मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

❤️ हृदयासह संपूर्ण शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी या "९" गोष्टी अंमलात आणा...

मित्रांनो, १) सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस, दोन चिमूट हळद आणि दोन चिमूट दालचिनी पावडर घालून प्यावे. २) प्रत्येक जेवणामध्ये प्रोटिन्स (चिकन/पनीर/टोफू/सोयाचंक्स/कडधान्ये) आणि फायबरचा (भाज्या) टक्का वाढवा. ३) जेवताना आधी सलाड, मग प्रोटिन्स आणि मग भात/भाकरी/चपाती खा. ४) संध्याकाळ नंतर शक्यतो सूप्स, सलाड आणि डाळ खा. ५) दुधाचा चहा पुर्ण बंद करा. ६) चटकमटक पदार्थांऐवजी भाजलेले शेंगदाणे/फुटाणे/मखाने/चिरमुरे/लाह्या/पॉपकॉर्न्स खा. ७) ज्यूसऐवजी सिजनल अख्खी फळं खा. ८) दिवसभरात किमान 3 लिटर पाणी प्यावे. ९) साखरेला गूळ पर्याय आहे या भ्रमात राहू नका. दोन्हीही तेवढेच घातक आहेत. *टीप : माहिती आवडल्यास पुढे पाठवा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ * पित्त - कारणे व उपाय... मित्रांनो, पित्त होण्यापाठीमागे अनेक कारणे आहेत, तसेच पित्ताचे विविध प्रकारही आहेत. आज आपण कारणे आणि त्यावरील उपचार याविषयी माहिती घेऊया... *चुकिचा आहार हे एक कारण आहे...* जसे की, तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, लाल मांस, ह्या प्रकारचे अन्नपदार्थ आपण खाल्ले असतील तर हमखास पित्त होऊन छातीत जळजळ...

👉कढीपत्त्याची चटणी...

बाजारात आपण भाजी खरेदी करण्यासाठी गेलो की सगळ्यात शेवटी कढीपत्ता अगदी आवर्जून घेतोच. कारण कुठलीही भाजी असो किंवा डाळ, आमटी असो फोडणीसाठी जिरे, मोहरीसोबत कढीपत्ता हा लागतोच.  पण बऱ्याचदा लहान मुलेच काय मोठी माणसेदेखील भाजीतील, डाळ-आमटीमधील कढीपत्ता ताटात बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे पदार्थाला कढीपत्त्याचा स्वाद येत असला तरी प्रत्यक्षात तो पोटात जात नाही.  त्यामुळे या कढीपत्त्याची जर चटणी केली तर ती सगळेच आवडीने खातील. कारण ही चटणी अतिशय चविष्ट लागते. 👉कढीपत्ता चटणीसाठी आवश्यक साहित्य : १) २ वाट्या कढीपत्ता पाने २) २ टेबलस्पून चणाडाळ  ३) २ टेबलस्पून उडीद डाळ  ४) २ टेबलस्पून शेंगदाणे ५) १ टीस्पून जीरे ६) ७-८ लसूण पाकळ्या ७) ३ टेबलस्पून सुके खोबरे ८) २ टेबलस्पून तेल  ९) १ टेबलस्पून लाल तिखट १०) १ टीस्पून धणे पावडर ११) १ छोटा तुकडा चिंच/ (१/२ टीस्पून आमचूर पावडर ) १२) १ छोटा गुळाचा खडा  १३) चवीपुरते मीठ. 👉कृती : कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून सुती कापडाने पुसावीत. पानांमध्ये अजिबात पाणी राहता कामा नये. ती पूर्ण कोरडी करावीत. गॅसवर कढई गरम करुन त्यात सुके खोबर...

Computer GK...

🖥️ कंप्यूटर से जुड़े 20 वन लाइनर प्रश्न और उत्तर... 1. कंप्यूटर में डेटा स्टोर करने के लिए कौन सी डिवाइस उपयोग होती है? उत्तर : *हार्ड डिस्क* 2. इंटरनेट पर वेबसाइट को ढूंढने के लिए क्या उपयोग होता है? उत्तर : *ब्राउज़र*  3. कंप्यूटर वायरस क्या है? उत्तर : *एक प्रकार का मैलवेयर*  4. फायरवॉल का मुख्य काम क्या है? उत्तर : *नेटवर्क सुरक्षा प्रदान करना* 5. क्लाउड कंप्यूटिंग क्या है? उत्तर : *इंटरनेट पर सेवाओं का उपयोग*  6. कंप्यूटर में प्रिंटर किस प्रकार की डिवाइस है? उत्तर : *आउटपुट डिवाइस*  7. मॉनिटर किस प्रकार की डिवाइस है? उत्तर : *आउटपुट डिवाइस*  8. कंप्यूटर की गति को क्या मापते हैं? उत्तर : *GHz (गीगाहर्ट्ज़)*  9. बिट और बाइट में क्या अंतर है? उत्तर : *8 बिट = 1 बाइट* 10. IP एड्रेस क्या है? उत्तर : *इंटरनेट प्रोटोकॉल एड्रेस* 11. Wi-Fi क्या है? उत्तर : *वायरलेस नेटवर्किंग तकनीक*  12. ब्लूटूथ का उपयोग किस लिए होता है? उत्तर : *डिवाइसेज़ को कनेक्ट करने के लिए* 13. कंप्यूटर में RAM का क्या काम है? उत्तर : *अस्थायी डेटा स्टोरेज*  14. ROM का मतलब क्या...

*गूळ आणि ओवा एकत्र खाल्ल्याने होणारे फायदे...

मित्रांनो, बदलत्या वातावरणात सेंद्रिय गुळाचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. सेंद्रिय गुळाने सर्दी खोकला तर दूर होतोच, सोबतच महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनाही कमी होण्यास मदत होते. सेंद्रिय पद्धतीने बनवलेल्या गुळाच्या नियमित सेवनाने शरीरातील आयर्नची कमतरता भरून निघते. याने पचनक्रियाही सुधारते आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.  👉पचनक्रिया सुधारते : गूळ आणि ओवा दोन्हींमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं, ज्याने पचन तंत्र चांगलं राहतं. याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊन पोट साफ होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला पचन तंत्र सुधारायचं असेल तर गूळ आणि ओव्याचं सेवन केलं पाहिजे. 👉मासिक पाळीतील वेदनेपासून आराम : गूळ आणि ओव्याचं सेवन केल्याने मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत मिळते. तसेच यांचं एकत्र सेवन केल्याने ब्लड फ्लो चांगला राहतो.  👉कंबरदुखी होईल दूर : ओवा आणि गुळाचं एकत्र सेवन केल्याने कंबर दुखीपासून सुटका मिळवू शकता. हे मिश्रण रोज झोपण्यआधी एक ग्लास कोमट पाण्यात टाकून सेवन करावं. याने कंबरदुखीची समस्या दूर होईल. 👉सर्दी-खोकला होईल दूर : सर्दी-खोकल्याची समस्या दूर...

चाणक्य नीति – सफलता का सूत्र

*नीचे गिरना* असफलता नहीं है, *असफलता* तब आती है जब आप वहीं रह जाते हैं *जहाँ आप गिरे हैं!* 👉 गिरकर उठ जाना ही असली जीत है। 🏆* चाणक्य नीति – समय और सफलता  📝 “हर *बीतता हुआ समय* ये बता रहा है, अगर तुम *कामयाब* नहीं हुए तो तुम्हारा कोई अपना नहीं होगा!” ⏳💔 चाणक्य नीति – कठोर सच  📝 *“इज्जत किसी इंसान* की नहीं होती, *जरूरत की होती है।* जरूरत खत्म, इज्जत खत्म — *यही दुनिया का सच है..*” ⚖️🌍 चाणक्य नीति – जीवन का सत्य ✨* *📝 कैंची पेड़ नहीं काट सकती*, कुल्हाड़ी बाल नहीं *काट सकती...* *हर इंसान* में खूबी अलग है, तुलना किसी की किसी से नहीं की *जा सकती..!!”* 🌿✂️🪓 चाणक्य नीति – सत्य की शक्ति  📝 “झूठे *व्यक्ति की ऊँची* आवाज़ 📢, सच्चे *व्यक्ति को चुप* करा देती है। परंतु सच्चे *व्यक्ति का मौन* 🤐, *झूठे व्यक्ति* की जड़ें हिला देता है।” 🌳⚡ चाणक्य नीति – व्यवहारिक बुद्धि  *📝 लोगों को दिखाओ* कि तुम *मूर्ख हो* और तुम्हें कुछ नहीं पता, इसी से तुम उनकी *औक़ात जान* पाओगे।” 🎭🧠 चाणक्य नीति – अनुभव की ताक़त 📝 “जो तुम्हारे साथ सामने हंसता है, जरूरी नहीं कि वही तुम्हारा सच्चा साथ...

साधे सोपे घरगुती उपचार...

🍏 आवळा... मित्रांनो, आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष मानवी शरीराचे आधारस्तंभ मानले जातात. या दोषांचे संतुलन बिघडले की आजार उद्भवतात असे शास्त्र सांगते.  आवळ्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजांमुळे तो या तिन्ही दोषांवर परिणाम करतो. वात शांत करून तो अस्थिरता कमी करतो, पित्तामुळे होणारी जळजळ कमी करतो आणि शरीराला थंडावा देतो, तसेच कफामुळे होणारा जडपणा व कफस्राव कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे आवळ्याचे नियमित सेवन शरीरात तिन्ही ऊर्जांचे संतुलन राखते. आवळ्याचा उपयोग अनेक पद्धतींनी करता येतो. सकाळी ताज्या आवळ्याचा रस पाण्यात मिसळून घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळते. आवळ्याची पावडर कोमट पाण्यात किंवा हर्बल टीमध्ये मिसळून घेता येते.  कच्चा आवळा खाल्ला तरी फायदेशीर आहे, तसेच त्याचा मुरंबा, लोणचं किंवा चटणी बनवून खाल्ल्यासही तो उपयोगी ठरतो. त्वचेसाठी आणि केसांसाठी आवळ्याचे तेल किंवा फेसपॅक म्हणूनही तो वापरला जातो. त्यामुळे तो फक्त आहारापुरता मर्यादित न राहता सौंदर्य टिकवण्यासाठीही उपयोगी आहे. आधुनिक शास्त्रानेही आवळ्याचे फायदे सिद्ध केले आहेत. संशोधनानुसार आवळ्याम...

👉हे "पित्त" वाढवणारे पदार्थ टाळा...

1.अळशी (जवस) : मोहरी आणि कुळीथ पेक्षा थोडं कमी पित्त वाढवणारा पदार्थ म्हणजे अळशी आहे. पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी अळशी खाणे टाळावी. 2.मांस - मासे : ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा पित्त प्रकृती आहे त्यांनी मासा टाळावा इतरांना मासा चालतो. प्रोटीनने भरपूर आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवणारे मासे आहेत. 3.दही : दही खायला जरी ते थंड असलं तरी ते अतिशय उष्ण आहे यांनी पित्त वाढण्याची शक्यता अधिक राहते. 4.ताक : हे आंबट असते त्यानेही पित्त वाढण्याची शक्यता राहते, मात्र ताज्या ताकामध्ये खडीसाखर टाकून तुम्ही खाल्ल्यास पित्ताचा त्रास फारसा जाणवत नाही. शरीराला थंडावा मिळेल आणि पाचनशक्ती वाढेल.(म्हणून ताक हे नेहमी ताजेच प्यावे) 5.कांदे पोहे : अनेकांना कांदे पोहे खाल्ल्याने पित्त वाढते त्यामुळे पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी कांदेपोहे टाळावेत. तसेच पोहे खाल्ल्यानंतर चहा पिणे 100% टाळावे. 6.मद्यपान : पित्त प्रकृती असलेल्या व्यक्तींनी मद्यपान टाळावे. 7.पित्त वाढवणारे मीठ : अति प्रमाणात पित्तचा त्रास असल्यास मीठ टाळावे. आणि सैंधव मीठ वापरल्यास हा त्रास टाळता येतो.प्रत्येक वेळी अ...