"वांग" ही एक अशी स्थिती आहे ज्यामुळे त्वचेच्या रंगात असमानता दिसू लागते.आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे त्वचेला रंग प्राप्त होत असतो.ज्याला मेलानोसाईट्स असं म्हटलं जातं.
मेलानोसाईट्स मेलनिनचं उत्पादन करतात.ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो.जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भागत जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं.त्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो.
पिगमेंटेशनची अनेक कारणं असू शकतात जसे सूर्याच्या हानीकारक किरणांमुळे, हार्मोनल इम्बॅलन्स,त्वचेची जळजळ, जास्त वेळ कॉम्प्युटरवर काम करणं, बर्थ कंट्रोल पिल्स, फेशियल हेअर रिमूव्हल, औषधांचा दुष्परिणाम इ...
🔰 *चेहऱ्यावरील वांगमध्ये आढळणारे प्रकार.*
१) मेलास्मा (MELASMA)
२) सोलर लेंटीजाईन्स (SOLAR LENTIGINES)
३) फ्रेकल्स (FRECKLES).
🔰 चेहऱ्यावरील *वांग* व *काळे डाग* घालवण्यासाठी आणि त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आहारात खालील पदार्थांचा समावेश करा...
🔰 *पालेभाज्या फळे :*
त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी आहारात पालेभाज्यांचा (मुख्यत्वे: पालकचा) समावेश करावा.हिरव्या पालेभाज्या कॅल्शियम, बीटा कॅरोटीन आणि जीवनसत्त्व क चा समृद्ध स्रोत आहेत. त्याचबरोबर फळांमध्ये विशेषतः आंबट वर्गीय फळांचा समावेश करावा जेणेकरून व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात मिळून त्वचा तजेलदार दिसेल.
🔰 *चरबीयुक्त मासे (फॅटी फिश) :*
सॅलमन, मॅकरेल आणि हेरिंग सारखे मासे हे निरोगी त्वचेसाठी उत्कृष्ट आहेत, हे मासे ओमेगा-३ फॅटी ॲसिड, उच्च दर्जाचे प्रथिने, व्हिटॅमिन ई आणि झिंक यांच्या समृद्ध स्रोत आहेत... अशा माशांचा आहारात समावेश केल्यास त्वचा निरोगी व ओलसर राहते आणि त्वचेचे सौंदर्य देखील टिकून राहते.
🔰 *अक्रोड :*
अक्रोड हे आवश्यक फॅट, झिंक, व्हिटॅमिन ई, सेलेनियम आणि प्रथिने यांचा उत्कृष्ट स्रोत आहे.ही सर्व पोषक तत्त्वे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत.
🔰 *सूर्यफुलाच्या बिया :*
यामध्ये व्हिटॅमिन ई आहे. जे त्वचेसाठी एक महत्त्वाचे अँटिऑक्सिडंट आहे.
🔰 *टोमॅटो आणि रताळे :*
टोमॅटो हे व्हिटॅमिन सी आणि सर्व प्रमुख कॅरोटेनॉइड्स विशेषत: लायकोपिनचे चांगले स्रोत आहे.हे कॅरोटेनॉइड्स त्वचेला उन्हापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात आणि चेहर्यावरील सुरकुत्यास प्रतिबंध करतात.
🔰 *पाणी :*
पुरेसे पाणी शरीरातील टॉक्सिक घटक व फ्री रॅडिकल्स बाहेर काढण्यास मदत करतात व पेशींना हायड्रेट ठेवते.जेणेकरून त्या सहजपणे सूर्यप्रकाशाच्या प्रभावांना प्रतिकार करू शकतात.
🔰 त्याचबरोबर चेहऱ्यावरील वांग / काळे डाग घालवण्यासाठी दूध-दुग्धजन्य पदार्थ, साखर, तळलेले पदार्थ, साधी कर्बोदके, कॉफी व कॅफिनेटेड प्रॉडक्ट्स यांचा आहारात कमीत कमी समावेश करावा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*वांग, काळे डाग,पिग्मेंटेशन घरगुती उपाय...
मित्रांनो, चेहऱ्यावरील वांग काळे डाग पिग्मेंटेशन या साठी काही घरगुती उपाय देत आहे. त्या पद्धतीने त्यातील जे साहित्य घरामध्ये उपलब्ध असेल ते करुन बघा.नक्कीचं चांगला फरक पडेल...
👉🏻 संत्र्याच्या सालीचं चूर्ण, गुलाब जलात पेस्ट करून चेहऱ्याला लावा.
👉🏻 जाईच्या पाल्याच्या रसात हळकुंड उगाळून लावा.
👉🏻 *कच्चा / उकडलेला बटाटा लावा.*
👉🏻 तुळस व लिंबु रस आठवड्यात दोनदा लावणे.
👉🏻 *कडुलिंबाची मुळी उगाळुन तीचा लेप लावणे दहा दिवस.*
👉🏻 जांभूळ 'बी' पावडरचा लेप चेहऱ्यावर लावणे.
👉🏻 *ओलीहळद वाटून चेहऱ्याला लावणे.*
👉🏻 साय, हळद, लिंबू, मध एकत्र करून त्वचेवर लावा. मऊ पडते व चेहरा उजळतो.
👉🏻 *आवळ्याची पूड तेलात भिजवून लावणे.*
👉🏻 रोज अक्रोड खा.
👉🏻 कारल्याच्या पानाचा रस लावा.
👉🏻 *मध, तूप एकत्र करून आंघोळी पूर्वी दोन तास लावा.*
👉🏻 महामंजिष्ठादी काढा ४ चमचे व तितकेच कोमट पाणी टाकून सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घेणे.
👉🏻 *काळे डाग व पिगमेटेशन, वांग असल्यास कोथिंबिर लेप लावा.*
👉🏻 रोज साबणाचा वापर न करता हळद, कोरफड, मध, कडूलिंब व कोथींबीर रस यांचा फेसवाँश एकदम अथवा वेगवेगळा वापर करून तोंड धुणे.
👉🏻 *ज्येष्ठमध पावडर, दूध, व चंदन पावडर एकत्र करून झोपण्यापुर्वी काही दिवस लावा.*
या घरगुती उपायांचा चेहऱ्यावरील वांग, काळे डाग, उन्हामुळे झालेले टॅनिंग कमी होण्यास मदत होईल व चेहरा उजळेल.
🌱 *आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी तुम्ही कोणत्याही डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.
संकलित...
*टीप : माहिती आवडल्यास सर्व ग्रुप वर शेअर करा, गरजूंना उपयोग होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा