WORKING WOMENS *महिलांनो स्वतःमध्ये बदल करा* सकाळी उशीर होतो म्हणून रात्रीच पीठ (कणीक) मळून ठेवताय.? मग तुमच्या आतड्यांवर कसा होतो परिणाम वाचा...
👉HOW LONG CAN WE STORE ATTA...
काही जण सकाळी वेळ वाचवण्यासाठी ऑफिस आणि शाळेत टिफिनमध्ये पोळ्या (चपाती) देण्यासाठी रात्रीच तयारी करून घेतात. म्हणजेच पोळी (चपाती) साठी लागणारे पीठ रात्री मळून ठेवतात आणि ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात.
आपल्यातील बऱ्याच जणांची पोळी (चपाती) खाल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. पण पोळी (चपाती) बनवण्यासाठीची तयारी बरीच आधी करावी लागते, त्यातच सगळ्यात मोठी बाब म्हणजे पीठ मळणे होय.
म्हणून काही जण शाळेत आणि ऑफिसमध्ये जाणाऱ्यांना टिफिनसाठी वेळेत पोळ्या देता याव्यात आणि सकाळी त्याबाबतचा वेळ वाचावा यासाठी रात्रीच तयारी करून घेतात.
म्हणजेच पोळी (चपाती)साठी लागणारे पीठ रात्री मळून ठेवून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात.
पण, ही पीठ (कणीक) साठवण्याची चुकीची पद्धत आहे, जी पिठामध्ये जास्त ग्लुटेन सोडते, ज्यामुळे अनेकांना पचनासंबंधीच्या समस्या उदभवू शकतात.
बहुतेक लोकांना वाटते की, गहू ही समस्या आहे, पण प्रत्यक्षात आपल्या सवयीच त्रासाचे मूळ कारण असतात. त्यातच सर्वांत मोठी चूक म्हणजे...
सकाळी पीठ मळून ठेवून दुपारी अथवा रात्री वापरणे किंवा फ्रिजमध्ये जवळपास २० ते ३०-४० तास पीठ डब्यात घालून ठेवणे.
जेव्हा पिठात मिसळलेले पाणी जास्त काळ राहते तेव्हा त्यातून जास्त प्रमाणात ग्लुटेन बाहेर पडते, ज्यामुळे पोळ्या ताणलेल्या, चिकट आणि पचण्यास कठीण होतात.
त्यामुळे ताजे पीठ म्हणजे कमी ग्लृुटेन आणि सहज पचण्यास साह्यभूत ठरते.
तेव्हा ताजे पीठ मळून घ्यावे अगदी १५ ते २० मिनिटांत लगेचच त्याच्या पोळ्या (चपात्या) करून घेतल्या पाहिजेत.
तसेच २० ते २५ दिवसांपेक्षा जास्त काळ गहू पीठ साठवणे टाळले पाहिजे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
* चेहऱ्यावरील काळसरपणा, पिंपल्स, डाग, कोरडी त्वचा,पिग्मेंटेशन यावर घरगुती सोपे उपाय...
👉🏻 संत्र्याच्या सालीचं चूर्ण व गुलाबजल पेस्ट करून तोंडाला लावा.
👉🏻 जाईच्या पाल्याच्या रसात हळकुंड उगाळून लावा.
👉🏻 कच्चा / उकडलेला बटाटा लावा.
👉🏻 तुळस व लिंबु रस आठवड्यात दोनदा लावणे.
👉🏻 कडुलिंबाची मुळी उगाळुन तीचा लेप लावणे दहा दिवस.
👉🏻 जांभूळ बी पावडरचा लेप चेहऱ्यावर लावणे.
👉🏻 ओली हळद वाटून चेहऱ्याला लावणे.
👉🏻 साय, हळद, लिंबू, मध एकत्र करून त्वचेवर लावा. मऊ पडते व चेहरा उजळतो.
👉🏻 आवळ्याची पूड तेलात भिजवून लावणे.
👉🏻 रोज अक्रोड खा.
👉🏻 कारल्याच्या पानाचा रस लावा.
👉🏻 मध, तूप एकत्र करून आंघोळी पूर्वी दोन तास लावा.
👉🏻 महामंजिष्ठादी काढा ४ चमचे व तितकेच कोमट पाणी टाकून सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घेणे.
👉🏻 काळे डाग व पिगमेटेशन, वांग असल्यास कोथिंबिर लेप लावा.
👉🏻 रोज साबणाचा वापर न करता हळद, कोरफड, मध, कडूलिंब व कोथींबीर रस यांचा फेसवाँश एकदम अथवा वेगवेगळा वापर करून तोंड धुणे.
👉🏻 ज्येष्ठमध पावडर, दूध व चंदन पावडर एकत्र करून झोपण्यापुर्वी काही दिवस लावा.
👉🏻 वांग, काळे डाग, उन्हामुळे झालेले टॅनिंग कमी होण्यास मदत होईल व चेहरा उजळेल.
👉🏻 आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी तुम्ही कोणत्याही डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.
संकलित...
* टीप :
माहिती आवडल्यास सर्व ग्रुप वर शेअर करा, गरजूंना उपयोग होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा