हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीत आरोग्य सुधारते, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, स्नायू बळकटीकरण, तणाव कमी करणे आणि इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवणे... असे अनेक फायदे आहेत आपण संपूर्ण माहिती या लेखामध्ये सविस्तर पाहूया...
* नियमित जिना चढण्यामुळे होणारे फायदे...
मित्रांनो, शारीरिक हालचाल कमी असणारी बैठी जीवनशैली ही अलीकडच्या काळातील मोठी समस्या झाली आहे. याचा अनेकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अत्यंत विपरित परिणाम होतो आहे. त्यातून अनेक गंभीर आजार उद्भवत आहेत.
मात्र, यावर मात करण्यासाठी तुम्ही तासनतास जिममध्ये जाण्याची गरज नाही. अगदी रोजच जे करतो त्यात थोडा बदल केला तरी पुरेसे आहे. म्हणजे बघा ना आपल्या जीवनात LIFT चा वापर न करता जर आपण पायऱ्यांचा वापर केला तर, त्याचे काय फायदे मिळतात ते आपण आज सविस्तर जाणून घेऊया...
पायऱ्या चढल्यामुळे फक्त ह्रदयविकारासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होत नाही, तर त्यातून शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे फायदे होतात. ज्यात हृदय व रक्तवाहिन्यांसाठी आरोग्य सुधारणे, स्नायू मजबूत करणे, वजन कमी करणे आणि मानसिक आरोग्य सुधारणे यांचा समावेश आहे.
पायऱ्या चढण्याऐवजी लिफ्टचा वापर करण्याचा मोह आपल्याला नक्कीच होतो. मात्र, दिवसभरात काही पायऱ्या चढल्यानं देखील तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला फायदा होऊ शकतो.
* चपळता वाढणे :
पायऱ्या चढण्याने चपळता वाढते. REFLEXES छान होतात.
* हाडे आणि सांधे मजबूत करणे :
पायऱ्या चढल्याने हाडे आणि सांधे मजबूत होतात, ज्यामुळे वृद्धत्वात पडण्याचा धोका कमी होतो.
* मधुमेहाचा धोका कमी करणे :
पायऱ्या चढल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
* उत्तम संतुलन :
पायऱ्या चढण्याने संतुलन सुधारते, ज्यामुळे पडण्याचा धोका कमी होतो,
* हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य :
पायऱ्या चढल्याने हृदयाची गती वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. नियमित पायऱ्या चढल्याने हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.
* स्नायू मजबूत करणे :
पायऱ्या चढणे हे पायांचे स्नायू बळकट करते आणि शरीर अधिक लवचिक बनण्यास मदत करते.
* वजन कमी करणे :
पायऱ्या चढणे हा एक उत्कृष्ट एरोबिक व्यायाम आहे, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
* मानसिक आरोग्य :
पायऱ्या चढल्याने डोपमाइन आणि सेरोटोनिन यांसारखी नैसर्गिक रसायने बाहेर पडतात, ज्यामुळे मूड सुधारतो, तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते.
पायऱ्या चढणे-उतरणे हा अतिशय तीव्र व्यायाम प्रकार आहे. याचे प्रचंड एरोबिक फायदे आहेत. एक पायरी चढताना तुम्ही सुमारे 0.17 कॅलरीज जाळू शकता. दररोज किमान अर्धा तास अशाचप्रकारे पायऱ्या चढून वर-खाली जात असाल तर कॅलरीज बर्याच प्रमाणात बर्न होतात.
दररोज जिन्याचे पाचपेक्षा अधिक टप्पे (एक टप्पा साधारण 9 ते 11 पायऱ्या) म्हणजे 50 पावलं किंवा पायऱ्या चढल्यास त्याचा संबंध ॲथेरोस्क्लेरोटिक ह्रदविकाराच्या आजारांचा (एएससीव्हीडी) धोका कमी होण्याशी आहे. हा आजार धमन्यांमध्ये थर जमल्यामुळे होतो.
तसेच जे जिना चढणं टाळतात, त्यांच्यासाठी लिफ्ट किंवा एलिव्हेटर ऐवजी पायऱ्या चढण्याचा पर्याय निवडणं हा व्यायामाचा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तो तुमच्या शरीराला आणि मनाला फायदेशीर ठरू शकेल. त्यामुळे आजपासूनच पायऱ्या चढणं सुरू करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
* कफनाशक "ज्येष्ठमध"*
*गुणधर्म*
१) स्निग्ध, मधुर व थंडावा देते.
२) त्रिदोषांचे शमन करते.
३) त्वचेचा वर्ण सुधारतो.
४) दृष्टी व आवाज सुधारते.
५) केशवर्धक.
६) सूजनाशक.
७) पित्तशामक
८) रक्तशुद्धीकर
९) शुक्रवर्धक.
*उपयोग*
१) घशातील सूज, कफ / खोकला व क्षय यांवर उपयोगी.
२) श्वासमार्गातील व आतड्यातील सूज, व्रण / अल्सर व जळजळ यावर उपयोगी.
३) कोणत्याही कारणाने आलेली अशक्तता कमी होते - शक्ती येते.
४) कंड, खरूज, सूज इ. त्वचाविकारात उपयोगी.
*वापरण्याची पद्धती*
१) चाटण : अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण + एक चमचा मध. मुख्यतः (घशासाठी व कफासाठी)
२) गुळण्या : अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण + अर्धा कप पाणी उकळवणे - (आवाजासाठी)
३) उकळवून गाळून पिणे :
अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण + अर्धा कप पाणी उकळवणे
व दिवसभरात ३ वेळा पिणे - (कफासाठी)
संकलित...
* टीप : आरोग्य विषयक माहिती आवडल्यास पुढे जरूर पाठवा गरजूंना उपयोग होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा