मित्रांनो,
व्यायाम करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांकडून तुम्ही निवडलेला व्यायाम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही याची खात्री करुन घ्या.
चालणं हा उत्कृष्ट व्यायाम आहे. रोज 1 तास जलद चालण्याचा व्यायाम न चुकवता वेळ मिळेल त्या वेळी करावा. तो घरातल्या घरात, रस्त्यावर, ट्रेड मिलवर कुठेही चालेल. रोज किमान 6 ते 8 कि.मी. चालावं. वजन कमी करण्यासाठी जास्त चालणं आधिक उपयोगी. मात्र त्यामध्ये प्रामाणिकपणा असावयास हवा. कोणतीही गोष्ट सातत्याने केल्यास लवकर फळास येते. चालण्याची सवय असायला पाहिजे, सतत वाहन वापराने ही चांगली सवय सुटते. तसेच काम करताना बैठे करण्यापेक्षा उभ्याने केलेले उर्जा वापरासाठी जास्त चांगले असते.
दमसासाचे व्यायाम आणि डोंगर चढण्यासारखे गुरुत्वाकर्षण विरोधी व्यायाम वजन लवकर घटवतात. पण चरबी जळण्याची पाळी व्यायामाच्या तिसाव्या मिनिटानंतरच होते. दररोज अर्धा तास व्यायाम करावा. यामुळे अनावश्यक जमा झालेली कॅलरी घटवता येते.
रोज नियमित दमण्याचा व्यायाम करावा. जलद चालणे, दुडक्या चालीने पळणे, जिने किंवा डोंगर चढणे, सायकल चालवणे, पोहणे हे सर्व दमसासाचे व्यायाम आहेत.
उन्हाळ्याचा ऋतू वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त अनूकूल आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला चटकन घाम येतो. व त्याचाच फायदा वजन कमी करण्यासाठी होतो.
डोंगर दऱ्यांमध्ये उपाशी-तापाशी भटकणे ही गोष्ट मधून मधून अवश्य करावी. निसर्ग आपल्याला दुरुस्त करतो. पूर्वीच्या काळी पायी चारधाम यात्रेत तब्येत दुरुस्त होत असे.
दररोज 10 ते 15 मिनिटे हसले पाहिजे. यामुळे 200 कॅलरी उपयोगात येईल आणि तुम्ही तणावमुक्त राहाल. वजन वाढण्याच्या इतर कारणांमध्ये तणाव हे एक कारण आहे. कारण अशा स्थितीत रुग्ण जास्त खाण्यासाठी प्रेरित होऊ शकतो.
दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्यासाठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.
जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो... वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशा सोडू नका. कितीही उपाय केले, तरी वजन कमी होत नाही हे पाहून निराश होण्याची अजिबात गरज नाही. संतुलित आहार आणि व्यायाम यांच्या माध्यमातून वजन नक्कीच कमी करता येईल. वजन कमी होत आहे की जास्त याकडे फारसे लक्ष देऊ नये. तुम्हाला उत्साही आणि आरोग्यपूर्ण वाटत असेल तर तुमचे ठीक चालले आहे. रोज रोज वजन केल्याने केवळ वजन व भोजन या दोनच गोष्टी मनाचा ताबा घेतात.
वजन कमी करण्यासाठी आपले वजन नेहमी मोजले पाहिजे. दरदिवशी किंवा आठवड्यातून एकदा वजन मोजले पाहिजे. तसेच त्याची नोंदही ठेवले पाहिजे. डाएटिंग सुरु केल्यानंतर वजन कमी होण्याची गती अपेक्षाकृत जलद असते. नंतर मात्र ही गती मंदावते. त्यामुळे निराश होऊ नये. त्यानंतर मात्र वजन कमी होऊ लागते.
* काय खावे / काय टाळावे...
🔰 नियमीत व्यायाम आणि योगासने करा. शारीरिक श्रम करा.
🔰 पालेभाज्या अधिक प्रमाणात खा.
🔰 भाजी आणि फळांमध्ये कॅलरी कमी असतात, त्यामुळं ते जास्त प्रमाणात खावे.
🔰 जेवणापूर्वी गाजर खावे. जेवणापूर्वी गाजर खाल्यास भूक कमी होते.
🔰 रोज फळे खा. रस प्या.
🔰 भोजनात मीठ कमी वापरा.
🔰 आठवडयातून एखादे जेवण टाळावे.
🔰 मधून मधून खाण्याची सवय सोडावी.
🔰 रात्री हलका आहार घ्या.
🔰 केळ आणि चिकू खाऊ टाळावेत, त्यानं लठ्ठपणा वाढतो.
🔰 आहारात तळलेले चटकार आणि गोड पदार्थ टाळावेत.
🔰 चपाती, भाकरी, भात, साखर, बटाटे आणि मिठाई थोडी कमीच घ्या.
🔰 भाजीपाला, फळभाज्या, फळे आणि प्रथिनयुक्त पदार्थ जास्त चांगले.
🔰 गव्हाच्या पीठात सोयापीठ मिसळून प्रथिनांचे प्रमाण वाढवता येते.
🔰 जेवणामध्ये दही खाल्ल्यास चरबी कमी होते. ताजे ताकही दिवसांतून दोन-तीन वेळा प्यावं.
🔰 आठवड्यातून एखाद-दुसरे जेवण सोडून द्यावे. याने वजनावर नियंत्रण राहते.
🔰 कारल्याची भाजी खाल्यास वजन कमी होण्यास मदत होते. शेवग्याचा नियमित वापर केल्यास वजन नियंत्रित राहतं.
🔰 रोजच्या आहारात सॅलड, ज्यूस, कांदा, टमाटे, मूळा, गाजर, काकडी. पत्ता कोबी असावे. यात कमी कॅलरी तर असतात. तद्वतच आवश्यक जीवनसत्वेही असतात.
🔰 दिवसभरात गरजेनुसार 3 लिटर पाणी प्या. प्रत्येक जेवणाआधी दोन ग्लास पाणी प्या. पाण्यामध्ये काहीच कॅलरी नसतात. पाणी तहान आहे तेवढे प्यायल्याने भुकही कमी लागते. पाण्यामुळे पोटही साफ राहते.
🔰 दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते.
🔰 मुळांचा रस आणि मध सम प्रमाणात पाण्यासोबत मिसळून प्यावं, असं केल्यानं एक महिन्यात लठ्ठपणा कमी होतो.
🔰 नेहमी सकाळी एक ग्लास पाण्यात दोन चमचे मध मिसळून प्यावं, असं केल्यानं चरबी कमी होते. फक्त मध शुद्ध, कोणतीही भेसळ नसलेला व मधमाशांनी तयार केलेला असण्याची खात्री असायला हवी.
🔰 जेवताना टॉमेटो आणि कांदाच्या कोशिंबीरमध्ये मिरे आणि मीठ घालून खावे. त्यानं शरीराला विटामिन सी, ए, के, लोह, पोटॅशिअम, लायकोपिन आणि ल्यूटिन मिळतं.
🔰 ताज्या पुदिन्याच्या पानांची चटणी करुन चपातीसोबत खावी. पुदिन्याचा चहा पिल्यास वजन नियंत्रित राहतं.
🔰 एक चमचा पुदीना रसामध्ये 2 चमचे मध मिसळून प्यायलास लठ्ठपणा कमी होतो.
🔰 सकाळी उठल्यावर 250 ग्राम टोमॅटोचा रस 2-3 महिना प्यावा चरबी कमी होण्यास मदत होते.
कोबीचा ज्यूस प्यावा, चरबी कमी होते.
🔰 कमी कॅलरी आणि अधिक फायबर असणारं खाणं घ्या. सलाडस आणि ताजी फळं नियमितपणे खायला हवीत. सलाड ड्रेसिंग करणं टाळा. कडधान्य, भाज्यांचे सूप्स भरपूर घ्या.
🔰 बीफ, पोर्क, हॅम, सॉसेज असं रेड मीट आणि ऑर्गन मीट (कलेजी, भेजा) आणि अंड्याचा बलक खाऊ नका, मांसाहार वर्ज्य करावे. यात भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात.
🔰 निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.
🔰 सॅच्युरेटेड फॅट्स, तेलकट आणि गोड पदार्थ, आइस्क्रीम, चॉकलेट्स न खाल्लेलंच बरं! मोड आलेली कडधान्यं खा. यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात.
🔰 जास्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते. पोटभर खाण्याऐवजी पोट थोडे रिकामे ठेवून उठावे.
संकलित...
* टीप : माहिती आवडल्यास जरूर फॉरवर्ड करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा