* उन्हाळ्यात सन टॅनिंगची समस्या आहे .? तरं खालील घरगुती उपाय करुन पहा * मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा काळवंडणे ही मोठी समस्या असते. कडक उन्हामध्ये फिरल्यास चेहऱ्यावर आणि शरीरावर तांबूस काळसर रंगाचे डाग उमटतात, त्यांना सनटॅन म्हटले जाते. उन्हाळ्यात त्वचा कोमल आणि स्वस्थ ठेवणे तसेच सनटॅनपासून बचाव करणे कठिण जाते. या समस्येवर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. जाणून घ्या उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगच्या समस्येसाठी काही सोपे उपाय... 🔰 एका वाटीत थंड दही घ्या आणि त्यात थोडी हळद मिसळा. हे मिश्रण आंघोळीच्या वीस मिनिटं आधी सन टॅन झालेल्या जागेवर लावून ठेवा. चेहऱ्यावर, गळ्यावरही लावू शकता. यामुळे टॅनिंग कमी करण्यास चांगली मदत होते. 🔰 काकडीच्या काही चकत्या बारिक करुन त्यात दोन चमचे दूध पावडर आणि काही थेंब लिंबू रस मिसळा. हे मिश्रण टॅनिंग झालेल्या भागावर लावा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून एक वेळा हा प्रयोग केल्याने टॅनिंग कमी तर होतेच शिवाय त्वचा चमकदार होते. 🔰 टॉमेटो दोन भागात कापून त्याच्या एका भागाने त्वचेवर चांगला मसाज करा. किंवा टॉमेटोचा रस काढून तोही लावू श...
All types of information are provided. Health, entertainment, education, government schemes and many more. You can also ask if you have any questions.