43 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 'शोले'च्या कमाईला टाकले होते मागे. 2 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाने केली होती 100 कोटींची कमाई. आजही मोडू शकले नाही कोणी रेकॉर्ड. MITHUN CHAKRABORTY : सध्याच्या काळात एखाद्या चित्रपटाने 500 ते 1000 कोटी रुपयांची कमाई करणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. पण काही दशकांपूर्वी 100 कोटींचा टप्पा गाठणं हे खूप अवघड मानलं जात होतं. आज सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार यांच्या चित्रपटांबाबत ‘100 कोटी क्लब’ची चर्चा होते पण या क्लबचा मानाचा पहिला विक्रम मात्र मिथुन चक्रवर्ती यांच्या नावावर आहे. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या करिअरला भरारी देणारा चित्रपट म्हणजे 'डिस्को डान्सर'. हा चित्रपट 1982 मध्ये भारतात प्रदर्शित झाला होता. भारतात या चित्रपटाने सुमारे 6 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र खरी कमाल झाली 1984 मध्ये जेव्हा हा चित्रपट सोव्हिएत संघात प्रदर्शित झाला. तिथे या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि केवळ सोव्हिएत संघातच नव्हे तर आशिया, पूर्व आफ्रिका, पश्चिम आफ्रिका, तुर्की आणि चीनसारख्या देशांमध्ये ही या च...
All types of information are provided. Health, entertainment, education, government schemes and many more. You can also ask if you have any questions.