‘हा’ सिनेमा पाहून ‘दृश्यम’ अन् ‘अंधाधुन’ विसरून जाल, हिरोच असतो खलनायक, २ तास ३५ मिनिटे स्क्रीनवरून हटणार नाही नजर...
‘हा’ सिनेमा पाहून ‘दृश्यम’ अन् ‘अंधाधुन’ विसरून जाल, हिरोच असतो खलनायक, २ तास ३५ मिनिटे स्क्रीनवरून हटणार नाही नजर...
BEST MYSTERY THRILLER FILM ON PRIME VIDEO : प्राइम व्हिडीओचे सबस्क्रिप्शन असेल तर हा चित्रपट अजिबात चुकवू नका.
ELEVEN NAVEEN CHANDRA MOVIE ON PRIME VIDEO
या चित्रपटातील ट्विस्ट पाहून तुम्ही चक्रावून जाल.
BEST MYSTERY THRILLER FILM ON PRIME VIDEO : तुम्हाला जर मिस्ट्री-थ्रिलर कलाकृती पाहायला खूप आवडत असेल तर ओटीटीवर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे.
आज आम्ही तुम्हाला असाच एक जबरदस्त चित्रपट सुचवणार आहोत, हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करतोय. तुम्ही आतापर्यंत पाहिलेल्या मिस्ट्री-थ्रिलर सिनेमांपैकी ‘दृश्यम’ व ‘अंधाधुन’चे चाहते असाल तर हा चित्रपट त्यापेक्षाही वरचढ आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘इलेव्हन’.
‘इलेव्हन’ हा २०२५ मधील सर्वोत्तम मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लोकेश अजल्स दिग्दर्शित हा चित्रपट तमिळ व तेलुगू या दोन भाषेत उपलब्ध आहे. १६ मे २०२५ रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेला हा चित्रपट आता ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे.
नवीन चंद्रा, अभिरामी, रवी वर्मा, कीर्ती, शशांक व रिया या कलाकारांनी चित्रपटात दमदार अभिनय केला आहे. ‘इलेव्हन’ची संपूर्ण कथा एका सिरीयल किलरभोवती फिरते, तो जुळ्या भावंडांना लक्ष्य करतो आणि जुळ्या भावंडांपैकी एकाची निर्घृणपणे हत्या करतो. चित्रपटात सुरुवातीला दिसतं की एक मास्क घातलेला माणूस कारमधून उतरतो आणि डिक्कीतील मृतदेह बाहेर काढून जाळतो. त्यानंतर अशा अनेक घटना घडतात. या सिरियल किलरला शोधण्याचं काम अरविंद (नवीन चंद्रा) नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला सोपवलं जातं.
तपासात अरविंदला समजतं की किलर जुळ्या भावंडांचे खून करतो, तो मास्क घालून खून करतो तरी अरविंदला त्याचं नाव काय ते कळतं. इंटर्व्हलनंतर चित्रपटाच्या कथेत ट्विस्ट येतो आणि त्यानंतर क्लायमॅक्समध्ये धक्कादायक खुलासा येतो. २ तास मिनिटांचा ‘इलेव्हन’ चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो, ही त्याची खासियत आहे. तुमची शेवटपर्यंत स्क्रीनवरून नजर हटणार नाही. मुख्य म्हणजे या चित्रपटात तुम्हाला जो हिरो वाटतो, तोच व्हिलन असतो.
नवीन चंद्राचा ‘इलेव्हन’ सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओच्या टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर १० पैकी ७.५ रेटिंग मिळाले आहे. हा ओटीटीवर उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम मिस्ट्री थ्रिलर सिनेमांपैकी एक आहे. तुम्हाला हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर हिंदीत पाहता येईल.

Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा👍🏻
उत्तर द्याहटवा