"अपयश, दारूचे व्यसन, पत्नीचे दुसरे लग्न... झपाटलेला चित्रपटातील कुबड्या खविसची ही दुसरी बाजू"...
'कुबड्या खविस, कवट्या महाकाळ, गिधाड ' अशा अनेक खकनायकी भूमिका रंगवणारे कलाकार म्हणजेच बिपीन वर्टी होय.
बिपीन वर्टी यांनी मराठी सृष्टीत अभिनेते, दिग्दर्शक तसेच निर्माता म्हणून काम केले. पण या कामात म्हणावे तसे यश त्यांना मिळाले नाही आणि म्हणूनच त्यांचं आयुष्य संघर्षातून जाताना दिसलं.
बिपीन वर्टी हे सचिन पिळगावकर यांचे सख्खे आत्येभाऊ. एकाच वयाचे असल्याने दोघांचे शिक्षण एकाच शाळेत झाले. बिपीन वर्टी शालेय शिक्षणात हुशार होते त्यामुळे कॉलेजचे शिक्षणही त्यांनी पूर्ण केले. पुढे पिळगावकर यांच्या निर्मिती संस्थेत बिपीन यांनी काम केलं.
प्रथमेश फिल्म्स निमिती संस्थेतून सचिन पिळगावकर सोबत त्यांनी 'मायबाप' हा चित्रपट बनवला. पण दोघांमधले व्यवसायिक संबंध तुटल्यामुळे बिपीन यांनी 'खरा वारसदार' चित्रपटापासून स्वतःचे चित्रपट निर्मित, दिग्दर्शित केले. या चित्रपटाचे पटकथालेखन सचिनजींनी करावे अशी विनंती केली.
पण चित्रपटाच्या लेखनाचे श्रेय सचिनजींना देण्याचे त्यांनी टाळले. कारण एका नात्यातल्या व्यक्तीने सचिन नाव देऊ नये असा सल्ला दिला होता. त्यामुळे बिपीन सचिनजींपासून थोडेसे दूर राहू लागले. यामुळे व्यवसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात दोघांमध्ये थोडासा दुरावा आला.
पुढे बिपीन वर्टी सचिनजींच्या 'अशी ही बनवाबनवी', आत्मविश्वास' , 'भुताचा भाऊ, 'गंमत जंमत' अशा चित्रपटात दिसले.
प्रथमेश फिल्म्ससाठी दिग्दर्शन करण्यासाठी सचिनजींकडे बिपीन यांनी विनंती केली. तेव्हा सचिन पिळगावकर यांनी सौम्य शब्दांत त्याला नकार दिला.
प्रथमेश फिल्म्सच्या बॅनरखाली बिपीन यांनी 'एक गाडी बाकी अनाडी', 'डॉक्टर डॉक्टर', 'चंगु मंगु', 'फेका फेकी' अशा चित्रपटांची निर्मिती केली. पण यातले काही चित्रपट चालले तर काही पडले.
बिपीन वर्टी यांचे बालपणही खडतर होते. त्यांच्या आईचा स्वभाव अतिशय कठोर असल्याने नवऱ्यासोबत त्यांचे सतत भांडण होई. याचा वाईट परिणाम बिपीन यांच्यावर झाला होता.
वडिलांच्या नात्यातल्या 'शामल' या नावाच्या मुलीशी बिपीन यांचे लग्न झाले. शामल ४ महिन्यांची गरोदर असताना डॉक्टरांनी तिच्या गर्भाची वाढ व्यवस्थित होत नसल्याचे सांगितले. शामल ही गावाकडची साधी, सोज्वळ मुलगी त्यामुळे तिला यातलं काही कळत नव्हत. पण बिपीनच्या वडिलांनी ही गोष्ट बीपिनपासून लपवली. मूल जन्माला आल्यानंतर ते मतिमंद असल्याचे कळले. त्यानंतर बिपीन वर्टी खचून गेले. प्रथमेश फिल्म्स कंपनीही बंद केली आणि पूर्णपणे दारूच्या आहारी गेले.
बिपीनची ही अवस्था पाहून १९९५ साली सचिनजींनी 'तू तू मै मै' मालिकेत त्यांना पुन्हा एकदा संधी देऊ केली. सुश्रिया आर्टस् बॅनरखाली त्यांना काम देऊ केले. यामुळे बीपीनचे दारूचे व्यसन सुटेल आणि घर संसाराला हातभार लागेल असे सचिनजींनी वाटले.पण वर्षभरातच भावाच्या हाताखाली काम करतोय या विचाराने ते पुन्हा दारू पिऊ लागले.
७ ऑक्टोबर १९९७ रोजी वयाच्या ४० व्या वर्षी बिपीन यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर वर्षभरातच त्यांच्या आईवडिलांचेही निधन झाले. सचिन यांनी बेलापूर येथील स्पेशल चाईल्ड स्कुलमध्ये बिपीनच्या मुलाची व्यवस्था केली. बिपीनच्या निर्मिती संस्थेत बनवलेले ४ चित्रपटाचे हक्क विकून ते पैसे शामलच्या नावाने फिक्स डिपॉजीट करून टाकले. यातून मिळणारे पैसे बिपीनच्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि शामलला मिळतात.
दरम्यान सचिन यांनी शामलचे दुसरे लग्न लावून दिले. लग्नानंतर शामल दुबईला राहायला गेली. पण दुर्दैवाने तिच्या दुसऱ्या नवऱ्याला हृदयाचा झटका आणि हे दुसरे लग्नही फार काळ टिकले नाही. तीच्या सावत्र मुलांनी त्यांना स्वीकारलं नसल्याने त्या पुन्हा मुंबईत आल्या. तेव्हा सचिन यांनी प्रथमेश फिल्म्सच्या ४ चित्रपटांचे निगेटिव्ह विकत घेतले आणि ते पैसे शामलला देऊ केले. सचिन यांच्या दूरदृष्टीने शामलला आजतागायत आर्थिक अडचणी निर्माण झाल्या नाहीत हे विशेष !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
😱 18 PHOBIAS :
1. ARACHNOPHOBIA :
The fear of spiders - मकड़ियों का विकृत भय.
2. OPHIDIOPHOBIA :
The fear of snakes - एक ऐसी बीमारी जिसमें साँपों के काट खाने का डर लगा रहता है.
3. ACROPHOBIA :
The fear of heights - ऊँचाई का डर.
4. AGORAPHOBIA :
The fear of open or crowded spaces. People with this fear often wont leave home - भीड़ अथवा खुली जगह का भय.
5. CYNOPHOBIA :
The fear of dogs - कुत्ते से असाधारण भय.
6. CLAUSTROPHOBIA :
The fear of small spaces like elevators, small rooms and other enclosed spaces - लिफ्ट, छोटी जगहों या बंद कमरों से डर लगना.
7. MYSOPHOBIA :
The fear of germs. It is also termed as Germophobia or Bacterophobia - कीटाणु या रोग लगने का भय होना.
8. AEROPHOBIA :
The fear of flying - चलती हवा का डर.
9. TRYPOPHOBIA :
The fear of holes - छिद्रों से डर लगना.
10. THANATOPHOBIA :
The fear of death. Even talking about death can be hard - मृत्यु भय रोग.
11. GLOSSOPHOBIA :
The fear of public speaking - सबके सामने, जनता के सामने बोलने से डरना.
12. MONOPHOBIA :
The fear of being alone. Even while eating and/or sleeping - अकेले रहने से डर लगना.
13. ATYCHIPHOBIA :
The fear of failure - हारने से डर लगने वाला रोग.
14. ORNITHOPHOBIA :
The fear of birds - पक्षियों से डर लगने वाला रोग.
15. ENOCHLOPHOBIA :
The fear of crowds - भीड़ से डर लगने वाला रोग.
16. TRYPANOPHOBIA :
The fear of needles - सूई से डर लगने वाला रोग.
17. AQUAPHOBIA :
The fear of water - पानी से डर लगने वाला रोग.
18. HEMOPHOBIA :
The fear of blood. Even the sight of blood can cause fainting for such people - खून अथवा खून के दृष्य तक से डर लगने वाला रोग.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


👍
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा👌
उत्तर द्याहटवा