मित्रांनो, बदलत्या वातावरणात सेंद्रिय गुळाचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. सेंद्रिय गुळाने सर्दी खोकला तर दूर होतोच, सोबतच महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनाही कमी होण्यास मदत होते. सेंद्रिय पद्धतीने बनवलेल्या गुळाच्या नियमित सेवनाने शरीरातील आयर्नची कमतरता भरून निघते. याने पचनक्रियाही सुधारते आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
👉पचनक्रिया सुधारते :
गूळ आणि ओवा दोन्हींमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं, ज्याने पचन तंत्र चांगलं राहतं. याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊन पोट साफ होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला पचन तंत्र सुधारायचं असेल तर गूळ आणि ओव्याचं सेवन केलं पाहिजे.
👉मासिक पाळीतील वेदनेपासून आराम :
गूळ आणि ओव्याचं सेवन केल्याने मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत मिळते. तसेच यांचं एकत्र सेवन केल्याने ब्लड फ्लो चांगला राहतो.
👉कंबरदुखी होईल दूर :
ओवा आणि गुळाचं एकत्र सेवन केल्याने कंबर दुखीपासून सुटका मिळवू शकता. हे मिश्रण रोज झोपण्याआधी एक ग्लास कोमट पाण्यात टाकून सेवन करावं. याने कंबरदुखीची समस्या दूर होईल.
👉सर्दी-खोकला होईल दूर :
सर्दी-खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही गूळ आणि ओव्याचं सेवन केलं पाहिजे. याने तुमच्या घशातील खवखव आणि छातीतील आखडलेपणा दूर होईल.
👉अस्थमा होईल कमी :
अस्थमामुळे वेगवेगळ्या समस्या होतात. अशात गूळ आणि ओव्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. गूळ आणि ओव्याने फुप्फुसातील होणारी सूज कमी करण्यास मदत मिळते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम...
मित्रांनो, आपल्या आहारात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.
आहारात दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या, फळे, मासे, अंडी आणि कडधान्ये यांचा समावेश करावा.
👉आहारामध्ये खालील गोष्टींचा समावेश करा :
१) कॅल्शियम :
दुग्धजन्य पदार्थ (दूध, दही, चीज),हिरव्या पालेभाज्या (पालक, मेथी), बदाम, तीळ, आणि कॅल्शियम - समृद्ध तृणधान्ये यांचा आहारात समावेश करा.
२) व्हिटॅमिन डी :
सूर्यप्रकाश, अंडी, मासे, आणि व्हिटॅमिन डी-समृद्ध पदार्थांचे सेवन करा.
३) प्रथिने :
अंडी, मासे, चिकन, कडधान्ये, आणि डाळी यांचा आहारात समावेश करा. प्रथिने हाडांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक आहेत.
४) इतर पोषक तत्व :
व्हिटॅमिन सी (संत्री, लिंबू), व्हिटॅमिन के (पालक, ब्रोकोली), आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड (मासे) यांचा आहारात समावेश करा.
५) आहार संतुलित ठेवा :
फळे, भाज्या, प्रथिने, आणि कार्बोहायड्रेट्स यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या.
पुरेशे पाणी प्या.
६) तसेच डिंक लाडू हळीव लाडू आपण खाऊ शकतो.
डिंक, गूळ, सुंठ, खसखस, बदाम, काजू, आणि खोबरे यांसारख्या पौष्टिक पदार्थांपासून बनवलेला डिंक लाडू हाडांना बळकटी देतो, शरीराला ऊर्जाही देतो. विशेषतः थंडीच्या दिवसात याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते.
हळीव हाडांना बळकटी देतो आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्यांपासून संरक्षण करतो.
७) जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, आणि जास्त साखर असलेले पदार्थ टाळा.
👉डॉक्टरांचा सल्ला घ्या : तुम्हाला विशिष्ट आहार योजना किंवा पूरक पदार्थांची आवश्यकता असल्यास, तुमच्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला घ्या.
तुमच्या हाडांच्या फ्रॅक्चरच्या उपचारांसाठी आणि पुनर्प्राप्तीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*आवळा औषधापेक्षा कमी नाही(Benefits of Amla)...
आवळा हे एक औषधी फळ आहे, ज्याची चव तुरट असते. भारतात लोक ते लोणचे, जाम आणि मोरावळ्याच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात खातात.
🍏आवळा खाण्याचे अनेक चमत्कारी फायदे आहेत, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक पोषक तत्वांचा समावेश आहे, जो तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवतो.
🍏त्वचेसाठी फायदेशीर - निस्तेज त्वचेसाठी आवळा खूप फायदेशीर आहे, दररोज १ किंवा २ कच्चा आवळा खाल्ल्याने निस्तेज त्वचा साफ होते आणि चेहऱ्यावर चमकही येते.
🍏डोळ्यांसाठी फायदेशीर - आवळा डोळ्यांच्या दृष्टीसाठीही खूप फायदेशीर आहे, यामुळे डोळे कमजोर होण्यापासून बचाव होतो.
🍏मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर - आवळा मधुमेहामध्ये देखील खूप फायदेशीर आहे, त्यामुळे रोज आवळा खावा.
🍏वजन नियंत्रणासाठी फायदेशीर - आवळा वजन नियंत्रित करण्यासाठी देखील फायदेशीर आहे, तुम्ही ते ज्यूस आणि जामच्या स्वरूपात देखील घेऊ शकता.
🍏केसांसाठी फायदेशीर - एक ग्लास आवळ्याचा रस नियमितपणे प्यायल्याने केस गळणे कमी होते आणि केस मुळापासून टोकापर्यंत मजबूत होतात. आवळ्याचा रस रोज पिणे केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी तितकेच फायदेशीर आहे.
🍏रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते - आवळा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, जे निरोगी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.
🍏पोटाच्या समस्यांसाठी फायदेशीर - पोटाच्या समस्यांसाठी आवळा खूप फायदेशीर आहे, त्यामुळे आवळा रोज सेवन करा. आवळा उपलब्ध नसल्यास मोरावळ्याचे दररोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करावे. यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते, पचन चांगले होते, जळजळ कमी होते, कोलेस्टेरॉल कमी होते, तुमचे शरीर डिटॉक्स होते आणि केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. म्हणजे संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त असा हा आवळा आहे.
संकलित...
*टीप : माहिती आवडल्यास सर्व ग्रुप वर शेअर करा, गरजूंना उपयोग होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
.jpeg)
Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा👌
उत्तर द्याहटवा