मुख्य सामग्रीवर वगळा

*गुंतवणुकीच्या २० मोठ्या चुका (आणि त्या कशा टाळाव्यात)*

INVESTMENT हे पैसे वाढवण्याचं एक चांगलं साधन आहे, पण त्यात चुका होणं सहज शक्य आहे. तुम्ही अनुभवी INVESTOR असा की नवशिक्या, या सामान्य चुका माहित असणं महत्वाचं आहे. येथे २० मोठ्या चुका आणि त्या कशा टाळाव्यात याची माहिती आहे...


१.जास्त अपेक्षा ठेवणे - 

बरेच लोक MARKET मध्ये खूप मोठ्या अपेक्षांसह येतात, ज्यामुळे नंतर निराशा होते. योग्य अपेक्षा ठेवल्याने धीर राखता येतो आणि दीर्घकालीन वाढीवर लक्ष केंद्रित करता येतं. साधारण वर्षाला ७% - १० % RETURN ची अपेक्षा ठेवणं योग्य आहे.


२.INVESTMENT चे GOALS नसणे - 

स्पष्ट उद्दिष्टं नसताना INVESTMENT करणं योग्य नाही. RETIREMENT किंवा घर खरेदी यासारखी SPECIFIC उद्दिष्टं असणं महत्वाचं आहे.


३.DIVERSIFICATION नसणे - 

सगळे पैसे एकाच STOCK किंवा INVESTMENT मध्ये ठेवणं धोक्याचं आहे. वेगवेगळ्या INVESTMENTS मध्ये पैसे विभागून ठेवल्याने RISK कमी होतो.


४.SHORT-TERM विचार करणे - 

अल्पकालीन विचार करणं चुकीचं आहे. यामुळे एक-दोन दिवसांत प्रॉफिट कमावण्याचा विचार करणं किंवा MARKET खाली आलं की घाबरून विकून टाकणं या सारख्या चुका होतात.


५.महाग खरेदी आणि स्वस्त विक्री - 

भावनिक होऊन INVESTMENT करणं नुकसानकारक ठरतं. बरेच लोक किंमत जास्त असताना खरेदी करतात आणि कमी असताना विकतात.


६.खूप जास्त TRADING करणे - 

सतत TRADING केल्याने तुमच्या RETURNS वर परिणाम होतो. एका अभ्यासानुसार, जास्त TRADING करणारे INVESTORS साधारण ६.५% कमी RETURNS मिळवतात.


७.जास्त FEES देणे - 

जास्त FEES देणं हे तुमच्या RETURNS वर परिणाम करतं. ETFs आणि MUTUAL FUNDS सारखे कमी खर्चिक पर्याय निवडणे अधिक उत्तम.


८.फक्त TAX वर लक्ष केंद्रित करणे - 

TAX बघणं महत्वाचं आहे, पण फक्त TAX च्या आधारे निर्णय घेणं चुकीचं आहे. बरेच लोक टॅक्स वाचवण्याला प्राधान्य देतात. प्रत्यक्षात परतावा किती मिळेल आणि धोका किती कमी आहे यावर फोकस हवा.


९.नियमित REVIEW न करणे - 

तुमची आर्थिक स्थिती आणि MARKET सतत बदलत असतं. PORTFOLIO चा नियमित REVIEW न केल्यास अनपेक्षित धोके उद्भवू शकतात.


१०.RISK चं चुकीचं आकलन - 

खूप जास्त RISK घेणं किंवा खूप कमी RISK घेणं दोन्ही चुकीचं आहे. योग्य प्रमाणात RISK घेणं महत्वाचं आहे. जास्त रिस्क मध्ये पैसे जमवण्याचा धोका असतो आणि कमी धोका असेल तर गुंतवणूक कमी वाढण्याचा धोका असतो. 


११.तुमचा PERFORMANCE माहित नसणे - 

बरेच लोक त्यांच्या INVESTMENTS चा PERFORMANCE TRACK करत नाहीत. तुमच्या GOALS प्रमाणे INVESTMENTS कसं चाललंय हे माहित नसल्यास STRATEGY बदलणं कठीण होतं.


१२.MEDIA च्या प्रभावाखाली येणे - 

MEDIA नेहमी SHORT-TERM MARKET MOVEMENTS वर FOCUS करते, ज्यामुळे भीतीपोटी विकण्याचा निर्णय होतो. शांत राहून LONG-TERM PLAN वर FOCUS करणं महत्वाचं आहे. 


१३.INFLATION (महागाईचा दर) विसरणे - 

INFLATION तुमच्या पैशांची खरेदी क्षमता कमी करतं. इतिहासात, INFLATION दर वर्षी साधारण ४% राहिलंय. एका वर्षात १०० रुपयांची किंमत ९६ रुपये होते, आणि २५ वर्षांत ती ४८ रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. त्यामुळे आपली गुंतवणूक महागाईच्या दरापेक्षा जास्त परतावा देते आहे ना याकडे लक्ष असु द्या.


१४.MARKET TIMING करण्याचा प्रयत्न - 

प्रोफेशनल INVESTORS सुद्धा MARKET TIMING करू शकत नाहीत. MARKET च्या UPS AND DOWNS चा अंदाज लावण्याऐवजी, DOLLAR-COST AVERAGING (SIP) सारखी CONSISTENT STRATEGY वापरणं चांगलं.


१५.DUE DILIGENCE न करणे - 

INVESTMENT करण्याआधी संशोधन करणं महत्वाचं आहे. FINANCIAL ADVISORS ची पात्रता तपासणे आणि तुमच्या INVESTMENTS बद्दल बेसिक माहिती असणं गरजेचं आहे.


१६.चुकीच्या Advisor सोबत काम करणे - 

योग्य ADVISOR शोधण्यात वेळ लागतो, पण तो वेळ महत्वाचा आहे. चांगला FINANCIAL ADVISOR तुमच्या LONG-TERM GOALS साठी योग्य STRATEGY बनवायला मदत करतो.


१७.भावनिक होऊन INVESTMENT करणे - 

भावनांच्या आधारे INVESTMENT चे निर्णय घेणं नुकसानकारक ठरतं. सारासार विचार करून तुमच्या STRATEGY वर ठाम राहणं महत्वाचं आहे.


१८.जास्त परताव्याच्या मागे धावणे - 

जास्त RETURNS देणाऱ्या INVESTMENTS मध्ये जास्त RISK असते. केवळ RETURNS च्या मागे न धावता, प्रत्येक INVESTMENT चा RISK नीट तपासा.


१९.INVESTMENT सुरू करण्यात उशीर करणे - 

जितका उशीर कराल, तितका तुमच्या पैशांना वाढण्यासाठी कमी वेळ मिळेल. लहान रक्कमेची सुद्धा COMPOUND INTEREST मुळे काळानुसार मोठी वाढ होते.


२०.तुमच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे - 

MARKET तुमच्या नियंत्रणात नसतं, पण तुमची INVESTMENT STRATEGY, FEES आणि नियमित CONTRIBUTIONS तुमच्या नियंत्रणात असतात. MARKET कसंही असलं तरी नियमित छोट्या रकमा INVEST करत राहिल्यास, दीर्घकाळात चांगली वाढ होऊ शकते.


या सर्व चुका लक्षात ठेवून, RATIONAL आणि LONG-TERM STRATEGY वापरल्यास, तुमचे RETURNS वाढू शकतात आणि RISK कमी होऊ शकतो. या चुकांपासून शिकून तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवता येईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

XEROX MEANING IN MARATHI : कॉलेज–ऑफिसमध्ये रोज ‘झेरॉक्स’शिवाय पान हलत नाही; पण ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात? जाणून घ्या उत्तर...

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या... आपण सर्वांनी कधी ना कधी ऐकलेलं वाक्य, “भय्या, एक झेरॉक्स देना” इतकं सर्वसामान्य झालंय की, त्यामागे खरी कहाणी आहे, हे आपण विसरतो. कॉलेज असो, सरकारी ऑफिस असो किंवा अगदी कोपऱ्यावरचं स्टेशनरीचं दुकान, झेरॉक्स हा शब्द इतका अंगवळणी पडलाय की, ‘फोटो कॉपी’ हा मूळ शब्द कुणाला आठवतच नाही. पण गंमत अशी की, झेरॉक्स हा प्रत्यक्षात अर्थाच्या अनुषंगाने वापरला जाणारा शब्द नाही, तर ते एका अमेरिकन कंपनीचं नाव आहे, ज्यानं जगभरात कॉपी मशीनचं साम्राज्य निर्माण केलं. १९३८ मध्ये चेस्टर कार्लसन नावाच्या संशोधकानं ‘झेरोग्राफी’ नावाची प्रक्रिया शोधली आणि शाई किंवा कार्बन पेपरशिवाय कॉपी काढणं शक्य झालं. याच तंत्रज्ञानावर आधारित ‘XEROX 914’ नावाचं पहिलं प्लेन पेपर कॉपियर मशीन १९५९ मध्ये आलं आणि ते इतकं गाजलं की, कंपनीचं नावच XEROX CORPORATION पडलं. या मशीनच्या अफाट यशामुळे ‘झेरॉक्स’ हा शब्द हळूहळू ‘फोटो कॉपी’साठी पर्याय बनला आणि लोकांच्या जिभेवर तो कायमचा बसला. भारतही त्याला अपवाद ठरला नाही. येथेही “झेरॉक्स काढा,” ...

* डोळ्याखालील काळी वर्तुळे...

स्त्री / पुरुषांच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी घरगुती उपाय पाहुयात... मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही अनेक दिवसांपासून पुरेशी झोप घेत नसाल तर त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात हे टाळण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप (किमान ६ ते ७ तास सलग) घ्या. विश्रांती ही महत्त्वाची आहे, त्यामुळे डोळ्याखालील ताण कमी होऊन ते काळे पडणार नाहीत. 👉सकाळी चहा केल्यानंतर चहाचे (चोथा) छोटे कण फ्रीजमध्ये ठेवा, त्यानंतर थंड झाल्यावर पुरुषांनी डोळ्याखाली हलक्या हाताने चोळा त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. 👉टोमॅटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात, एक चमचा टोमॅटोची पेस्ट आणि लिंबाचा रस (१०थेंब) एकत्र करून मिश्रण तयार करावे, हे मिश्रण आपल्या डोळ्याखाली लावावे, दोन मिनिटे तसेच ठेवावे त्यानंतर थंड पाण्याने धुऊन काढावे. 👉बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत डोळ्या जवळील त्वचेला याचा लाभ मिळतो, बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते, रात्री डोळ्याखाली बदाम तेल लावावे हलक्या हाताने मसाज करावा सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवावा. 👉स्त्री पुरुषांच...

*INTERVAL WALKING म्हणजे काय?

संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी "Interval Walking" आहे खूप फायदेशीर.समजून घ्या योग्य पद्धत... मित्रांनो, इंटरव्हल चालण्यामुळे शरीराला जास्त थकवा येत नाही आणि लवकर रिकव्हरही होते. इंटरवलदरम्यान तुम्ही सामान्य श्वासोच्छ्वास करता, ज्यामुळे तुम्हाला तुमचे फिटनेस ध्येय गाठणे सोपे होते. बरेच लोक चालण्याने वजन कमी होत नाही म्हणून वैतागून जातात आणि शेवटी ते चालणे बंद करतात. तुमच्यासोबतही असेच काही घडत असेल तर इंटरव्हल चालणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वास्तविक, इंटरव्हल वॉकिंगमध्ये (INTERVAL WALKING) तुम्हाला लवकर-लवकर चालावे लागते, जेणेकरून जास्त चरबी जाळली जाऊ शकते आणि वजन झपाट्याने कमी (WEIGHT LOSS) होते. या चालण्याच्या दरम्यान शरीराला अनेक ब्रेक दिले जातात आणि प्रत्येक ब्रेकसाठी एक वेळ निश्चित केली जाते. इंटरव्हल चालण्यामुळे शरीराला जास्त थकवा येत नाही आणि लवकर रिकव्हरही होते. इंटरवलदरम्यान तुम्ही सामान्य श्वासोच्छ्वास करता, ज्यामुळे तुम्हाला तुमचे फिटनेस ध्येय गाठणे सोपे होते. अशा प्रकारे, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर इंटरवल ट्रेनिंग हा (INTERVAL WALKING FOR WEIGHT LOSS...