RESPECT
जीवनामध्ये जर व्यक्तीला कोणती गोष्ट महत्त्वाची असेल तर ती म्हणजे आदर, सन्मान. प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्याला समाजामध्ये आदर, सन्मान, मान मिळावा. समोरच्या व्यक्तीने आपला RESPECT करावा. जर तुमच्या आयुष्यामध्ये लोक तुमची RESPECT करत नसतील, तुम्हाला IGNORE करत असतील आणि याचे कारण तुम्हाला समजत नसेल तर त्याची कारणे आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.
आपण अशा काही सवयी पाहणार आहोत की ज्यामुळे लोक तुमचा RESPECT करत नसतील. त्या सवयी तुम्हाला सुधारायला हव्यात.
या सवयी अशा आहेत की ज्या कृती आपल्याकडून कळत-नकळत घडत असतात. त्याचा प्रभाव इतर व्यक्तींवर होत असतो तसेच आपल्या जीवनावर देखील होत असतो. त्यामुळे इतर व्यक्ती तुम्हाला IGNORE करत असतात किंवा हवा तितका RESPECT मिळत नाही, मान सन्मान मिळत नाही, आदर मिळत नाही.
जर तुम्ही या सवयी सुधारल्यात तर नक्कीच तुम्हाला इतरांकडून RESPECT मिळेल. त्याचबरोबर लोक तुमचे इतके चाहते होतील की त्यांना तुमच्यासोबत राहणे आवडू लागेल, ते तुमच्याशिवाय राहुच शकणार नाहीत.
1️⃣ त्यातील पहिली सवय म्हणजे तुम्ही समाजाचे बोलणे ऐकून घेत नाही :
आपल्या सभोवताली काही अशा व्यक्ती असतात की ज्या व्यक्ती आपले बोलणे बोलतच राहतात. समोरच्या व्यक्तीचे बोलणे त्यांना ऐकायचे नसते आणि हेच इतरांना आवडत नाही.
यामुळे लोक तुम्हाला IGNORE करत असतात. लोकांना अशाच व्यक्ती आवडतात ज्या आपले म्हणणे देखील ऐकून घेतील व आपण ही त्यांचे ऐकून घेऊ. जर आपण त्यांचे संपूर्ण बोलणे झाल्यावर आपले बोलणे बोलले तर नक्कीच ते तुम्हाला RESPECT देतील.
2️⃣ दुसरी सवय म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त बोलणे :
आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात की ज्या प्रमाणापेक्षा जास्त बोलत असतात. अशा व्यक्ती कोणालाही आवडत नाहीत. कारण त्यांची बडबड विनाकारण चालूच असते.
त्यांच्या बडबडण्याने इतरांना कंटाळा येतो आणि अशाच मुळे लोक त्यांना RESPECT देत नाहीत. म्हणून आपण आपल्या बोलण्याचे परीक्षण करावे की आपणही जास्त बोलत तर नाही ना. कारण जास्त बोलणाऱ्या व्यक्तींना कधीही लोक RESPECT देत नसतात.
3️⃣ तिसरी सवय म्हणजे इतरांची सतत निंदा करणे :
काही व्यक्ती अशा असतात की त्या कायम इतरांची निंदा करत असतात. एखादी व्यक्ती वाईट असेल तर तिची निंदा केली जाते. परंतु प्रत्येक व्यक्तीबद्दल खराब बोलणे ही सवय अत्यंत वाईट आहे.
आपण सतत कोणा ना कोणा विषयी वाईट बोलत असू तर समोरच्या व्यक्तीच्या मनात हे येतेच की त्याच्या माघारी आपण त्याच्याही विषयी कोणासमोर तरी निंदा करणारच. मग लोक आपल्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असतात व आपल्याला इग्नोर करत असतात. म्हणून आपण इतरांची निंदा करू नये. तरच व्यक्ती तुम्हाला RESPECT देतील.
4️⃣ चौथी सवय म्हणजे स्वतःची चूक कधीही मान्य करत नाही :
काही व्यक्ती अशा असतात की त्या आपली चूक कधीही मान्य करत नसतात. परंतु इतरांच्या नेहमी चुका काढत असतात. त्यांनी कोणतेही काम करू दे त्यामध्ये कोणती ना कोणती चूक ते शोधून काढतच असतात. अशा व्यक्तींपासून लोक दूर राहत असतात.
कारण ते आपण किती बरोबर आहेत हेच दाखवत असतात व इतर किती चुकीचे आहेत हे सांगत असतात. म्हणून असे लोक इतरांना आवडत नाही. त्यांना लोक RESPECT देत नाही. म्हणून इतरांच्या चुका दाखवण्यापेक्षा आपण कुठे चुकत आहोत त्याच्याकडे लक्ष द्यावे. तरच लोक तुम्हाला RESPECT देतील.
5️⃣ पाचवी सवय म्हणजे कायम मला वेळ नाही असे म्हणणे :
वेळेला महत्त्व देणे हे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रत्येक वेळी इतरांसाठी सदैव वेळ देणे हेही चुकीचे आहे. परंतु प्रत्येक वेळी जर आपण असेच म्हणत राहिलो की मला वेळ नाही, तर आपण कितीही यश कमावले तर त्या यशामध्ये आनंदामध्ये सामील होण्यास, तो साजरा करण्यासाठी आपल्या सोबत कोणीही राहत नाही. म्हणून प्रत्येक वेळी कधीही असे म्हणू नये की मला वेळ नाही. वेळात वेळ काढून आपण आपल्या मित्रांना भेटायला जावे. नातेवाईकांना भेटायला जावे. तरच लोक तुम्हाला RESPECT देतील.
6️⃣ सहावी सवय म्हणजे स्वतःबद्दल बढाया मारणे :
आपले मिळालेले यश इतरांना सांगणे हे चुकीचे नाही. परंतु स्वतःची इतकी स्तुती करणे की इतरांना आपण कमी लेखू लागतो. त्यामुळे लोक आपल्यापासून दूर जाऊ लागतात. कारण लोकांना अशा व्यक्ती अजिबात आवडत नाहीत की ज्या व्यक्ती कायम स्वतःचीच स्तुती करत असतात. स्वतः किती महान आहोत तेच सांगत असतात. अशा व्यक्तींना लोक कधीही RESPECT देत नाही. म्हणून स्वतःबद्दल बढाया मारणे. ही सवय सोडून द्यावी. तरच लोक तुमचा RESPECT करू लागतील.
7️⃣ आणि शेवटची सातवी सवय म्हणजे सतत नकारात्मकतेने विचार करणे :
जर तुम्ही सतत नकारात्मक विचार करत राहाल, तुम्ही संपूर्ण NEGATIVITY ने भरलेले आहात. म्हणजे कोणत्याही गोष्टींमध्ये ती गोष्ट किती चांगली आहे हे सांगण्यापेक्षा ती गोष्ट किती वाईट आहे हेच सांगत राहिला, त्यामधली सकारात्मकता शोधत नसाल, तर अशा व्यक्तींपासून लोक दूर राहू लागतात. त्या व्यक्तींना कधीही लोक RESPECT देत नाही.
कारण ही व्यक्ती सतत NEGATIVE विचार करते असे म्हणून या व्यक्तीजवळ कोणीच येत नाही. त्यांना कोणीही RESPECT देत नाही. म्हणून सतत NEGATIVE विचार करणे सोडून द्यावे. तरच लोक तुम्हाला RESPECT देतील.
👉प्रमाणात बोललो तरच लोक तुम्हाला RESPECT देऊ लागतील. वयामुळे मान मिळू शकेल पण आदर मिळवण्यासाठी आपली इतरांशी असलेली वागणुकच चांगली पाहिजे.
👉टीप : माहिती आवडल्यास नांवासह सर्व ग्रुप वर शेअर करा, गरजूंना उपयोग होईल🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा👍🏻
उत्तर द्याहटवा