* डाळींब *
मित्रांनो, फळांमध्ये अनेक पौष्टिक तत्व असतात. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांच्याशिवाय फळांमध्ये इतरही पौष्टिक तत्वे मुबलक प्रमाणात असतात.त्या फळांमध्ये डाळिंबाचाही (Pomegranate) समावेश आहे.
डाळिंब हे गोड आणि अतिशय चविष्ट फळ असून अनेक आजारांवरही ते गुणकारी आहे. अशक्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्याचा सल्ला देतात.
ते व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी (Vitamin C & B)चा उत्तम स्त्रोत आहे. डाळिंबामध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक (जस्त) मोठ्या प्रमाणात असते. डाळिंबाच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात.
👉डाळिंब खाण्याचे फायदे :
👉पेशींना बळकटी मिळते :
डाळिंबामध्ये अनेक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. डाळिंबाच्या रसात इतर फळांच्या रसापेक्षा अधिक अँटी-ऑक्सिडेंट असतात. त्याचे सेवन केल्याने पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होऊ शकते. तसेच सूज कमी होते.
👉अल्झायमरपासून बचाव :
डाळिंबाचे दाणे अल्झायमर रोगाच्या वाढीला रोखतात. तसेच एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतात.
👉पचन :
डाळिंबाचा रस प्यायल्याने आतड्याची सूज कमी होते तसेच पचन सुधारते. मात्र डायरियाच्या रुग्णांना डाळिंबाचा रस न पिण्याचा सल्ला दिला जातो.
👉सांधेदुखी :
डाळिंबाचा रस सांधेदुखी, वेदना आणि सूज कमी करण्यात फायदेशीर ठरतो.
👉हृदयविकार :
हृदयविकाराची समस्या असल्यास, डाळिंबाचा रस पिणे लाभदायक ठरते. हृदय आणि धमन्या यांचे वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी डाळिंबाचा रस प्यायचा सल्ला दिला जातो.
👉ब्लडप्रेशर :
ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी डाळिंबाचा रस फायदेशीर मानला जातो.
👉कॅन्सरपासून बचाव :
डाळिंबाचा रस हा कॅन्सरग्रस्त लोकांसाठी फायदेशीर ठरतो. प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींना रोखण्यासाठी डाळिंबाचा रस उपयोगी ठरतो.
👉अँटीऑक्सिडंट्सचा स्रोत :
यामध्ये फिनोलिक संयुगे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात.
👉रक्तातील साखरेचे नियंत्रण :
डाळिंबात फायबर असल्यामुळे ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, मात्र डाळिंबाचा रस पिण्याऐवजी पूर्ण फळ खाणे अधिक फायदेशीर आहे कारण रसात फायबर नसते आणि साखर जास्त असू शकते.
👉हाडांचे आरोग्य :
व्हिटॅमिन के आणि इतर खनिजे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
👉डाळिंब खाण्याचे तोटे :
👉रक्तदाब कमी होणे :
डाळिंब रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकते, त्यामुळे ज्यांचा रक्तदाब आधीच कमी आहे त्यांनी डाळिंबाचे सेवन टाळावे किंवा कमी प्रमाणात करावे.
👉ऍलर्जी :
काही लोकांना डाळिंबाची ऍलर्जी असू शकते, ज्याची लक्षणे खाज सुटणे, सूज येणे किंवा नाकातून पाणी येणे अशी असू शकतात.
👉शस्त्रक्रिया आणि औषधे :
शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आणि काही विशिष्ट औषधे घेत असलेल्या व्यक्तींनी डाळिंबाचे सेवन टाळणे महत्त्वाचे आहे.
👉पचनाच्या समस्या :
काही लोकांना डाळिंबामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे सेवन प्रमाणात करणे आवश्यक आहे.
संकलित...
*टीप : माहिती आवडल्यास सर्व ग्रुप वर शेअर करा, गरजूंना उपयोग होईल...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
.jpeg)
Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा