मित्रांनो, हा व्यायाम मुख्यत्वे हिप्स (कूल्हे), हॅमस्ट्रिंग्ज, क्वाड्रिसेप्स (मांडीचे स्नायू), आणि इनर थाइज (आतील मांडी) या स्नायूंवर कार्य करतो आणि शरीराची लवचिकता सुधारण्यास मदत करतो.
*कॉसॅक स्क्वॅटचे फायदे :
हा व्यायाम कूल्हे, गुडघे आणि घोट्यांची लवचिकता आणि हालचाल वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
*स्नायू मजबूत होतात :
कॉसॅक स्क्वॅटमुळे क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग्ज, ग्लुट्स, आणि इनर थाइज यांसारख्या पायांच्या स्नायूंना बळकटी मिळते.
*शरीराचे संतुलन सुधारते :
या व्यायामामुळे शरीराचा तोल सुधारतो, ज्यामुळे संतुलन साधण्यास मदत होते.
*कॅलरीज बर्न होतात :
स्क्वॅट केल्याने जास्त कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
*दुखापतीचा धोका कमी होतो :
नियमित सरावाने गुडघे आणि सांधे मजबूत होतात, ज्यामुळे दुखापतीचा धोका कमी होतो.
*आसनात सुधारणा होते :
हा व्यायाम केल्याने शरीराची मुद्रा (POSTURE) सुधारते.
*मानसिक समन्वय आणि स्थिरता :
कॉसॅक स्क्वॅटमुळे मज्जासंस्था (NERVOUS SYSTEM) सुधारते आणि कठीण परिस्थितीतही शरीराचे समन्वय राखण्यास मदत होते, ज्यामुळे दीर्घकाळ निरोगी राहते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
.jpeg)
Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा