43 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 'शोले'च्या कमाईला टाकले होते मागे. 2 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाने केली होती 100 कोटींची कमाई. आजही मोडू शकले नाही कोणी रेकॉर्ड.
MITHUN CHAKRABORTY : सध्याच्या काळात एखाद्या चित्रपटाने 500 ते 1000 कोटी रुपयांची कमाई करणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. पण काही दशकांपूर्वी 100 कोटींचा टप्पा गाठणं हे खूप अवघड मानलं जात होतं.
आज सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार यांच्या चित्रपटांबाबत ‘100 कोटी क्लब’ची चर्चा होते पण या क्लबचा मानाचा पहिला विक्रम मात्र मिथुन चक्रवर्ती यांच्या नावावर आहे.
अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या करिअरला भरारी देणारा चित्रपट म्हणजे 'डिस्को डान्सर'. हा चित्रपट 1982 मध्ये भारतात प्रदर्शित झाला होता. भारतात या चित्रपटाने सुमारे 6 कोटी रुपयांची कमाई केली होती.
मात्र खरी कमाल झाली 1984 मध्ये जेव्हा हा चित्रपट सोव्हिएत संघात प्रदर्शित झाला. तिथे या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि केवळ सोव्हिएत संघातच नव्हे तर आशिया, पूर्व आफ्रिका, पश्चिम आफ्रिका, तुर्की आणि चीनसारख्या देशांमध्ये ही या चित्रपटाने विक्रमी कमाई केली.
👉जगभरात विक्रमी कमाई :
त्या काळात ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटाने जगभरात तब्बल 100 कोटी 68 लाखांची कमाई केली. या आकड्याने सर्व आधीचे रेकॉर्ड मोडले आणि त्या काळातील सर्वात यशस्वी भारतीय चित्रपट ठरला. मिथुन चक्रवर्ती यांच्या या चित्रपटाच्या आधी ‘शोले’ हा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता. पण 'डिस्को डान्सर'ने त्यालाही मागे टाकत बॉक्स ऑफिसच्या इतिहासात आपलं नाव कोरलं.
👉बायोग्राफीमध्ये खास उल्लेख :
मिथुन चक्रवर्ती यांची बायोग्राफी 'द दादा ऑफ बॉलिवूड' लिहिणारे लेखक राम कमल मुखर्जी यांनीही या चित्रपटाचा विक्रम आपल्या पुस्तकात नमूद केला आहे.
त्यांच्या मते, ‘डिस्को डान्सर’नंतर ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटाने 135 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला. पण भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिल्या 100 कोटी कमाईच्या चित्रपटाचा किताब नेहमीच मिथुन चक्रवर्तींच्या नावावर राहील.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Nice
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा👍🏻
उत्तर द्याहटवा