मुख्य सामग्रीवर वगळा

होय, 110 किलोवरून थेट 75 किलो वजन घटवून तो बनला फिट.ना जिम ना डाएट, फक्त ‘ही’ साधी ट्रिक वापरून दाखवला चमत्कार(110 TO 75 KG WEIGHT LOSS DIET, EXERCISES)...

या तरूणाने 110 किलोवरून थेट 75 किलो वजन घटवून सर्वांसमोरच एक अनोखा आदर्श ठेवला आहे. जिथे लठ्ठपणामुळे अनेक भयंकर आजार होतात पण लोक हार मानतात तिथे या तरूणाने आहारात लहानसहान बदल करून हा चमत्कार घडवून दाखवला.जाणून घेऊया नक्की असे कोणते उपाय केले ज्यामुळे हे सहज शक्य झालं...


स्वतःवरचा विश्वास गमावलेली, समाजाच्या सततच्या टोमण्यांना तोंड देणारी आणि आरोग्याच्या असंख्य समस्यांनी त्रस्त असलेली एक व्यक्ती जेव्हा उभारी घेते, तेव्हा ती कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते.


संबंधित तरुणाचे एप्रिल 2024 मध्ये वजन 110 किलो होतं. त्याच्या जीवनात अशक्तपणा थकवा, सततचा चिडचिडेपणा, केसगळती, वारंवार डोकेदुखी यांसारखे त्रास होत होते. पण सर्वात मोठा त्रास म्हणजे स्वतःवरचा त्याने गमावलेला विश्वास. लोकांच्या क्रूर टोमण्यांमुळे तो अधिक खचत गेला होता. केवळ चालण्यामुळे सुद्धा त्याच्या पायांच्या असह्य वेदना होत होत्या.


मात्र हाच क्षण त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. बदलायचा निर्णय घेत त्याने सर्वप्रथम साखर सोडली, साधे पण सातत्यपूर्ण बदल सुरू केले. आणि आज तो 75 किलोवर आला आहे. *निरोगी, उत्साही आणि वॉकिंगपासून, ट्रेकिंगपर्यंत* अनेक उपक्रमांत सहभागी होत आहे. त्याच्या जीवनप्रवासातून तो सर्वांना एक संदेश देत आहे की, वजन कमी करणं हे फक्त शरीराचा नाही, तर मनाचा आणि आत्मविश्वासाचा बदल आहे.


त्याच्या प्रवासातील पहिली पायरी म्हणजे *साखरेपासून दूर जाणं. साखरयुक्त पेये, मिठाई, पॅकबंद ज्यूस किंवा गोड लस्सी* हे त्याने पूर्णपणे टाळलं. अशा पदार्थांमुळे वजन वाढतं, मधुमेहाचा धोका वाढतो आणि शरीरात ऊर्जा कमी होते.


त्याऐवजी त्याने *साधं पाणी, ताक, ग्रीन टी आणि फळांचं नैसर्गिक अर्क असलेलं पाणी निवडलं.* आणि हीच बदललेली सवयच त्याच्या वजन घटवण्याचा पाया ठरली. कारण एका छोट्या पण सततच्या बदलाने शरीरावर मोठा परिणाम होऊ शकतो हे त्याच्या अनुभवातून दिसून आलं.


अनेकांच्या आहारातील मोठा भाग म्हणजे *तळलेले स्नॅक्स. समोसे, पकोडे, चिप्स किंवा फ्राईड राईस* यांसारख्या पदार्थांनी चव भागते, पण आरोग्य बिघडतं.


मात्र या तरूणाने या पदार्थांना नकार देत *भाजलेले मखाना, भाजलेले चणे, एअर-फ्राईड स्नॅक्स आणि ग्रील्ड पनीर* हे पर्याय स्वीकारले. यामुळे त्याचं पोटही भरायचं आणि अतिरिक्त कॅलरीपासूनही त्याचा बचाव झाला. हा बदल तात्पुरता नव्हता; तो आजही हे पर्याय पाळतो आणि त्यातूनच सातत्याचं महत्त्व स्पष्ट होतं.


*पांढरा ब्रेड, पांढरा भात किंवा रिफाइंड पीठाच्या चपात्या* हे पदार्थ आपल्या आहारात सहज येतात. पण यातून फायबर कमी आणि कॅलरी जास्त मिळतात.


या तरुणाने हे पदार्थ टाळून *ब्राऊन राईस, ज्वारी, बाजरी आणि संपूर्ण गव्हाचे पदार्थ स्वीकारले.* त्यामुळे त्याची भूक कमी झाली, रक्तातील साखरेचं नियंत्रण चांगलं झालं आणि वजन घटवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. धान्यांमधला हा बदल त्याच्या जीवनशैलीतील सर्वात टिकाऊ बदलांपैकी एक ठरला.


*प्रक्रिया केलेले बिस्किटे, केक, पेस्ट्री किंवा गोड दही हे पदार्थ खूप मोहात पाडतात.* पण यामुळे वजन तर वाढतंच, त्याचबरोबर हार्मोनल तक्रारीही वाढतात.


या तरुणाने मात्र पदार्थांऐवजी गूळ किंवा खजुराने बनवलेले घरगुती गोड पदार्थ, मधासोबतचं दही किंवा फळे खाणं निवडलं. त्यामुळे गोड खाण्याची इच्छा भागली आणि शरीरावर वाईट परिणाम न होता ऊर्जा मिळाली. *त्याच्या अनुभवातून हे दिसून आलं की बदल हा कडक आहार न ठेवता योग्य पर्याय शोधण्यात आहे.*


वजन कमी होणं हा त्याच्या प्रवासाचा फक्त एक टप्पा होता, पण तो टिकवणं हे मोठं आव्हान होतं. यासाठी त्याने पाच महत्वाच्या सवयी आत्मसात केल्या. 80/20 डायट रूल, दररोज 8 ते 10 हजार पावलं चालणं, दिवसातून भरपूर पाणी पिणं, 6/7 तासांची सलग झोप (दुपारची झोप पूर्ण बंद). 


या सवयींमुळे त्याने फक्त वजन कमी केलं नाही तर शरीराला नवी उर्जा दिली. आजही या पद्धतींमुळे तो निरोगी राहतोय आणि आपल्या जीवनशैलीला टिकवून ठेवतोय.


👉 महत्वाचे : हा संपूर्ण लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा...

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

XEROX MEANING IN MARATHI : कॉलेज–ऑफिसमध्ये रोज ‘झेरॉक्स’शिवाय पान हलत नाही; पण ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात? जाणून घ्या उत्तर...

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या... आपण सर्वांनी कधी ना कधी ऐकलेलं वाक्य, “भय्या, एक झेरॉक्स देना” इतकं सर्वसामान्य झालंय की, त्यामागे खरी कहाणी आहे, हे आपण विसरतो. कॉलेज असो, सरकारी ऑफिस असो किंवा अगदी कोपऱ्यावरचं स्टेशनरीचं दुकान, झेरॉक्स हा शब्द इतका अंगवळणी पडलाय की, ‘फोटो कॉपी’ हा मूळ शब्द कुणाला आठवतच नाही. पण गंमत अशी की, झेरॉक्स हा प्रत्यक्षात अर्थाच्या अनुषंगाने वापरला जाणारा शब्द नाही, तर ते एका अमेरिकन कंपनीचं नाव आहे, ज्यानं जगभरात कॉपी मशीनचं साम्राज्य निर्माण केलं. १९३८ मध्ये चेस्टर कार्लसन नावाच्या संशोधकानं ‘झेरोग्राफी’ नावाची प्रक्रिया शोधली आणि शाई किंवा कार्बन पेपरशिवाय कॉपी काढणं शक्य झालं. याच तंत्रज्ञानावर आधारित ‘XEROX 914’ नावाचं पहिलं प्लेन पेपर कॉपियर मशीन १९५९ मध्ये आलं आणि ते इतकं गाजलं की, कंपनीचं नावच XEROX CORPORATION पडलं. या मशीनच्या अफाट यशामुळे ‘झेरॉक्स’ हा शब्द हळूहळू ‘फोटो कॉपी’साठी पर्याय बनला आणि लोकांच्या जिभेवर तो कायमचा बसला. भारतही त्याला अपवाद ठरला नाही. येथेही “झेरॉक्स काढा,” ...

* डोळ्याखालील काळी वर्तुळे...

स्त्री / पुरुषांच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी घरगुती उपाय पाहुयात... मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही अनेक दिवसांपासून पुरेशी झोप घेत नसाल तर त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात हे टाळण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप (किमान ६ ते ७ तास सलग) घ्या. विश्रांती ही महत्त्वाची आहे, त्यामुळे डोळ्याखालील ताण कमी होऊन ते काळे पडणार नाहीत. 👉सकाळी चहा केल्यानंतर चहाचे (चोथा) छोटे कण फ्रीजमध्ये ठेवा, त्यानंतर थंड झाल्यावर पुरुषांनी डोळ्याखाली हलक्या हाताने चोळा त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. 👉टोमॅटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात, एक चमचा टोमॅटोची पेस्ट आणि लिंबाचा रस (१०थेंब) एकत्र करून मिश्रण तयार करावे, हे मिश्रण आपल्या डोळ्याखाली लावावे, दोन मिनिटे तसेच ठेवावे त्यानंतर थंड पाण्याने धुऊन काढावे. 👉बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत डोळ्या जवळील त्वचेला याचा लाभ मिळतो, बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते, रात्री डोळ्याखाली बदाम तेल लावावे हलक्या हाताने मसाज करावा सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवावा. 👉स्त्री पुरुषांच...

*INTERVAL WALKING म्हणजे काय?

संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी "Interval Walking" आहे खूप फायदेशीर.समजून घ्या योग्य पद्धत... मित्रांनो, इंटरव्हल चालण्यामुळे शरीराला जास्त थकवा येत नाही आणि लवकर रिकव्हरही होते. इंटरवलदरम्यान तुम्ही सामान्य श्वासोच्छ्वास करता, ज्यामुळे तुम्हाला तुमचे फिटनेस ध्येय गाठणे सोपे होते. बरेच लोक चालण्याने वजन कमी होत नाही म्हणून वैतागून जातात आणि शेवटी ते चालणे बंद करतात. तुमच्यासोबतही असेच काही घडत असेल तर इंटरव्हल चालणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वास्तविक, इंटरव्हल वॉकिंगमध्ये (INTERVAL WALKING) तुम्हाला लवकर-लवकर चालावे लागते, जेणेकरून जास्त चरबी जाळली जाऊ शकते आणि वजन झपाट्याने कमी (WEIGHT LOSS) होते. या चालण्याच्या दरम्यान शरीराला अनेक ब्रेक दिले जातात आणि प्रत्येक ब्रेकसाठी एक वेळ निश्चित केली जाते. इंटरव्हल चालण्यामुळे शरीराला जास्त थकवा येत नाही आणि लवकर रिकव्हरही होते. इंटरवलदरम्यान तुम्ही सामान्य श्वासोच्छ्वास करता, ज्यामुळे तुम्हाला तुमचे फिटनेस ध्येय गाठणे सोपे होते. अशा प्रकारे, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर इंटरवल ट्रेनिंग हा (INTERVAL WALKING FOR WEIGHT LOSS...