*गुणधर्म*
१) स्निग्ध, मधुर व थंडावा देते.
२) त्रिदोषांचे शमन करते.
३) त्वचेचा वर्ण सुधारतो.
४) दृष्टी व आवाज सुधारते.
५) केशवर्धक.
६) सूजनाशक.
७) पित्तशामक
८) रक्तशुद्धीकर
९) शुक्रवर्धक.
👉उपयोग :
१) घशातील सूज, कफ / खोकला व क्षय यांवर उपयोगी.
२) श्वासमार्गातील व आतड्यातील सूज, व्रण / अल्सर व जळजळ यावर उपयोगी.
३) कोणत्याही कारणाने आलेली अशक्तता कमी होते - शक्ती येते.
४) कंड, खरूज, सूज इ. त्वचाविकारात उपयोगी.
👉वापरण्याची पद्धती :
१) चाटण : अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण + एक चमचा मध. मुख्यतः (घशासाठी व कफासाठी)
२) गुळण्या : अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण + अर्धा कप पाणी उकळवणे - (आवाजासाठी)
३) उकळवून गाळून पिणे :
अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण + अर्धा कप पाणी उकळवणे
व दिवसभरात ३ वेळा पिणे - (कफासाठी)
संकलित...
*टीप : आरोग्य विषयक माहिती आवडल्यास पुढे जरूर पाठवा गरजूंना उपयोग होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*पित्त - कारणे व लक्षणे*
मित्रांनो, पित्ताचा त्रास का होतो...?
प्रामुख्याने चमचमीत, मसालेदार आहार, चुकिची जीवनशैली, मानसिक ताण तणाव, अपुरी झोप यांमुळे आज अनेक आरोग्याच्या तक्रारीबरोबरच पित्ताचा त्रासही जास्त प्रमाणात होताना दिसून येत आहे. पित्तामुळे ऍसिडिटी, डोकेदुखी, अंगावर पित्ताच्या गांधी उटणे (शीतपित्त) अशा अनेक तक्रारी होत असतात.पित्त वाढण्याची कारणे आणि लक्षणे पाहुयात...
👉पित्त वाढण्याची कारणे :
पित्त कशामुळे वाढते, काय खाल्याने पित्त वाढते..?
▪️ वारंवार तिखट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्यामुळे, मांसाहार, लोणची, पापड, आंबवलेले पदार्थ म्हणजे आंबट दही, ताक, इडली, डोसा, ब्रेड यासारखे पदार्थ अधिक खाणे.
▪️ वारंवार चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स पिणे.
▪️ उपवास करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे, बराच वेळ उपाशी राहण्याची सवय.
▪️ तंबाखू, सिगरेट, गुटखा, मद्यपान यासारखी व्यसने.
▪️ मानसिक तणाव, राग, चिडचिड करणे.
▪️ वरचेवर डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या घेत राहणे.
▪️ अतिजागरण करणे.
👉पित्ताची लक्षणे कोणती आहेत🤔
पित्तामुळे अनेक आरोग्याच्या समस्या होत असतात.
▪️ ऍसिडिटी किंवा आम्लपित्त होणे,
▪️ पित्तामुळे आंबट ढेकर येणे,
▪️ मळमळणे, उलट्या होणे,
▪️ छातीत व पोटात जळजळ होणे,
▪️ अल्सर होणे,
▪️ पित्तामुळे डोके दुखणे, अर्धशिशी (मायग्रेन डोकेदुखी),
▪️ डोळ्यांची आग होणे,
▪️ त्वचेवर पित्ताच्या गांधी उठणे.
*टीप : माहिती आवडल्यास सर्व ग्रुप वर शेअर करा, गरजूंना उपयोग होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
.jpeg)
Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा