परवाची गोष्ट... ओपीडीत एक आई-बाबा आपल्या आठ वर्षांच्या मुलीला घेऊन आले. मुलीच्या एका हातात अजूनही तिची आवडती 'गोड डॉल' होती आणि दुसरीकडे आईच्या डोळ्यात पाणी. तक्रार काय ? "डॉक्टर, तिला 'पाळी' (Periods) सुरु झाली आहे." 🩸 हे वाचून तुमच्या काळजात धस्स झालं ना? मला नाही झालं. कारण आता माझ्या क्लिनिकमध्ये हे रोजचं झालंय. ज्या वयात मुलींनी दोरीच्या उड्या मारायच्या, त्या वयात त्या चिमुरड्या जीवांना सॅनिटरी पॅड्सची कटकट आणि पोटाचे क्रॅम्प्स सांभाळावे लागत आहेत. "आई, मला रक्त का येतंय?" हा ८ वर्षांच्या मुलीचा प्रश्न ऐकून त्या मातेचं काळीज फाटलं होतं... आणि एक डॉक्टर म्हणून माझं डोकं सुन्न झालं होतं. हे बालपण हिरावून घेणं नाही, तर काय आहे? एक बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) म्हणून मी तुम्हाला अत्यंत कडू सत्य सांगतो, जे पचवायला तुम्हाला जड जाईल: आपण आपली मुलं 'वाढवत' नाही आहोत, आपण त्यांना 'फुगवतोय'. 🐔 जसं पोल्ट्री फार्ममध्ये इंजेक्शन देऊन ४० दिवसांत 'ब्रोयलर चिकन' तयार केलं जातं, तशीच काहीशी अवस्था आज आपण आपल्या पोटच्या गोळ्याची केली आहे....
All types of information are provided. Health, entertainment, education, government schemes and many more. You can also ask if you have any questions.