मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लवंग...

 🎯रोज रात्री 'लवंगा'चे सेवन करा होतील फायदे! आपल्या घरात सहज उपलब्ध असणारी  लवंगाचा केवळ आपल्या अन्नाची चवच वाढवत नाही, तर शरीराला पौष्टिक घटक देखील मिळवून देते. प्राचीन काळापासून याचा उपयोग आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून केला जात आहे. ● रात्री लवंगाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता, अतिसार, आंबटपणा यासारख्या पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. ● लवंगामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त आहे. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे मुरुम रोखण्यास उपयुक्त आहे. ● कोमट पाण्यासह लवंगाचे सेवन केल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. ● हात पाय थरथरण्याच्या आजाराने ग्रस्त लोक यापासून मुक्त होण्यासाठी रात्री झोपायच्या आधी 1 ते 2 लवंगा घेऊ शकतात. ● दररोज लवंगाचे सेवन केल्यास आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. ● लवंग आपल्याला खोकला, सर्दी, विषाणूजन्य संसर्ग, ब्राँकायटिस, सायनस आणि दम्यापासून मुक्त होण्यास मदत करते. 👉Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आयुर्वेद...

 👉🔎विषाणूजन्य आजार व आयुर्वेद👈 सध्याच्या परिस्थितीत, वाढणारा संसर्ग पाहिला तर हा विषाणू सर्वप्रथम पचन बिघडवतो. त्यामुळे भूक न लागणे, मळमळ होणे, सर्दी होणे, खोकला येणे, घसा दुखणे, जुलाब लागणे हे लक्षणे प्रामुख्याने जाणवतात. अशा वेळी आपण भूक लागेपर्यंत जेवण न करता फक्त मुगाचे सूप, हुलग्याचे सूप, लाह्या घेत राहिलो, गरम पाणी पीत राहिलो तरी काही दिवसात बरे होऊ शकतो. ● अंडे पचण्यास अतिशय जड असते त्यामुळे या दिवसात खाऊ नये. ● सर्व डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते त्यामुळे तेवढे घेतले तरी चालते. ● भूक लागली तरच नाष्टा घ्या नाहीतर सूप घ्या. ● औषधीमध्ये रस माधव वटी व माधव रसायन घेणे सुरू करा. ● रुग्ण ऍडमिट झालेला असेल तरी हलका आहार घेवून (ज्वारीची भाकरी+ मुगडाळ/ हुलग्याचे कढण) भुकेला/ पचनाला सांभाळले तर लवकर बरा होतो. लक्षात ठेवा! आपले पचन आपली जबाबदारी... 👍माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. ✔️Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

उन्हाळा - टिप्स...

 😓उन्हाळ्यात अशी मिळवा घामाच्या दुर्गंधीपासून सुटका! उन्हाळ्यात शरीरातून येणार्‍या घामामुळे दुर्गंध येत असेल तर खालील काही उपाय अमलात आणून यापासून सुटका होऊ शकते. ● अँटी-बॅक्टीरियल साबणाने अंघोळ करा. ● शरीर योग्यरीत्या स्वच्छ करा. ● एंटीपर्सपिरेंट वापरा. ● दररोज पाय धुणे आणि जोडे-चपला आणि मोजे स्वच्छ करणे. ● अंघोळ केल्यानंतर शरीर पुसल्याशिवाय कपडे घालू नये. ● आर्मपिट्स शेव किंवा वैक्स करत राहावी. कारण केसांमुळे अधिक घाम येतो. ● अधिक मसालेदार भोजनाचे सेवन करु नये आणि स्वत:ला हायड्रेटेड ठेवा. ● कॉटनचे आरामदायक कपडे परिधान करा. ● धूम्रपान करु नये कारण याने आपल्या शरीराचे तापमान वाढते. ● नैसर्गिक परफ्यूम वापरा. 👍माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. ✔️Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

डायबिटीस पेशंटसाठी उन्हाळ्यातील पदार्थ...

 👴उन्हाळ्यात डायबिटीज रूग्णांना 'या' गोष्टी महत्वाच्या! उन्हाळ्यात डायबिटीजच्या रूग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान अशावेळी आपण काही खास पदार्थांचा आपल्या डाएटमध्ये समावेश करू शकता, ज्यामुळे ब्लड शुगर सुद्धा नियंत्रित होऊ शकते. सोबतच शरीर हायड्रेट राहण्यासह अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. त्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील. ● काकडी : उन्हाळ्यात सर्वात हेल्दी फूड म्हणजे काकडी. कारण यामध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरी खुप कमी असते. तर व्हिटॅमिन आणि पोषकतत्व भरपूर असतात. यामुळे ब्लड शुगर कमी होण्यास मदत होते. ● टोमॅटो : यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, फोलेट, फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी6, ई, सह अनेक असे गुण असतात जे डायबिटीजसाठी लाभदायक आहेत. तसेच ग्लायसेमिक इंडेक्स खुप कमी असल्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहते. ● बेरी : हे डायबिटीजच्या रूग्णांसाठी चांगले मानले जाते. संशोधनानुसार ब्लूबेरीची स्मूदी प्यायल्याने शरीरात इन्सुलिन वेगाने वाढते. ● वांगी : याचा ग्लायसेमिक इंडेक्स 15 असतो. यात भरपूर फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, तांबे, व्हिटॅमिन बी 6...

बुद्रुक - खुर्द...

 🤔गावांच्या नावासमोर लावण्यात येणाऱ्या बुद्रुक व खुर्द या शब्दांचा अर्थ माहितीय का? महाराष्ट्र भर फिरत असताना तुम्ही अनेक नगरे-महानगरे तसेच खेडी-पाडी पाहिली असतील. परंतु त्याचबरोबर तुम्हाला अशी देखील गावे दिसली असतील ज्यांच्या नावापुढे बुद्रुक व खुर्द हे शब्द लावलेले असतात. उदाहरणार्थ - पिंपळगाव बुद्रुक-पिंपळगाव खुर्द. याबरोबरच कसबा आणि मौजे अशीही नावे गावांच्या नावांमध्ये आलेली आढळून येतात. गावांच्या नावासमोर लावण्यात येणाऱ्या या बुद्रुक आणि खुर्द, कसबा आणि मौजे या शब्दांचा अर्थ नव्या पिढीला माहीत नसतात. 👉चला तर जाणून घेऊया असे का… शिवकाळापूर्वी महाराष्ट्रात आदिलशाही, मुगलशाही, कुतुबशाही यांचा मोठा अंमल होता. त्यामुळे मराठी भाषेवरही इस्लामी भाषेचा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्यामुळे महाराष्ट्रात त्या काळी उर्दूमिश्रित भाषा बोलली जात होती. त्यामुळे मराठी भाषेमध्ये अनेक फारशी, अरबी, इंग्रजी शब्द आले आहेत. या शासन काळात गावांना बुद्रुक आणि खुर्द अशी नावे देण्यात आली. एखाद्या रस्त्यामुळे, नदी किंवा ओढ्यामुळे गावाचे दोन भाग पडत. ते दोन्ही भाग समान नसल्यामुळे गावाच्या मोठ्या भागाला बुज...

सोयाबीन - विकसित जाती...

 👉सोयाबीनच्या नवीन विकसित जाती* भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सहाय्याने सोयाबीनच्या विविध जाती विकसित केले गेले आहेत. सोयाबीनच्या या नवीन जातींची वैशिष्ट म्हणजे उत्पादकतेच्या गरजेनुसार कमी कालावधीत तयार होणाऱ्या, तसेच यंत्राद्वारे काढण्यास उपयुक्त, किडीस प्रतिरोधक, तसेच पोषण युक्त बियाण्यांचा शोध लावला आहे अशी माहिती संस्थेचे डॉक्टर ओक, डॉक्टर जय भाय यांनी दिली कोणत्या आहेत या नवीन जाती व त्याची काही वैशिष्ट्ये आहेत हे आपण पाहणार आहोत. १)MASCS १४६० : महाराष्ट्र ,कर्नाटक ,आंध्र, तेलंगणा, तमिलनाडु, या प्रदेशात 90 दिवसात काढण्यास तयार होणारे हे बियाणे आहे. 👉बियाण्यांचे असे वैशिष्ट्य आहे की या झाडास तीन ते चार फांद्या लागून ते 40 ते 45 सेंटिमीटर इतकी उंची असेल. 👉तसेच त्याच्या शेंगा लवविरहित असून पिवळ्या रंगाच्या तीन दाणे असून फुटण्यास प्रतिबंधक असे हे बियाणे आहे बियांचा आकार मध्यम व गोलाकार असून फिकट काळे रंगाचे हायलम आहे. 👉हे पीक यंत्राने सहज कापणी शक्य आहे. तसेच यावर मावा, खोडमशी, चक्री भुंगा, पाणी खाणारी व पोखरणारी आळी यास प्रतिकरक्षम आहे. 👉या बियाण्यामध्ये 18 टक्के तेल व 41% प...

घरच्या घरी बनवा काढा...

 🎯घरच्या घरी असा तयार करा आयुर्वेदिक काढा☕ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली कि, कोरोनापासून दूर राहणे शक्य आहे. आयुर्वेदिक काढ्याच्या मदतीने घरच्या घरी आपण नैसर्गिक पद्धतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतात. 👉साहित्य : तुळशीचे पाने, दालचिनी, सुंठ, काळे मिरे. 👉कृती : वरील सर्व साहित्य एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून 4 ग्रॅमची टी-बॅग किंवा 500 मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या तयार करा. दिवसातून एक किंवा दोन वेळा याला 150 मिलीलिटर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखं प्या. याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी नक्की होईल. 👉लक्षात ठेवा - ● जर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही काढा पिऊ नये. ● काढ्यात मसाल्याच्या पदार्थांचा समावेश असतो. अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता घरी काढा तयार करत आहेत. जे चुकीचे आहे. 👉Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖