आपण जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा मटर पनीर हा डिश जवळजवळ सगळ्यांचा फेव्हरेट असतो. पण जर हाच चवदार पदार्थ आपल्या घरच्या घरी रेस्टॉरंटसारखा झकास बनवता आला तर? 😍
आज आपण पाहणार आहोत खास सीक्रेटसह मटर पनीर रेसिपी, जी खाल्ल्यानंतर तुम्ही नक्की म्हणाल – "हे खरंच रेस्टॉरंटपेक्षा टेस्टी आहे!"
👉लागणारे साहित्य (Ingredients) :
👉४ जणांसाठी पुरेल एवढे साहित्य :
पनीर (Paneer) – २५० ग्रॅम (चौकोनी तुकडे करून)
मटार (Green peas) – १ कप (फ्रेश/फ्रोजन)
कांदा (Onion) – २ मध्यम (बारीक चिरलेले)
टोमॅटो (Tomato) – ३ मध्यम (पेस्ट करून)
आलं-लसूण पेस्ट (Ginger-Garlic paste) – १ मोठा चमचा
काजू (Cashew nuts) – ८ ते १० (पेस्ट करून)
हिरवी मिरची (Green chili) – २ (चिरलेली)
लाल तिखट (Red chili powder) – १ चमचा
धणेपूड (Coriander powder) – १ चमचा
हळद (Turmeric powder) – ½ चमचा
गरम मसाला (Garam masala) – ½ चमचा
कसूरी मेथी (Kasuri methi) – १ चमचा (हाताने कुस्करून)
मीठ (Salt) – चवीनुसार
तेल (Oil) – ३ मोठे चमचे
तूप/लोणी (Ghee/Butter) – १ चमचा
कोथिंबीर (Coriander leaves) – सजावटीसाठी.
🍲 बनवण्याची पद्धत (Step by Step Process) :
स्टेप १ :
सर्वप्रथम कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात पनीरचे चौकोनी तुकडे हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या आणि एका प्लेटमध्ये बाजूला ठेवा.
स्टेप २ :
त्याच कढईत थोडे तेल टाकून कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची टाकून छान परतून घ्या.
स्टेप ३ :
आता त्यात टोमॅटो पेस्ट टाकून ५-६ मिनिटे परता, जोपर्यंत तेल वेगळं सुटेपर्यंत.
स्टेप ४ :
यानंतर लाल तिखट, हळद, धणेपूड घालून मसाला नीट परता. नंतर काजूची पेस्ट घाला. यामुळे ग्रेव्हीला रेस्टॉरंटसारखी क्रीमी टेक्स्चर येते.
स्टेप ५ :
आता यात १ कप पाणी घालून ५ मिनिटे उकळा. त्यात मटार टाका आणि झाकण ठेवून शिजू द्या.
स्टेप ६ :
शेवटी परतलेले पनीरचे तुकडे, गरम मसाला आणि कसूरी मेथी टाका. २ मिनिटे हलके ढवळून गॅस बंद करा.
स्टेप ७ :
वरून तुपाचा एक चमचा घाला आणि कोथिंबीर टाकून सजवा.
🍛 सर्व्ह कसे करावे.?
गरमागरम मटर पनीर तयार आहे
हा पदार्थ तुम्ही गरम फुलके, पराठा, नान किंवा अगदी भातासोबतही सर्व्ह करू शकता. एकदा घरच्या घरी असा बनवून पाहा, तुम्हाला रेस्टॉरंटची आठवणच येणार नाही!
👉खास टिप्स (Secret Tips) :
पनीर ताजं असेल तर चव अधिक छान लागते.
ग्रेव्हीला रिच टेक्स्चर देण्यासाठी काजू पेस्ट नक्की वापरा.
कसूरी मेथी घालायला विसरू नका, त्याने रेस्टॉरंटसारखा सुगंध येतो.
😌 खाऊन झाल्यावर मन अगदी रिलॅक्स होईल!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
.jpeg)
Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा