.
_✝️आत्मिक भाकर✝️_
*त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.*
*मत्तय 13:11*
✝️✝️या वचन याचा अर्थ 👇👇✝️✝️
*13:11-12 येशू दाखल्यांचा उपयोग करण्याविषयी दोन कारणें सांगतात. सत्य प्रगट (उघड) करणे आणि सत्य लपविणे. काही गुप्त सत्य आहेत, रहस्यमय-गूढ गोष्टी आहेत ज्या परमेश्वराच्या साम्राज्याशी निगडीत आहेत, ज्या केवळ त्याच लोकांद्वारे ग्रहण केल्या जातात ज्यांनी मनबदल केला आहे आणि येशू प्रभूवर विश्वास करून परमेश्वराच्या राज्यात प्रवेश केला आहे. परूशी व सदूकी लोकांसारखे काही आहेत ज्यांनी ह्रदय कठोर केले, सत्य नाकारून मुद्दाम येशूंना नाकारले व अमान्य केले, अशांना येशू काय बोलतात हे कळलेच नाही, समजलेच नाही. येशूंचे कथन, बंडखोर व अविश्वासी राष्ट्राच्या न्यायावर आधारलेले होते मत्तय 13:12-15 “स्वर्गाच्या राज्याच्या”- मत्तय 4:17 ; वचन मत्तय 13:12 भौतिक वस्तूंविषयी सांगत नाही. पण आंतरिक सत्य समजून घेण्याच्या क्षमतेविषयी सांगते. जे लोक येशूंनी आणिलेला प्रकाश नाकारतात, ते लोक त्यांच्याजवळ असलेला (समजा असेल तर) प्रकाशही गमावतील. जे अधिकाधिक प्रकाश ग्रहण करतात त्यांना पूर्ण ज्ञान प्राप्त होऊन ते भरपूर होतील. यहूदी लोकांकडे ‘ते नव्हते’ कारण त्यांना ते घ्यावयाची इच्छाच नव्हती, त्यांनी ते घेणे नाकारिले. (तुलना करा- योहान 3:19-20; 9:39). “रहस्यमय”- ‘रहस्य’ हे नवीन करारातील असे सत्य आहे, जे परमेश्वर प्रगट करतो आणि जर परमेश्वराने ते प्रगट केले नसते तर आपण ते समजू शकलो नसतो.*
*तुलना करा- मत्तय 4:17 “स्वर्गाचे राज्य”- हा शब्द केवळ मत्तयाच्या सुवार्तेतच आढळतो. मार्क, लूक व योहान यांकरता “परमेश्वराचे राज्य”- असा शब्दप्रयोग करतात. बायबलमध्ये या विषयावरची शिकवण एकदम खास व वैशिष्टपूर्ण आहे. जवळजवळ 50 वेळी मत्तयात आणि 150 वेळा नवीन करारात याविषयीचा उल्लेख आहे. काही विशेष वचनें - तुलना करा- मत्तय 5:3-10; 6:10, 33; 7:21; 13:11; 16:28; 18:3, 23; 21:43; 24:14; 25:34; योहान 3:3; 18:36; प्रेषितांची कृत्ये 1:3, 6; 14:22; रोमकरांस 14:17; 1 करिं 4:20; 6:9-10; गलती 5:21; इफिसकरांस 5:5; कलस्सै 1:13; इब्री 1:8; प्रकटी 1:9; 11:15; 12:10 “परमेश्वराचे राज्य” हे त्या प्रकारचे शासन आहे ज्याचा स्त्रोत स्वर्गात आहे. ‘परमेश्वराचे राज्य’ म्हणजे परमेश्वराचे, आपल्या लोकांच्या मनावर असलेले शासन, कधी कधी याचा अर्थ असा होतो: त्यांच्या शासनाच्या बाहेरची परिसीमा, कधी कधी विश्वासींच्या मनांतील आंतरिक शासन. योहान बापतिस्मा करणारा आणि येशू या दोघांनी ‘राज्य’ जवळ येण्याविषयी सांगितले; केवळ यासाठी कारण येशू स्वर्गातून पृथ्वीवर आले होते, त्यांचे आगमन झाले होते; या पृथ्वीवरची त्यांची सेवा प्रारंभ होणार होती. (मत्तय 2:2; 21:5) म्हणूनच जुन्या कराराच्या दिवसांच्या तुलनेत, परमेश्वराच्या राज्याविषयी काहीतरी नवे घडण्याचे हे एक चिन्ह होते (स्तोत्र 47:2; उत्पत्ती 50:20); जे जुन्या कराराच्या दिवसांपेक्षा वेगळे होते.*
*Amen🙏*
*God bless you*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा