🍏 आवळा...
मित्रांनो, आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष मानवी शरीराचे आधारस्तंभ मानले जातात. या दोषांचे संतुलन बिघडले की आजार उद्भवतात असे शास्त्र सांगते.
आवळ्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजांमुळे तो या तिन्ही दोषांवर परिणाम करतो. वात शांत करून तो अस्थिरता कमी करतो, पित्तामुळे होणारी जळजळ कमी करतो आणि शरीराला थंडावा देतो, तसेच कफामुळे होणारा जडपणा व कफस्राव कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे आवळ्याचे नियमित सेवन शरीरात तिन्ही ऊर्जांचे संतुलन राखते.
आवळ्याचा उपयोग अनेक पद्धतींनी करता येतो. सकाळी ताज्या आवळ्याचा रस पाण्यात मिसळून घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळते. आवळ्याची पावडर कोमट पाण्यात किंवा हर्बल टीमध्ये मिसळून घेता येते.
कच्चा आवळा खाल्ला तरी फायदेशीर आहे, तसेच त्याचा मुरंबा, लोणचं किंवा चटणी बनवून खाल्ल्यासही तो उपयोगी ठरतो. त्वचेसाठी आणि केसांसाठी आवळ्याचे तेल किंवा फेसपॅक म्हणूनही तो वापरला जातो. त्यामुळे तो फक्त आहारापुरता मर्यादित न राहता सौंदर्य टिकवण्यासाठीही उपयोगी आहे.
आधुनिक शास्त्रानेही आवळ्याचे फायदे सिद्ध केले आहेत. संशोधनानुसार आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात. यामुळे पेशींवर होणारे अकाली वृद्धत्व टाळले जाते. त्याचबरोबर आवळा यकृताचे कार्य सुधारतो, पचनक्रिया सुरळीत ठेवतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास तो उपयुक्त ठरतो, त्यामुळे मधुमेहग्रस्त व्यक्तींसाठीही तो फायदेशीर मानला जातो.
फक्त शरीरापुरतेच नव्हे तर मन शांत ठेवण्यातही आवळ्याची महत्त्वाची भूमिका आहे. आयुर्वेदानुसार कफ दोषामुळे मनात जडपणा आणि उदासीनता वाढू शकते. आवळा हे संतुलन राखतो आणि मन प्रसन्न ठेवतो. त्यातील पोषक तत्त्वे मेंदूच्या कार्यक्षमतेला मदत करतात, एकाग्रता वाढवतात आणि तणाव कमी करतात. त्यामुळे आधुनिक तणावग्रस्त जीवनशैलीत आवळा मानसिक आरोग्यासाठी नैसर्गिक आधार ठरू शकतो.
वात, पित्त, कफ हे त्रिदोष प्रत्येकाच्या शरीरात असतात पण जेव्हा ते असुंलित होतात तेव्हा मात्र शरीराला अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. तुम्हालाही यामुळे त्रास होत असेल तर लगेच वर दिलेल्या पदार्थाचे सेवन करून आराम मिळवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🍊 संत्री - दररोजच्या आहारातील आवश्यक फळ...
मित्रांनो, आंबटगोड चवीची, पिवळ्या, केशरी रंगाची, सगळ्यांच्या आवडीची अशी संत्री व्हिटमिन C ने सम्रूद्ध असतात.
अनेक व्याधीवर संत्री गुणकारी ठरतात जसे की, भूक मंदावणे, पोटात गँस होणे, अश्या समस्यांवर संत्र्याचा रस प्यायल्यास आराम पडतो. मळमळसारखे वाटल्यास संत्र्याची साल हुंगल्यास लगेच बरे वाटते.
माउथ अल्सर, छाले, व्रण हे संत्र्याच्या सेवनाने बरे होतात, मुबलक प्रमाणात पोटँशीअम व मँग्नेशीअम असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रीत राहतो.
लहान मुलांना संत्री खाऊ घातल्यास त्यांचे शरीर मजबुत, राहते, तसेच गर्भवती स्रीयांनी ९ महिने याचे सेवन केल्यास होणारे मूल हेल्दी होते व प्रसूती देखील वेदनारहित होते.
संत्र्याची साल वाळवून त्याचे चूर्ण व गुलाब जल मिसळून चेहर्याला लावल्यास चमकतो, पिंपल, ब्लँकहेड, सावळेपणा दूर होण्यास मदत होते, संत्र्याचे नियमित सेवन केल्याने, दात व हिरड्या चांगल्या राहतात.
संत्र्यामध्ये अँटिआँक्सिडंटस् अधिक प्रमाणात असतात, जे कँसरच्या प्रभावाला नष्ट करतात, संत्र्यात फोलेटतत्व अधिक असते. त्यामुळे शरिरात नवीन सेल लवकर तयार होऊन शरीरातील कोणतीही जखम लवकर भरते.
संत्र्यामध्ये फायबरचे उच्चतम प्रमाण असल्याने बद्धकोष्ठ, शौचास त्रास होणे हे आजार बरे होतात.
महत्वाचे म्हणजे हे एक सुगंधित फळ असल्याने मानसिक ताण कमी करते व डिप्रेशनमधून बाहेर काढते.
झिंक, आयर्न भरपूर खनिजे असल्याने इम्यून सिस्टिम मजबूत ठेवते व प्रतिकारशक्ती चांगली ठेवते.
सांधेदुखी करता याचा रस व बकरीचे दूध एकत्रीत घेतल्यास फायदा होतो.
मूत्रखडा देखील होऊ देत नाही.
संत्र्याच्या सालीचे चूर्ण घेतल्यास पोटात थंडावा तयार होउन अम्लपित्त, पित्त, चर्मरोग होत नाही.
ताप असताना पचनशक्ती मंदावते व त्यामूळे जीभेवर पांढरा थर जमा होतो, अश्या स्थितीत संत्रे आतील सालीसह चावून खावे, पचनशक्ती सुधारते, डोळ्याकरता गुणकारी आहे, नियमित सेवन केल्यास डोळ्यांची जळजळ, उष्णता कमी होते, कांजण्या, गोवर येऊन गेल्यावर उष्णता पूर्ण जाण्यासाठी संत्र्याचा रस पिण्यास द्यावा.
संत्री बाराही महिने मिळणारे हे फळ नेहमीच आहारात असावे.
*टीप : आरोग्य विषयक माहिती आवडल्यास पुढे जरूर पाठवा गरजूंना उपयोग होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
.jpeg)
Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा