मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी (e-KYC) करूनही ‘या’ महिलांचे 1500 रुपये होणार बंद...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० अनुदान मिळते. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक आहे. तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली असली तरी, तुमच्या माहितीची डिजिटल तपासणी (Digital Verification) सुरू झाली आहे. या तपासणीत काही महिला अपात्र ठरू शकतात आणि त्यांचा हप्ता बंद होऊ शकतो. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान आधार कार्डाद्वारे कुटुंबाच्या उत्पन्नाची, मालमत्तेची आणि इतर सरकारी योजनांच्या लाभाची माहिती तपासली जात आहे. या ‘नऊ महत्त्वाच्या’ कारणांमुळे तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. ई-केवायसी नंतर हप्ता बंद होण्याची ‘नऊ’ प्रमुख कारणे... ई-केवायसीमध्ये तुम्ही दिलेला आधार क्रमांक (स्वतःचा आणि पती/वडिलांचा) आणि तो विविध सरकारी डेटाबेसशी लिंक असल्यामुळे, योजनेच्या निकषांची तपासणी केली जात आहे. जर खालीलपैकी कोणतीही अट पूर्ण झाली नाही, तर तुमचा हप्ता त्वरित बंद होऊ शकतो. १. उत्पन्नाची आणि करदात्याची मर्यादा : लाभार्थी महिलांच्या कुटुंबासाठी वार्षिक उत्पन्न मर्य...

*झोपेचा सौदा...

मित्रांनो, नेटफ्लिक्स आज उघडपणे म्हणतंय की त्यांची स्पर्धा माणसाच्या झोपेशी आहे... तो जितका कमी झोपेल आणि नेटफ्लिक्स बघण्यात वेळ घालवेल तितकं बरं..!  खरंतर नेटफ्लिक्सने हे उघडपणे सांगितलं इतकंच बाकी अमेझॉन, हॉटस्टार यांचीही स्पर्धा झोपेशीच आहे. इतकंच कशाला या सगळ्या आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म आधी आलेल्या युट्युबनेही न बोलता कायम आपल्या झोपेशी स्पर्धा केली आहे. फेसबुकही तेच करतंय. झोपेतून उठत नाही तोच फेसबुक आणि व्हाट्सअप उघडणारे अनेकजण आहेत. मध्यरात्री अचानक उठून फेसबुक व व्हाट्सअप बघणार्‍यांची आणि मग त्याच तंद्रीत परत झोपणार्‍यांची संख्या वाढतेय...  रात्री झोपताना तरी किमान फोनचा डाटा बंद केला पाहिजे हा विचार आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. रोजचा दीड-दोन जीबी डाटा ही स्वस्ताई नाहीये, त्या दीड-दोन जीबीसाठी आपण झोपेच्या निमित्ताने प्रचंड मोठी किंमत चुकती करतो आहोत. ज्याचा संबंध थेट आपल्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक आरोग्याशी आहे. आपल्याला आभासी जगात एखादी गोष्ट स्वस्तात किंवा फुकट मिळते म्हणजे ती खरोखर फुकट नसते. फेसबुक वापरण्याचे खिश्यातून पैसे आपण देत नाही. नेटफ्...

*कफनाशक "ज्येष्ठमध"...

*गुणधर्म* १) स्निग्ध, मधुर व थंडावा देते. २) त्रिदोषांचे शमन करते. ३) त्वचेचा वर्ण सुधारतो. ४) दृष्टी व आवाज सुधारते. ५) केशवर्धक. ६) सूजनाशक. ७) पित्तशामक ८) रक्तशुद्धीकर ९) शुक्रवर्धक. 👉उपयोग : १) घशातील सूज, कफ / खोकला व क्षय यांवर उपयोगी. २) श्वासमार्गातील व आतड्यातील सूज, व्रण / अल्सर व जळजळ यावर उपयोगी. ३) कोणत्याही कारणाने आलेली अशक्तता कमी होते - शक्ती येते. ४) कंड, खरूज, सूज इ. त्वचाविकारात उपयोगी. 👉वापरण्याची पद्धती : १) चाटण : अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण + एक चमचा मध. मुख्यतः (घशासाठी व कफासाठी) २) गुळण्या : अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण + अर्धा कप पाणी उकळवणे - (आवाजासाठी) ३) उकळवून गाळून पिणे : अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण + अर्धा कप पाणी उकळवणे व दिवसभरात ३ वेळा पिणे - (कफासाठी)  संकलित... *टीप : आरोग्य विषयक माहिती आवडल्यास पुढे जरूर पाठवा गरजूंना उपयोग होईल. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *पित्त - कारणे व लक्षणे* मित्रांनो, पित्ताचा त्रास का होतो...?  प्रामुख्याने चमचमीत, मसालेदार आहार, चुकिची जीवनशैली, मानसिक ताण तणाव, अपुरी झोप यांमुळे आज अनेक आरोग्याच्या तक्रारीबरोबरच पित्त...

*COSSAC SQUATS फायदे...

मित्रांनो, हा व्यायाम मुख्यत्वे हिप्स (कूल्हे), हॅमस्ट्रिंग्ज, क्वाड्रिसेप्स (मांडीचे स्नायू), आणि इनर थाइज (आतील मांडी) या स्नायूंवर कार्य करतो आणि शरीराची लवचिकता सुधारण्यास मदत करतो.  *कॉसॅक स्क्वॅटचे फायदे : हा व्यायाम कूल्हे, गुडघे आणि घोट्यांची लवचिकता आणि हालचाल वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.  *स्नायू मजबूत होतात : कॉसॅक स्क्वॅटमुळे क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग्ज, ग्लुट्स, आणि इनर थाइज यांसारख्या पायांच्या स्नायूंना बळकटी मिळते.  *शरीराचे संतुलन सुधारते : या व्यायामामुळे शरीराचा तोल सुधारतो, ज्यामुळे संतुलन साधण्यास मदत होते.  *कॅलरीज बर्न होतात : स्क्वॅट केल्याने जास्त कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.  *दुखापतीचा धोका कमी होतो : नियमित सरावाने गुडघे आणि सांधे मजबूत होतात, ज्यामुळे दुखापतीचा धोका कमी होतो.  *आसनात सुधारणा होते : हा व्यायाम केल्याने शरीराची मुद्रा (POSTURE) सुधारते.  *मानसिक समन्वय आणि स्थिरता : कॉसॅक स्क्वॅटमुळे मज्जासंस्था (NERVOUS SYSTEM) सुधारते आणि कठीण परिस्थितीतही शरीराचे समन्वय राखण्यास मदत होते, ज्यामुळे...

👉 लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर चे पंधराशे रुपये खात्यावर जमा; तुम्हाला मिळाले का? येथे यादी पहा👈 लाडक्या बहीणींना, सप्टेंबर चे १५०० रुपये आले; यादी जाहीर, तुमचं नाव चेक करा...

महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू केलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेची लाभार्थी यादी आता जाहीर झाली आहे. ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता, त्या आता घरबसल्या त्यांच्या मोबाईल फोनवरून यादीत आपले नाव तपासू शकतात. या यादीत नाव असलेल्या महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजना काय आहे? या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा आहे. त्यांना कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता याव्यात, तसेच शिक्षण, आरोग्य आणि पोषण यावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी ही मदत दिली जात आहे. लाभार्थी : महाराष्ट्रातील २१ ते ६५ वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत. आर्थिक मदत : पात्र महिलांना दर महिन्याला ₹१५०० ची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी (DBT) द्वारे जमा केली जाते. यादीमध्ये तुमचं नाव कसं तपासायचं? माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही, हे तपासण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला बाहेर कुठेही जाण्याची गरज ...

*अन्न घाईघाईने खाल्ल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या या "तीन" टिप्स...

मित्रांनो, घरातील मोठे लोक आपल्याला बालपणीच शिकवतात की, अन्न चांगलं बारीक चावून चावून खाल्लं पाहिजे. तर आयुर्वेदानुसार, एक घास ३२ वेळा चावून खाल्ला पाहिजे. अन्न व्यवस्थित चावून खाल्लं तर पचन चांगलं होतं. तसेच त्यातील पोषक तत्वही शरीरात अवशोषित होतात. पण बरेच लोक घाईघाईत जेवण करतात ते अन्न व्यवस्थित चावून खात नाहीत. जे शरीरासाठी खूप नुकसानकारक ठरतं. इतकंच नाही तर अन्न व्यवस्थित चावून खाल्लं गेलं नाही तर वजनही वाढू शकतं. 1.घाईघाईने जेवण केल्यास वजन वाढतं : अन्न नेहमी व्यवस्थित चावून खाल्लं पाहिजे. ही एक चांगली सवय आहे. पण अन्न घाईघाईने खाणं एक चुकीची सवय आहे. अन्न नेहमी शांतपणे चावून खावं. घाईघाईने खाल्ल्यास मेटाबॉलिक डिसऑर्डर होण्याचा धोका खूप जास्त वाढतो. याने तुमचं मेटाबॉलिज्म स्लो होतं, अशात शरीरात फॅट जमा होऊ लागतं. ही सवय वेळीच सोडली नाही तर तुम्ही लवकर लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. अन्न व्यवस्थित हळुवार चावून खाणाऱ्यांच्या तुलनेत घाईघाईने खाणाऱ्यांना मेटाबॉलिज्म डिसऑर्डरचा धोका ४०० टक्के अधिक जास्त असतो. 2.घाईघाईने जेवण केल्यास कसं वाढतं वजन? जेव्हा तुम्ही अन्न हळूहळू चावून खाता तेव्ह...

*INTERVAL WALKING म्हणजे काय?

संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी "Interval Walking" आहे खूप फायदेशीर.समजून घ्या योग्य पद्धत... मित्रांनो, इंटरव्हल चालण्यामुळे शरीराला जास्त थकवा येत नाही आणि लवकर रिकव्हरही होते. इंटरवलदरम्यान तुम्ही सामान्य श्वासोच्छ्वास करता, ज्यामुळे तुम्हाला तुमचे फिटनेस ध्येय गाठणे सोपे होते. बरेच लोक चालण्याने वजन कमी होत नाही म्हणून वैतागून जातात आणि शेवटी ते चालणे बंद करतात. तुमच्यासोबतही असेच काही घडत असेल तर इंटरव्हल चालणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वास्तविक, इंटरव्हल वॉकिंगमध्ये (INTERVAL WALKING) तुम्हाला लवकर-लवकर चालावे लागते, जेणेकरून जास्त चरबी जाळली जाऊ शकते आणि वजन झपाट्याने कमी (WEIGHT LOSS) होते. या चालण्याच्या दरम्यान शरीराला अनेक ब्रेक दिले जातात आणि प्रत्येक ब्रेकसाठी एक वेळ निश्चित केली जाते. इंटरव्हल चालण्यामुळे शरीराला जास्त थकवा येत नाही आणि लवकर रिकव्हरही होते. इंटरवलदरम्यान तुम्ही सामान्य श्वासोच्छ्वास करता, ज्यामुळे तुम्हाला तुमचे फिटनेस ध्येय गाठणे सोपे होते. अशा प्रकारे, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर इंटरवल ट्रेनिंग हा (INTERVAL WALKING FOR WEIGHT LOSS...

किडनी(KIDNEY) निरोगी ठेवण्यासाठी...

मित्रांनो, किडनी मानवी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनी यूरीन बनवण्यास मदत करतात. शरीरातील फ्लूइड आणि मिनरल्स बॅलन्स करतात. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं काम करतात. अशात किडनी खराब होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं ठरतं. किडनी जास्त काळ निरोगी ठेवण्यासाठी काही सोपे उपाय बघूया...          🔰 *पौष्टिक आहार घ्या* कडधान्य, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचं रोजच्या आहारात समावेश केल्याने किडनींचं आरोग्य चांगलं राहतं. कारण या गोष्टी नॅचरल फॉर्म मध्ये असल्याने, ते किडनीसाठी फार फायदेशीर असतात. तसेच जास्तीत जास्त पाणी पिणं फार गरजेचं आहे.         🔰 *पुरेशी झोप घ्या* पुरेशी झोप घेत न झाल्याने हायपरटेंशन आणि डायबिटीसचा धोका वाढतो, ज्यामुळे किडनीवर दबाव पडतो. झोपे दरम्यान किडनी जास्त ब्लड फिल्टर करू शकतात आणि जास्त यूरीनही तयार करतात, ज्यामुळे एक्स्ट्रा फ्लूइड आणि वेस्ट शरीरातून बाहेर निघतात. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणं महत्वाचं आहे.         🔰 *पेन किलर टाळा* वेगवेगळ्या वेदना दूर क...

होय, 110 किलोवरून थेट 75 किलो वजन घटवून तो बनला फिट.ना जिम ना डाएट, फक्त ‘ही’ साधी ट्रिक वापरून दाखवला चमत्कार(110 TO 75 KG WEIGHT LOSS DIET, EXERCISES)...

या तरूणाने 110 किलोवरून थेट 75 किलो वजन घटवून सर्वांसमोरच एक अनोखा आदर्श ठेवला आहे. जिथे लठ्ठपणामुळे अनेक भयंकर आजार होतात पण लोक हार मानतात तिथे या तरूणाने आहारात लहानसहान बदल करून हा चमत्कार घडवून दाखवला.जाणून घेऊया नक्की असे कोणते उपाय केले ज्यामुळे हे सहज शक्य झालं... स्वतःवरचा विश्वास गमावलेली, समाजाच्या सततच्या टोमण्यांना तोंड देणारी आणि आरोग्याच्या असंख्य समस्यांनी त्रस्त असलेली एक व्यक्ती जेव्हा उभारी घेते, तेव्हा ती कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. संबंधित तरुणाचे एप्रिल 2024 मध्ये वजन 110 किलो होतं. त्याच्या जीवनात अशक्तपणा थकवा, सततचा चिडचिडेपणा, केसगळती, वारंवार डोकेदुखी यांसारखे त्रास होत होते. पण सर्वात मोठा त्रास म्हणजे स्वतःवरचा त्याने गमावलेला विश्वास. लोकांच्या क्रूर टोमण्यांमुळे तो अधिक खचत गेला होता. केवळ चालण्यामुळे सुद्धा त्याच्या पायांच्या असह्य वेदना होत होत्या. मात्र हाच क्षण त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. बदलायचा निर्णय घेत त्याने सर्वप्रथम साखर सोडली, साधे पण सातत्यपूर्ण बदल सुरू केले. आणि आज तो 75 किलोवर आला आहे. *निरोगी, उत्साही आणि वॉकिंगपासून, ...

मासिक पाळीच्या अनेक तक्रारींवर मार्गदर्शन...

भगिनींनो, अनेकदा मासिक पाळी संदर्भात कुठलीही समस्या असो जसे की, ▪️अनियमित मासिक पाळी ▪️अंगावरून पांढरे व लाल  जाणे ▪️गर्भाशयाला सूज असणे ▪️पीसीओस PCOS ▪️पीसीओडी PCOD ▪️गर्भधारणा न होणे ▪️वारंवार गर्भपात होणे. तसेच  स्त्रियांच्या गर्भाशयाच्या मासिक पाळी संदर्भात कुठलीही समस्या किंवा कर्करोग लक्षणे असल्यास डॉक्टर गर्भाशयाची पिशवी  काढण्याचा सल्ला देतात. गर्भाशय काढले की सुरू होतात अनेक शारीरिक तक्रारी व आजार... मात्र या आजारांवर खात्रीशीर घरगुती उपचार आपण पाहुयात.... महिलांनो, खाली दिलेले घरगुती उपाय अवश्य करून पाहावा...           *▪️उपाय - १▪️* शतावरी पावडर १ चमचा, सेंद्रिय गुळ ४ चमचे,  १ चमचा मेथी पावडर  देशी गाईच्या दुधातून किंवा पोळीतुन किंवा कोमट पाण्यातून सकाळ - संध्याकाळी घ्यावे. आहारात गाईचं तुप २ चमचे या प्रमाणात जेवणासोबत केव्हाही घ्यावे.          *▪️उपाय - २▪️* उंबराची २ पानं अशोकाची ४ पानं  पिंपळाची ४ पानं सिसमची १० पानं  तुळशीची २० पानं  हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये याचा रस काढून घ्याव...

सरकारचे हे 10 कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे... नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारचे १० महत्त्वाचे ओळखपत्रे : फायदे आणि मिळवण्याची प्रक्रिया...

ALL YOJANA ID CARD केंद्र आणि राज्य सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवत असते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक प्रकारची ओळखपत्रे (कार्डे) आवश्यक असतात. ही कार्डे तुम्हाला सरकारी फायदे, आरोग्य सुविधा, शेतीविषयक मदत आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये उपयुक्त ठरतात. या लेखात, आपण १० महत्त्वपूर्ण कार्ड्स, त्यांचे फायदे आणि ती कशी मिळवता येतील याबद्दल सविस्तर माहिती पाहू... १. आभा कार्ड (ABHA CARD) : आभा कार्ड, म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट कार्ड, तुमच्या आरोग्याची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात साठवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही कोणत्याही दवाखान्यात गेल्यास, तुमचे सर्व वैद्यकीय अहवाल, डॉक्टरांची कागदपत्रे, आणि आरोग्याची माहिती एकाच ठिकाणी सुरक्षित राहते. यामुळे, एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात गेल्यास तुमच्या आरोग्याचा संपूर्ण इतिहास डॉक्टरांना सहज उपलब्ध होतो, ज्यामुळे योग्य उपचार करणे सोपे होते. तुमच्या जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन तुम्ही हे कार्ड बनवू शकता. तसेच, https://abha.abdm.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतः...

XEROX MEANING IN MARATHI : कॉलेज–ऑफिसमध्ये रोज ‘झेरॉक्स’शिवाय पान हलत नाही; पण ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात? जाणून घ्या उत्तर...

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या... आपण सर्वांनी कधी ना कधी ऐकलेलं वाक्य, “भय्या, एक झेरॉक्स देना” इतकं सर्वसामान्य झालंय की, त्यामागे खरी कहाणी आहे, हे आपण विसरतो. कॉलेज असो, सरकारी ऑफिस असो किंवा अगदी कोपऱ्यावरचं स्टेशनरीचं दुकान, झेरॉक्स हा शब्द इतका अंगवळणी पडलाय की, ‘फोटो कॉपी’ हा मूळ शब्द कुणाला आठवतच नाही. पण गंमत अशी की, झेरॉक्स हा प्रत्यक्षात अर्थाच्या अनुषंगाने वापरला जाणारा शब्द नाही, तर ते एका अमेरिकन कंपनीचं नाव आहे, ज्यानं जगभरात कॉपी मशीनचं साम्राज्य निर्माण केलं. १९३८ मध्ये चेस्टर कार्लसन नावाच्या संशोधकानं ‘झेरोग्राफी’ नावाची प्रक्रिया शोधली आणि शाई किंवा कार्बन पेपरशिवाय कॉपी काढणं शक्य झालं. याच तंत्रज्ञानावर आधारित ‘XEROX 914’ नावाचं पहिलं प्लेन पेपर कॉपियर मशीन १९५९ मध्ये आलं आणि ते इतकं गाजलं की, कंपनीचं नावच XEROX CORPORATION पडलं. या मशीनच्या अफाट यशामुळे ‘झेरॉक्स’ हा शब्द हळूहळू ‘फोटो कॉपी’साठी पर्याय बनला आणि लोकांच्या जिभेवर तो कायमचा बसला. भारतही त्याला अपवाद ठरला नाही. येथेही “झेरॉक्स काढा,” ...

केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी थेट रोख रक्कम: जाणून घ्या DBT योजनेचे फायदे आणि पात्रता...

महाराष्ट्रामधील केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नवीन योजनेनुसार, आता 14 शेतकरी-संकटग्रस्त जिल्ह्यांमधील केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना अनुदानित अन्नधान्याऐवजी थेट त्यांच्या बँक खात्यात मासिक आर्थिक मदत दिली जाणार आहे. या थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेमुळे शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळेल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक लवचिकता येईल. 👉योजनेची उद्दिष्ट्ये आणि आर्थिक मदत : ही योजना प्रामुख्याने केशरी शिधापत्रिकाधारक (APL) शेतकऱ्यांसाठी आहे, जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA), 2013 अंतर्गत समाविष्ट नाहीत. विदर्भ आणि मराठवाडा विभागांमध्ये शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता, त्यांना आर्थिक सहाय्य देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. 👉आर्थिक लाभ : या योजनेअंतर्गत, प्रत्येक पात्र व्यक्तीला दरमहा ₹170 थेट त्याच्या बँक खात्यात जमा केले जातील. 👉कसे काम करेल : जर तुमच्या कुटुंबात चार व्यक्ती असतील, तर तुम्हाला दरमहा एकूण ₹680 (170 x 4) मिळतील. ही आर्थिक मदत मिळाल्यामुळे कुटुंबे अन्नधान्याव्यतिरिक्त इतर अत्य...

मोठी बातमी! विभक्त रेशनकार्डधारक सूना ‘लाडकी बहीण’साठी पात्र; पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, पण ४ लाखांवर लाभार्थी पत्त्यावर सापडल्याच नाहीत...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सव्वादोन कोटी लाभार्थींपैकी २६ लाख ३४ हजार महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी पार पडली. त्यात २१ वर्षांपेक्षा कमी आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला व एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी महिला आहेत. पडताळणीचा अहवाल शासनाला सादर झाला आहे. सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सव्वादोन कोटी लाभार्थींपैकी २६ लाख ३४ हजार महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी पार पडली. त्यात २१ वर्षांपेक्षा कमी आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला व एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी महिला आहेत. पडताळणीचा अहवाल शासनाला सादर झाला आहे. ज्या सूना किंवा मुलीचे रेशनकार्ड विभक्त आहे, त्यांचा बंद केलेला लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील महिला पात्र होत्या. तसेच एका कुटुंबातील एक विवाहित, एक अविवाहित अशा दोनच महिला पात्र ठरत होत्या. तरीदेखील, निकष डावलून लाखो महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आणि लाभही मिळविला. माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीवरून असे लाभार्थी बाजूला काढून त्यांची पडताळणी करण्यात आली. पण, सोल...

कुणबी प्रमाणपत्रासाठी एक दोन नव्हे 16 कागदपत्रे तपासली जातात, 8,9,10 नंबरची कागदपत्र मिळणं मुश्किलच नाही तर महाकठिण..

KUNBI CASTE CERTIFICATE : सरकारने काढलेल्या जीआरनंतर मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू झालंय. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. जरांगे यांच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याचे बघायला मिळत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मोठ्या लढ्यानंतर शेवटी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालंय. तसा थेट जीआरच सरकारने काढला. यासोबतच हैद्राबाद गॅझेटही मान्य करण्यात आले. सातारा गॅझेटच्या निर्णयावर सरकारने वेळ मागितला. जरांगे यांनी ठणकावून सांगितले की, मराठवाड्यातील पूर्ण मराठा ओबीसीमध्ये गेलाय. बाकी, कोल्हापूर, पुणे संस्थान, सातारा संस्थान यामधीलही मराठा ओबीसीत गेला म्हणूनच समजा..मुंबईतील उपोषणानंतर जरांगे पाटील यांना मोठे यश मिळाले. सरकारने थेट जरांगे यांच्या मागण्या मान्य करत जीआरच काढला. ओबीसी समाजाचा या जीआरला आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास जोरदार विरोध होताना दिसतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मी ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. सरकारने काढलेल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणास...

१३. चवदार तळ्याचे पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे...१४. मिठाचा शोध स्वाध्याय प्रश्न उत्तरे...

  १३. चवदार तळ्याचे पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे... प्र.१.एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ) चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला नवीन शक्ती दिली ? उत्तर : चवदार तळ्याच्या पाण्याने मानवाला नवीन शक्ती दिली. (आ) चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे कोणाची स्फूर्ती आहे ? उत्तर : चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या भीमकाय मूर्तीची स्फूर्ती आहे. (इ) चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले ? उत्तर : चवदार तळ्याच्या पाण्याने गरिबांना प्रेरित केले. प्र.२. थोडक्यात उत्तरे लिहा. (अ) ' अन्यायासाठी लढुनी ' असे कवयित्री का म्हणते ? उत्तर : १) चवदार टाळायचे पाणी वापरण्यास कर्मठ लोकांनी दलितांवर बंदी घातली होती. हा मानवतेचा अपमान होत. २) या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीनांना प्रेरणा दिली. म्हणून ‘अन्यायासाठी लढूनी’ असे कवयित्री म्हणतात. (आ) आत्मभान कशामुळे जागे होते ? उत्तर : १) माणसाला माणसाचे सत्व कळायला हवे. स्वतःचे सत्व हरवलेला माणूस जनावराचे जिणे जगतो. २) जेव्हा माणसाला स्वतःचे मीपण कळते, तेव्हा आत्मभान जागे होते. प्र.३. रिकाम्या जागी कंसातील यो...