"डॉक्टर, तो साध्या 'पॅरासिटॅमॉल'ने बरा होणार नाही हो... तुम्ही त्याला ते 'स्ट्राँग एंटीबायोटिकच द्या. उद्या मुलाची ट्रीप आहे, आम्हाला रिस्क नकोय!" त्या सुशिक्षित बापाचं हे वाक्य ऐकून माझ्या अंगाचा तिळपापड झाला. त्यांना 'रिस्क' नको होती. कळस म्हणजे, त्या ५ वर्षांच्या मुलाला फक्त व्हायरल सर्दी होती, आणि त्याचे वडील स्वतःच्या हाताने त्याच्या शरीरात एका 'भस्मासुरा'ला जन्म द्यायला निघाले होते. आज मला गप्प बसणं जमणार नव्हतं. मी पेन खाली ठेवला आणि त्यांना म्हणालो, "दादा, तुम्हाला १९४५ सालचा सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा इशारा माहित आहे ?" ज्या माणसाने 'पेनिसिलिन' (जगातील पहिले अँटीबायोटिक) शोधून मानवजातीला मृत्यूच्या दाढेतून वाचवलं, त्या माणसाने नोबेल पारितोषिक घेताना थरथरत्या आवाजात सांगितलं होतं... "जो अडाणी माणूस गरज नसताना एंटीबायोटिक चा वापर करेल, तोच माणूस भविष्यात बॅक्टेरियाला 'ताकद' देईल आणि स्वतःच्या विनाशाला कारणीभूत ठरेल." आज ८० वर्षांनंतर आपण तेच पाप करतोय. आपण फ्लेमिंगचा शोध फुकट घालवलाय. युद्ध शरीराच्या आतल...
All types of information are provided. Health, entertainment, education, government schemes and many more. You can also ask if you have any questions.