👉म्हणी व त्यांचे अर्थ : १.असतील शिते तर जमतील भूते : एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात. २.असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ : दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. ३.अडला हरी गाढवाचे पाय धरी : एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. ४.अतिशहाणा त्याचा बैल रिकामा : जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्याचे मुळीच काम होत नाही. ५.अति तेथे माती : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसान कारक असतो ६.अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे : दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीनही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे. ७.अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज : गरजवंताला अक्कल नसते. ८.अंगावरचे लेणे, जन्मभर देणे : दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे. ९.अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण : मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. १०.अंधारात केले, पण उजेडात आले : कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच. ११.अक्कल नाही काडीची ...
All types of information are provided. Health, entertainment, education, government schemes and many more. You can also ask if you have any questions.