दीपावलीच्या दिवशी अभ्यंग स्नान म्हणजे औषधी तेलाने शरीर चोळून स्नान करणे, ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने हे केवळ धार्मिक नव्हे, तर वैज्ञानिक आणि आरोग्यवर्धक आहे.
*आयुर्वेदिक महत्त्व*
आयुर्वेदानुसार "स्नानं शरीरमलहरं पापनाशनं सुखप्रदम्"
म्हणजे स्नान शरीरातील मल (घाण, विषद्रव्ये) आणि मानसिक थकवा दूर करते, तसेच आनंद देते.
दीपावलीच्या सकाळी केलेले हे तेल स्नान शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करते. तसेच हे वातदोष कमी करणारे, रक्तसंचार सुधारविणारे आणि त्वचा पोषक असते.
*अभंग स्नान पारंपरिक पद्धत*
सकाळी सूर्योदयाच्या आधी उठावे.
तिळाचे किंवा नारळाचे तेल गरम करून संपूर्ण शरीराला चोळावे.
काही ठिकाणी त्रिफळा, चंदन, हळद, कपूर यांचे मिश्रण वापरतात.
१५–२० मिनिटांनी उटणे (उबटन) लावून स्नान करावे.
उबटनमध्ये बेसन, हळद, चंदन, कणकेचा पीठ, दूध किंवा गुलाबपाणी असते.
*आयुर्वेदिक फायदे*
या दिवसात थंडीची चाहूल लागते, शरीरात शरीरात वातदोष वाढतो, (कोरडेपणा, अंगदुखी, त्वचा फुटणे).
तिळतेलाने केलेले अभ्यंग स्नान हा वात कमी करून शरीराला ऊब आणि लवचिकता देते.
*त्वचा व स्नायूंसाठी पोषण*
तेल शरीरात खोलवर शोषले जाऊन त्वचेचे पोषण करते, स्नायूंना बळकटी येते, त्वचा कोमल व तेजस्वी होते.
*रक्ताभिसरण सुधारते*
तेल चोळल्याने शरीरात रक्ताभिसरण चांगले होते, थकवा कमी होतो, अंगात उत्साह येतो.
*मानसिक तणाव कमी होतो*
सुगंधी तेलाने अभ्यंग केल्याने मन शांत होते, झोप चांगली लागते, आणि मन प्रसन्न होते.
*प्रतिकारशक्ती वाढते*
१) नियमित अभ्यंगाने त्वचा व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
२) तसेच ऋतुबदलामुळे होणाऱ्या सर्दी, ताप, त्वचारोगांपासून संरक्षण मिळते.
*शरीर आणि मन शुद्धीकरण*
१) अभ्यंग स्नानाला पापनाशक व शुभ मानले जाते.
२) दीपावलीचा प्रारंभ “शुद्ध मन आणि निरोगी शरीर” या भावनेने करण्याचा हा उपाय आहे.
३) दीपावलीचे अभ्यंग स्नान हे केवळ धार्मिक विधी नसून, आयुर्वेदानुसार हे शरीरशुद्धी, रोगप्रतिबंध, सौंदर्य आणि मानसिक संतुलन यांचे प्रतीक आहे.
४) यामुळे शरीर तेजस्वी, मन प्रसन्न आणि आत्मा निर्मळ राहतो.
संकलित...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
.jpeg)
Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा