१९२० च्या दशकाच्या सुरुवातीला, मद्रास प्रांतातील (आजचा तामिळनाडू) शिवकाशी गावातील दोन तरुण चुलत भाऊ शन्मुग नादर आणि अय्या नादर कलकत्त्यात (आजचे कोलकाता) झपाट्याने वाढणारे कारखाने पाहून प्रभावित झाले. त्यांनी दूरच्या बंगाल प्रांतात नोकरीच्या शोधात प्रवास केला.
तेथे त्यांना एका मॅचस्टिक (काडीपेटी) कारखान्यात काम मिळाले. काम करताना त्यांनी त्या उद्योगाचे सर्व बारकावे शिकून घेतले. त्यांना लक्षात आलं — “हे आपण आपल्या गावातही करू शकतो!”
अशा रीतीने शिवकाशीतील पहिल्या औद्योगिक युनिटची पायाभरणी झाली. काही वर्षांनी त्यांनी फटाक्यांचा व्यवसायही शिकून घेतला, कारण मॅचस्टिक आणि फटाके हे दोन्ही ‘आगी’शी संबंधित होते. दशकभरानंतर जन्म झाला शिवकाशीतील पहिल्या फटाका उद्योगाचा.
ते छोटं गाव आता शहर बनलं आहे आणि भारतातील सुमारे ९०% फटाके इथेच बनतात! तब्बल ८ लाख लोकांना या उद्योगातून थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळतो आणि या उद्योगक्षेत्राचे बाजारमूल्य आहे जवळपास ₹६,००० कोटी.
त्याच शिवकाशी मध्ये १९४२ मध्ये N. R. K. RAJARATHNAM या उद्योजकाने आणखी एक मॅचस्टिक युनिट सुरू केले, ज्याने नंतर फटाक्यांमध्ये विस्तार केला. त्या उद्योगाचे नाव STANDARD FIREWORKS . हा आता भारतातील सर्वात मोठा फटाके ब्रँड आहे.
एक छोटी सुरुवात पुढे जाऊन किती मोठी होऊ शकते. अंमलात आणलेली एक छोटी कल्पना कित्येक पिढ्या टिकेल असा व्यवसाय उभारू शकते याचे हे उदाहरण.
मग तुम्ही कोणती कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयत्न करताय?
(टीप - हा लेख फटाक्यांच्या समर्थनार्थ नाही आहे. आपली आर्थिक प्रगती आणि आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी आणि समजण्यासाठी हा लेख सगळ्यांशी शेअर करत आहे.)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा