई. गोष्टी आहारात ठेवाव्यात... याव्यतिरिक्त सुका मेवा मध्ये काजू, बदाम, पिस्ता, आक्रोड, चारोळी, अंजीर, मनुका, किसमिस, मख्खाणे या सर्वातून अ,ब,क,ड, या सर्वच जीवन सर्वांची पुर्तता होते...
तेव्हा आपण ही सर्व जीवनसत्वे रोजच्या जेवणातून प्राप्त करून आपलं आरोग्य उत्तम ठेऊ शकतो.
*टीप:-* माहिती आवडल्यास सर्व ग्रुप वर शेअर करा, गरजूंना उपयोग होईल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा